The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ब्रूस ली’बद्दलच्या अफवा सगळ्यांना माहित आहेत, आता फॅक्टस् वाचा!

by द पोस्टमन टीम
26 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मार्शल आर्टचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर एकच चेहरा उभा राहतो, तो म्हणजे ब्रूस ली. मार्शल आर्ट्समधील त्याच्या निपुणतेमुळेच ब्रूस लीला चित्रपटातही संधी मिळाली. त्याच्या याच कलेने त्याला जगभर ओळख मिळवून दिली.

ब्रूस ली भोवती निर्माण झालेल्या प्रसिद्धीच्या वलयामुळे नंतर त्याला हॉंगकॉंगमधील चित्रपट सृष्टीतही स्थान मिळाले तिथेही आपल्या परिश्रमाने ब्रूस लीने चांगले नाव कमावले. ब्रूस लीने कमी खूप कमी वयात खूप मोठे यश मिळवले होते. आजही ब्रूस ली हे नाव त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम कोरले गेले आहे. हॉंगकॉंगनेही ब्रूस लीच्या कलागुणांचा यथोचित सन्मान केला.

जाणून घेऊया आपल्या मार्शल आर्ट्सने संपूर्ण जगाला आकर्षित करून घेणाऱ्या ब्रूस लीबद्दल काही अधिक माहिती.

ब्रूस ली लहानपणी एकदमच हडकुळा मुलगा होता. नंतर तो मार्शल आर्ट्समुळे एकमद फीट, तंदुरुस्त आणि चपळ झाला असला तरी ब्रूस ली बालपणी मात्र इतका धाडसी नव्हता. नंतर त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे त्याला शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटले आणि त्याने मार्शल आर्ट्सचे धडे घेतले. या कलेत त्याने असे प्राविण्य मिळवले की नंतर त्याने अनेक मुलांना स्वतःहून मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिले.



हॉंगकॉंगच्या चित्रपट सृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ब्रूस लीचा जन्म २७ नोव्हेंबर १९४० रोजी झाला. खूप कमी लोकांना हे माहित असेल की ब्रूस लीचा जन्म अमेरिकेत झाला आणि त्याचे खरे नाव ‘ली जून फन’ हे होते. चित्रपटात आल्यानंतर त्याला त्याचे ब्रूस ली हे नाव मिळाले. ब्रूस लीचे सुरुवातीचे शिक्षण हॉंगकॉंगमधेच झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी तो पुन्हा अमेरिकेला गेला. युनिव्हर्सिटी ऑफ वाशिंग्टन येथून त्याने उच्च शिक्षण पूर्ण केले.

चीनमधे कम्युनिस्ट सरकार विरोधातील असंतोष सातत्याने वाढत होता. चीनमधे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मार*हाण, हिं*साचार रोजचंच झालं होतं. लोक भूकबळीने मरत होते. गुन्हेगारीला तर अक्षरशः उत आला होता. सामान्य माणसे तर सरकारकडेच आशेने पाहत होती. पण, सरकारने त्यांची घोर निराशा केली होती. त्यामुळे सरकार विरोधी आवाज आणखी तीव्र होत गेला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सरकार विरोधात तरुण एकत्र येऊ लागले. सरकार विरोधात बोलणाऱ्या तरुणांत ब्रूस लीही होताच. त्याने टायगर्स ऑफ जंक्शन स्ट्रीट’ नावाच्या एका संघटनेत प्रवेश केला होता.

तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आणि या हाणामारीत ब्रूस लीने पण खूप मार खाल्ला. त्याच्या अंगावर काळेनिळे व्रण उठले होते. ब्रूससाठी हा खूपच नामुष्कीजनक प्रसंग होता. आपण स्वतःच्या रक्षणासाठीही सक्षम नाही ही गोष्ट त्याला खात होती. आपल्यावर वेळ आली तर किमान आपण स्वतःचे तरी रक्षण केले पाहिजे. इतकी तरी शारीरिक सक्षमता आणि धाडस आपल्यात हवे असे त्याला वाटू लागले.

म्हणून एक दिवस तो आईला म्हणाला की, त्याला मार्शल आर्ट्स शिकायचे आहे. आधी आईने थोडे आढेवेढे घेतले, पण नंतर तिने त्याला परवानगी दिली.

ब्रूस लीने यिप मॅन यांच्याकडे मार्शल आर्ट्सचे धडे गिरवायला सुरुवात केली. यिप हे मार्शल आर्ट्स मधील एक नामांकित नाव होते. ब्रूस लीचे प्रशिक्षण सुरु झाले. त्याच्या आयुष्याचा एक अनोखा आणि वेगळा प्रवास सुरू झाला होता. यिप मॅननी त्याला जे काही धडे दिले त्याचे प्रात्यक्षिक त्याने प्रत्यक्ष रस्त्यावरून सुरू केले. यामुळे सरकारची वक्र दृष्टी ‘ब्रूस ली’वर पडलीच. त्याचे नाव ‘गुन्हेगारांच्या यादीत’ टाकण्यात आले. आधीच सगळीकडे निर्माण झालेली अंधाधुंदी आणि त्यात ब्रूसचे नाव गुन्हेगार यादीत सामील करणे हा खरे तर फारच चिंतेचा विषय होता. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला पुन्हा अमेरिकेला पाठवण्याचे ठरवले.

अमेरिकेत आल्यानंतरही ब्रूस लीने मार्शल आर्ट्स सोडले नाही.

त्याने अमेरिकेतील मुलांना मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याने अमेरिकेतील मुलांना ‘जून फान कुंग फु’ची कला शिकवली. नंतर याचेच नाव ‘ब्रूस ली कुंग फु’ असे करण्यात आले.

हळूहळू मार्शल आर्ट्समधे ब्रूस एकदम निष्णात झाला. त्याच्या प्रशिक्षणामुळे सगळीकडे त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली. त्याच्या व्यक्तिमत्वाकडे युवक आकर्षित होत असत. मार्शल आर्ट्स शिकण्याकडे तरुणांचा कल वाढत होता. याचे कारण होते ब्रूस ली. तो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनला होता. तरुणांची संख्या वाढू लागली तसे त्याने स्वतःची मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देणारी एक संस्थाच रजिस्टर केली. या संस्थेला त्याने ‘जून फन कुंग फु मार्शल आर्ट्स इन्स्टिट्यूट’ असे नाव दिले होते.

या संस्थेचा बोलाबाला वाढत होता. मार्शल आर्ट्सविषयी लोकांत आकर्षण निर्माण झाले होते. ब्रूस ली आणि त्याची कला हळूहळू लोकप्रिय होऊ लागली होती.

ब्रूस लीच्या याच लोकप्रियतेमुळे त्याच्यासाठी हॉलीवूडचे दरवाजेही उघडले गेले. त्याने छोट्या पडद्यापासून सुरूवात केली. त्याची अभिनयही तितकाच दमदार होता. तरीही मोठमोठ्या चित्रपटांत अजूनही त्याला काम मिळत नव्हते. काही लोकांच्या मते ब्रूस हॉंगकॉंगमधील चित्रपटांसाठी एकदम परफेक्ट होता. लोकांच्या या सांगण्यावरून अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यासाठी तो पुन्हा एकदा हॉंगकॉंगला आला. इथे आल्यावर खरेच त्याला अनेक मोठमोठ्या चित्रपटांत संधी मिळाली.

१९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘दि बिग बॉस’ या चित्रपटातून त्याने हॉंगकॉंग इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरूवात केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. ब्रूस ली आणखी चित्रपटातून दिसावा अशी प्रेक्षकांची इच्छा होती. त्याच्या शरीराची चपळ हालचाल लोकांना वेड लावीत होती. त्यानंतर १९७२ साली त्याने ‘फिस्ट ऑफ फ्युरी’ हा चित्रपट केला. त्याचा हा दुसरा चित्रपट जो सुपरहिट ठरला.

ब्रूस लीची लोकप्रियता फक्त हॉंगकॉंगच नाही तर, संपूर्ण आशियात पसरत होती. ब्रूस लीची तंदुरुस्त शरीरयष्टी, त्याची चपळता आणि त्याची मार्शल आर्ट्सचा वापरण्याची शैली यांमुळे प्रेक्षकांवर त्याची चांगली छाप पडत होती.

त्यालाच आपला आदर्श मानून अनेक तरूण मार्शल आर्ट्सकडे वळू लागले.

ब्रूस लीची पत्नी लिंडा ली कॅडवेल देखील चित्रपट क्षेत्रातच काम करत होती. ब्रूसला दोन मुली झाल्या. ब्रँडन ली आणि शैनन ली. त्याची धाकटी मुलगी शैनन आजही हॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हॉलीवूडमधील अनेक चित्रपटात तिने काम केले आहे.

ब्रूस लीने कमी वयात खूप मोठे यश मिळवले होते. पण, दुर्दैवाची गोष्ट की त्याला या यशाचा आनंद आणि त्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा फार काळ मिरवता आली नाही. अवघ्या ३२व्या वर्षी त्याचे निधन झाले. त्याच्या गूढ मृत्यू मागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.

एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्याच्या डोक्याला दुखापत झाली. आतल्या आत मेंदूला आलेली सूज कळून आली नाही आणि यामुळेच अचानक त्याचा मृत्यू झाला असे म्हटले जाते. पण त्यादिवशी त्याने आपल्या नवीन चित्रपटाबाबत निर्मात्यांशी चर्चा करत होता. अचानक त्याचे डोके खूप तीव्रतेने दुखू लागले. त्याने आपल्या डोके दुखीविषयी आपल्या मित्राला सांगितले. पण, शेवटपर्यंत त्याला नेमके काय झाले होते हे कुणालाच कळले नाही.

ज्या हॉटेलमध्ये तो थांबला होता तिथल्या हॉटेलच्या रूममधे तो अत्यवस्थ अवस्थेत आढळला होता. गडबडीने त्याला दवाखान्यात नेण्यात आले पण तिथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याची अशी अचानक आणि अनपेक्षित एक्झिट अनेकांसाठी धक्कादायक बाब होती.

ब्रूस लीच्या जीवनातील हे काही किस्से पाहिल्यानंतर, काही प्रसंग संपूर्ण आयुष्याला कशी कलाटणी देऊ शकतात याची प्रचीती येते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आठ वर्षांच्या मुलाने सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करत पराक्रम गाजवला होता !

Next Post

यातला तुमचा फेव्हरेट क्रिकेट अंपायर कुठला..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

यातला तुमचा फेव्हरेट क्रिकेट अंपायर कुठला..?

प्रेमासाठी तुम्ही काय केलंय..? या राजाने 'वाईन'चा तलाव केला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.