The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात बनलेली लुना देशभरातल्या रस्त्यांवर दिमाखात धावत होती

by द पोस्टमन टीम
30 May 2025
in विश्लेषण, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज वाहतुकीच्या साधनांत कमालीची प्रगती झालेली आहे. मोटार सायकलींच्या किंमतीही लाखोच्या घरात पोहोचल्या आहेत. १९८०पूर्वी सायकल हेच एकमेव सर्वसामान्यांच्या आवाक्यातील साधन होते. पेपरवाले, दुधवाले, पोस्टमन, असे फिरते काम करणाऱ्या व्यक्तींसाठी तर त्याकाळात सायकल खूपच उपयोगी पडायची. १९८० साली पहिल्यांदा पुण्याच्या कायनेटिक समूहाने लुना आणली आणि भारतीयांच्या वाहतुकीच्या साधनात कमालीचा बदल झाला.

कायनेटिकच्या या किफायतशीर लुनामुळे भारतीयांना खूप मदत झाली. एक तर कमी किमतीत जास्त वेगात पळणारी आणि कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर कापणारी ही लुना म्हणजे अनेक मध्यमवर्गीय भारतीयांच्या कुटुंबाचा एक घटकच बनली. सायकल चालवणाऱ्यांसाठी तर लुना मोठी वरदानच ठरली.

१९८०च्या दशकात लुनाने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. स्वस्त, दमदार आणि चालवण्यास अधिक सोपी असणाऱ्या लुनावर लोकांनी भरभरून प्रेम केले. ही लुना दिसायलाही स्टायलीश होती.

“चल मेरी लुना” अशी टॅगलाईन असणाऱ्या लुनाच्या जाहिरातीने तर धमालच केली होती. १९५९ साली आलेल्या एका चित्रपटाच्या गाण्यावरून ही टॅगलाईन सुचली होती. भारतातील लुना म्हणजे प्यागियोचीच एक लायसन्स कॉपी होती. भारतात सायकल कम मोटारसायकल वाटणारी ही मोपेड हातोहात विकली गेली. १९७२ मधे लॉंच करण्यात आलेल्या लुनाची जादू त्यानंतर २८ वर्षे टिकून राहिली. पुढची २८ वर्षे या मोपेडने भारतीय बाजारपेठेवर कब्जा मिळवला होता.

लुनाची ही जाहीरात म्हणजे जाहिरात क्षेत्रातीलही एक क्रांती होती. कारण या जाहिरातीत पहिल्यांदा सर्वसामान्य लोक आणि त्यांच्या गरजा आणि भाषेला महत्त्व देण्यात आले होते. सुरुवातील लुनाची जाहिरात करताना एक स्वस्त, दमदार भारतीय उत्पादन असाच त्याचा प्रचार करण्यात आला.



स्थानिक क्रिकेट सामन्यात ‘मॅन ऑफ दि मॅच’ ठरलेल्या विजेत्यांना आणि बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कायनेटिक समूहाकडून ही गाडी बक्षीस म्हणून दिली जात असे. राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या संदीप पाटील, चंद्रशेखर या सारख्या खेळाडूंनाही लुना भेट देण्यात आली होती. राज कपूरच्या ‘गोपीचंद जासूस’ या चित्रपटातही लुनाचा वापर करण्यात आला होता.

५० सीसी इंजीनची ही लुना कायनेटिकचे एक उत्तम मॉडेल होते, जी भारतात १९७२ साली लॉच झाली. अमेरिकेत यापूर्वीच ३५ सीसी इंजिनची लुना कायनेटिक टीएफआर नावाने लाँच करण्यात आली होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ग्राहकानं आकर्षित करणारा लुनाचा आणखी एक घटक म्हणजे याचा रंग. चमकदार बॉडी, वजनाला हलकी, तोल सांभाळायला सोपी आणि पेडल स्टार्ट अशी वैशिष्ट्ये असणारी ही गाडी कुणालाही आवडली नसती तरच नवल. शिवाय याच्या मेंटेनन्ससाठीही खूप खर्च येत नसे. लुनाचा प्रवास तर एकमदच आनंददायी आणि आरामदायक.

ग्रामीण भागातील खडकाळ रस्त्यावर लुना त्याच ऐटीत पळत असे. तिचे हे आणखी एक वैशिष्ट्य ज्यामुळे भारतीयांनी तिला जास्त पसंती दिली.

दुचाकी गाड्यांमधे नेहमीच काही ना काही बदल होत राहतात. अनेक कंपन्या आपल्याच जुन्या मॉडेलच्या रुपात काही तरी नवे बदल करून ती नव्या रुपात सादर करत असतात. लुनानेही नंतर बाजारपेठेत टिकण्यासाठी म्हणून लुनाचे पेडल स्टार्ट वैशिष्ट्य बदलून ती किक स्टार्ट केली. इंजिनची क्षमता आणि मजबुती वाढवण्यात आली. याची संपूर्ण बॉडी बदलून ती अधिक आरामदायी आणि अधिक समान वाहून नेण्यासाठी उपयोगी ठरेल यानुसार तिच्यात आवश्यक ते बदल करण्यात आले.

लुनाचे जवळपास पाच रूपे बाजारात आली. पहिलं होते लुना टीएफआर प्लस. या पहिल्या वहिल्या मॉडेलने तर बाजारात येताच ग्राहकांची मने जिंकली होती. त्यानंतर आले लुना डबल प्लस. तिसरे होते लुना विंग्ज. चौथे लुना मॅग्नम आणि शेवटचे लुना सुपर. पाचवे मॉडेल तर सर्वांच्याच पसंतीला उतरले होते.

आजही लुनाची क्रेझ उतरलेली नाही. सर्वसामान्य लोकांना आजही लुना हवीहवीशी वाटते. काही लोकांनी तर आपली जुनी मोपेड लुना अजूनही सांभाळून ठेवली आहे. आजही ऑनलाईन पोर्टलवरून लुना उपलब्ध होऊ शकते.

वाहनांच्या क्षेत्रात तर नेहमीच अद्ययावत बदल होत राहतात. काही दिवसांच्या अंतरांनी बाजारातून जुने मॉडेल जातात आणि नवे येतात. अशा सतत बदलत्या तंत्रज्ञानामुळे जुने तंत्रज्ञान आउट डेटेड होते आणि त्यासोबतच या गाड्याही आउट डेटेड ठरतात. २००० मधे कायनेटिकने भारतातील लुना उत्पादन करणारा प्लांट बंद केला आणि हा ब्रँड त्यांनी महिंद्रा या ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका बड्या कंपनीला विकला. लुना महिन्द्राला विकल्यानंतर कायनेटिकने भारतातील आपला व्यापार गुंडाळला आणि ती मायदेशी निघून गेली.

महिंद्रानेदेखील पुन्हा एकदा लुना बाजारात आणण्याच्या उद्देशाने याची पुनर्नोंदणी केली होती.

लुना बाजारातून गायब झाल्यानंतर छोट्या दुचाकींच्या या क्षेत्रात टीव्हीएसने स्वतःचा चांगलाच जम बसवला आहे. स्त्रिया, कॉलेज तरुण-तरुणी यांनी टीव्हीएसला चांगला प्रतिसाद दिला.

आजच्या काळात तर दुचाकी वाहनांमधे किती मोठा बदल झाला आहे, पण पाहतच आहोत. मोटार सायकल, स्कुटी आणि स्कूटर असे कितीतरी प्रकार साधा बाजारात उपलब्ध आहेत. नुसते प्रकारच नाही तर अनेक कंपन्यांनी या प्रकारातील आपापली उत्पादने ब आजारात आणल्यामुळे दुचाकीच्या बाबतीत बाजारात भरपूर व्हरायटी उपलब्ध झाली आहे. या गाड्यांनी बाजारात चांगलाच जम बसवला आहे. तरीही लुनाची सर कोणत्याच दुचाकीला येणार नाही.

आजही जर बाजारात लुना उपलब्ध झाली तर तिच्यावर ग्राहक तुटून पडतील. हलकी दमदार आणि कमी किमतीतील लुनाची आजही कित्येकांना गरज आहे. वाढते इंधन दर आणि पेट्रोल-डीझेलमुळे होणारे प्रदूषण या समस्याही दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. तेव्हा ऑटोमोबाईल कंपन्यांनी पुन्हा एकदा लुना आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मुनाफची भारतीय संघात निवड व्हावी म्हणून खुद्द ‘स्टीव वॉ’ने वकिली केली होती

Next Post

ऑस्ट्रेलिया इंग्लंडसाठी ही सिरीज वर्ल्डकपपेक्षा कित्येक पटीने महत्वाची असते

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

ऑस्ट्रेलिया इंग्लंडसाठी ही सिरीज वर्ल्डकपपेक्षा कित्येक पटीने महत्वाची असते

भटकंती - दौलताबादचा अभेद्य देवगिरी किल्ला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.