The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून जपानने बिल्डिंगच्या मधूनच हायवे बांधलाय..!

by द पोस्टमन टीम
7 December 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जपान तांत्रिकदृष्ट्या प्रगत देश म्हणून ओळखला जातो. जपानमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतील. कितीही संकटे आली तरी जपानच्या प्रगतीची घोडदौड काही थांबलेली नाही. जपानने आपल्या प्रत्येक समस्येवर सकारात्मक उपाय शोधून काढले आहेत.

जपानच्या ओसाका शहरात कितीतरी उंचच उंच बिल्डींग्ज आहेत. या ओसाका शहराला दुसऱ्या शहरांशी जोडणारा हीनशिन महामार्ग एका बिल्डींगच्या मध्यातून जातो हे तुम्हाला माहिती आहे का? बिल्डींगमधून महामार्ग? कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल, पण जपानने हे शक्य करून दाखवले आहे.

जमिनीसाठी होणारे वाद हे काही आपल्यासाठी नवे नाहीत. जमिनी आणि जमिनीचा हिस्सा यासाठी घराघरात भांडणे आणि वाद होतच राहतात. आजकाल तर महामार्ग बांधतानाही वाद होतात. कारण बऱ्याचदा हे महामार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जातात आणि शेतकऱ्यांना या महामार्गासाठी आपल्या जमिनीचा तुकडा गमवावा लागतो. म्हणूनच रस्ते बांधणीसारखी योजना चांगली असली तरी एकमेकांच्या हितसंबंधांमुळे अशा प्रकल्पांना विरोध केला जातो.

अशीच परिस्थिती जपानमधे उद्भवली तेव्हा तिथे या समस्येवर तोडगा म्हणून एक मधला मार्ग काढण्यात आला. जपानमधील ओसाका शहारातील गेट टॉवर बिल्डिंगचे मालक आणि जपानी सरकार यांनी केलेला हा करार थोडा विचित्र वाटत असला तरी, खूपच प्रेरणादायी आहे हे नक्की.



एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुएझावा सांग्यो या कोळसा आणि लाकडाचा व्यापार करणाऱ्या कंपनीने हा प्लॉट विकत घेतला होता. याठिकाणी त्यांनी बांधलेली इमारत अनेकवर्षे तशीच पडून होती. इमारतीची पडझड झाली तरी त्यांनी तिची डागडुजी केली नाही. १९८३ साली सरकारने ओसाका शहराच्या या भागाचा विकास करण्यासाठी इथे काही विकास कामे उभी करण्याचे ठरवले.

त्यांच्या या योजनेत हानशीन महामार्ग ओसाकाला जोडण्याच्या प्रकल्पाचाही समावेश होता. हा महामार्ग कुठे बांधला जाणार याचे नियोजन आधीच तयार होते. परंतु ज्या जागेतून हा रस्ता जाणार होता त्या जागेचे मालक महामार्गासाठी जागा द्यायला तयार नव्हते. सरकार आणि जागामालक यांच्यात पाच वर्षे हा वाद असाच चिघळत राहिला. शेवटी दोन्ही बाजूला मान्य होईल असा एक अंतरिम तोडगा काढण्यात आला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

इमारतही आहे त्याच ठिकाणी उभी राहिली आणि आहे त्या नियोजित जागेवरूनच रस्ताही झाला. या महामार्गासाठी इमारतीच्या पाचव्या मजल्यापासून ते सातव्या मजल्यापर्यंतच्या जागेत महामार्ग बांधण्यात आला. या इमारतीचे आणि त्यातून जाणाऱ्या महामार्गाचे बांधकाम १९८९ साली एकदमच सुरु झाले आणि १९९२ साली ते पूर्ण झाले.

अशा पद्धतीची इमारत जपानमध्येही पहिल्यांदाच बांधली जात होती. त्यामुळे ही इमारत कशी होईल, यासाठी सगळ्या बाजूंचा विचार करून आढावा घेतला गेला. यासाठी शहर नियोजन कायदा, महामार्ग बांधकाम कायदा आणि इमारतींचे नियमन या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करून मगच या इमारतीचे आणि त्यातून जाणाऱ्या रस्त्याचे डिझाईन करण्यात आले.

इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महामार्गावरून होणाऱ्या रहदारीचा कसलाही त्रास होणार नाही यासाठी इमारतीचे बांधकाम करताना खास गोष्टींची काळजी घेण्यात आली आणि त्यासाठी नवनवे तंत्रज्ञान वापरण्यात आले. इमारतीच्या ज्या मजल्यातून हा रस्ता जातो त्याच्या सभोतालच्या भिंती साउंडप्रुफ करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या पाचव्या मजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंतच्या जागेत बोगदा तयार करण्यात आला असून, हा रस्ता त्याच बोगद्यातून जातो. बोगदा आणि इमारतीच्या भिंती एकमेकांपासून अलग ठेवण्यात आल्या आहेत. या बोगद्याच्या बाजूला इमारतीच्या ज्या भिंती येतात तिथे फक्त इमारतीच्या कामकाजासाठी आवश्यक ती मशिनरी आणि लिफ्टला जाण्या-येण्याला मार्ग एवढ्याच सोयी करण्यात आल्या आहेत.

इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील आवाज, गाड्यांमुळे बसणारे हादरे, असला कसलाच त्रास जाणवत नाही. या इमारतीला एकूण सोळा मजले आहेत ज्यातील फक्त तेरा मजले वापरले जातात आणि तीन मजल्यांच्या ठिकाणी रस्ता बांधण्यात आला आहे.

इमारतीत जी लिफ्ट बसवण्यात आली आहे, ती चौथ्या मजल्यानंतर थेट आठव्या मजल्यावरच थांबते. या इमारतीला भेट देणाऱ्या लोकांना यात काहीच वेगळेपण किंवा विचित्रपणा वाटत नाही. फक्त इमारतीच्या लिफ्टमधे चार नंबर नंतर थेट आठ नंबर दिसतो. मधल्या मजल्यांवर लिफ्ट थांबतच नाही.

हनशीन एक्स्प्रेसवेच्या या पट्ट्यात नेहमीच वर्दळ असते. कारण हा रस्ता थेट उमेदा या ओसाकामधील सर्वात मोठ्या खेड्याला जोडतो. ओसाका स्टेशनही या महामार्गापासून जवळच्याच अंतरावर आहे. उमेदामधून ओसाकाला ये-जा करणारा नोकरवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेट टॉवर बिल्डींगमधे येणारे कर्मचारीही याच महामार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे या महामार्गाचा हा भाग नेहमीच गजबजलेला असतो.

विशेष म्हणजे ओसाका शहराच्या नगर नियोजन विभागाकडून ज्या तीन मजल्यांचा वापर रस्त्यासाठी केला आहे त्याचे भाडे ग्रेट टॉवर इमारतीच्या मालकांना दिले जाते. म्हणूनच तर हा तोडगा काढणे शक्य झाले. नाहीतर आपल्याकडील विकास योजना जशा वर्षानुवर्षे रखडतात तशीच ती इथेही रखडली असती. जपान सरकारने ज्यांच्या जागेचा वापर या रस्त्यासाठी केला त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळेल याचीही खबरदारी घेतली आहे.

जपानला भेट देताना आवर्जून ओसाका शहरातील या ग्रेट टॉवर बिल्डींगला आणि तिच्यातून जाणाऱ्या हानशिन महामार्गालाही भेट दिली पाहिजे. इमारतीतून जाणारा रस्ता नेमका असतो तरी कसा हे एकदा पाहिल्याशिवाय कळणार नाही. ग्रेट टॉवर इमारतीच्या लिफ्टचाही अनुभव घेता येईल, ज्यात चौथ्यानंतर पाचवा मजला येतच नाही.

जपानी लोक आपल्या समस्येवर ज्याप्रकारे मार्ग शोधून काढतात त्याचप्रकारे जर सर्वांनीच आपल्या परिसरातील समस्यांवर मार्ग शोधून काढला तर कित्येक समस्या कमी कालावधीत सुटतील आणि त्याचा सर्वांनाच लाभ मिळेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

कर्णन – असा चित्रपट बनवायला बॉलिवूडला अजून किती वर्ष लागतील माहित नाही

Next Post

धैर्याने मुघलांना तोंड देणाऱ्या चांदबिबीची गोष्ट..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

धैर्याने मुघलांना तोंड देणाऱ्या चांदबिबीची गोष्ट..!

एकेकाळी लहानग्यांचे भावविश्व रंगवणारे टार्गेट मासिक आता फक्त आठवणीत उरले आहे!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.