The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जर कधी जेरुसलेमला गेलात तर या शिडीला चुकूनही हात लावू नका, नाहीतर दं*गली पेटतील

by द पोस्टमन टीम
23 May 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


हिंदुसाठी काशी, मुस्लिमांसाठी मक्का-मदिना तसेच ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र तीर्थस्थळ म्हणजे जेरुसलेम. या चर्चमधील प्रत्येक वस्तू पवित्र मानली जाते. हे चर्च इ.स. ४०० च्या सुमारास बांधले गेले. या चर्चमध्ये ख्रिस्ताच्या कृसिफिकेशन आणि रीसरकेशनचा दोन्हीच्या प्रतिमा एकत्र आहेत. या दोन्ही घटनांना ख्रिश्चन धर्मात खूप महत्त्व आहे. ख्रिश्चन धर्मातील अनेक पंथ आणि मठांनी या चर्चचे आपणच वारसदार असल्याचा दावा केला होता.

१७०० साली यातील सहा पंथीयांना या चर्चचे खरे वारसदार म्हणून मान्यता देण्यात आली.

द ग्रीक ऑर्थोडॉक्स, आर्मेनियन आपोस्टोलिक, रोमन कॅथलिक, कॉप्टिक ऑर्थोडॉक्स, सिरिक ऑर्थोडॉक्स आणि इथिओपियन ऑर्थोडॉक्स या सहा पंथांचा समावेश आहे. या चर्चच्या मालमत्तेवर या सहा पंथांचा आणि त्यांच्या चर्चचा अधिकार असल्याचे मान्य करण्यात आले.

पण, या सहा पंथांमध्ये पुढे जाऊन वाद निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आपसात एक करार केला आहे. १७५७ साली करण्यात आलेल्या या करारानुसार यातील सर्व पंथीय चर्चची आणि त्यांच्या सदस्यांची परवानगी असल्याशिवाय या चर्चच्या कोणत्याच भागात कसलाच बदल करता येत नाही.

चर्चची इमारत १८व्या शतकात ज्या स्थितीत होती अजूनही त्याच स्थितीत आहे. सर्वांनी एकत्र येऊन संमतीने तरी काही बदल किंवा आवश्यक तिथे दुरुस्ती करावयास हवी होती, पण तीही झालेली नाही. कारण, या विविध पंथांत एकमत होत नाही आणि पुढे जाऊन कुठलाही वाद नको म्हणून ते कुठलाच बदल करण्यास धजत नाहीत. अगदी या चर्चच्या एका खिडकी बाहेर एक लाकडी शिडी ठेवलेली आहे ती शिडीसुद्धा आजपर्यंत कुणी हलवलेली नाही आणि कुणी हलवूही पाहत नाही.



२५० वर्षापूर्वी जेव्हा हा करार करण्यात आला कदाचित तेव्हाच काही काम करायला आलेल्या एखाद्या गवंड्याकडून चुकून राहिली असेल पण तिही कुणी हलवलेली नाही. कुणी हलवूही शकत नाही. ही साधी शिडी जरी कुणी हलवण्याचा प्रयत्न केला तरी, या करारानुसार तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. या चर्चच्या वारसदारांकडून त्यांच्या करारातील प्रत्येक शब्द अगदी जशाच्या तसा पाळण्याचा आग्रह धरला जातो.

एक शिडीच काय या चर्चमधील कुठलीही वस्तू सहाही मालकांनी परवानगी दिल्या खेरीज इकडची तिकडे हलवता येत नाही. सहाही मालकाच्या परवानगीशिवाय अशा वस्तू हलवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तसे करणाऱ्याला कायदेशीररित्या शिक्षा तर होऊ शकते पण कदाचित यावरून या सहाही पंथाच्या अनुयायांत संघर्ष उसळू शकतो.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

एका शिडीवरून कशाला उसळेल संघर्ष असा कितीही तार्किक विचार आपण केला तरी, धार्मिक भावना किती नाजूक असतात आणि त्या कशा उफाळून येऊ शकतात हे आपण अनेकदा अनुभवलेलं आहे. गंमत म्हणजे याला कुठल्याच धर्माचे लोक अपवाद नाहीत.

२००२ साली इथे आलेला एक कॉप्टिक संत या चर्चमधील एका खुर्चीत बसला होता. थोडेसे ऊन लागते म्हणून त्याने आपली खुर्ची उचलून सावलीत ठेवली. झाले..! उरलेल्या पाचही पंथीय सदस्यांनी त्याच्या या वागण्यावर आक्षेप घेतला. कारण शेवटी ती खुर्ची काही त्या एकट्या साधूची वैयक्तिक संपत्ती नव्हती तर ती त्या सहाही पंथीय अनुयायांची सामुहिक संपत्ती होती, जी त्याने इतर पाच पंथीय सदस्यांची अनुमती न घेता हलवली होती. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून हा आमच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे जाहीर केले.

या सहाही पंथीय अनुयायांच्यात एवढ्याश्या गोष्टीवरून ठिणगी पडली. सगळ्यांनीच जेरुसलेममध्ये एकत्र येऊन याविरोधात आंदोलन केले. अचानकच या आंदोलनाला हिं*सक वळण लागले. ज्यात डझनभर संत गंभीर जखमी झाले होते.

एक खुर्ची इकडून तिकडे ठेवल्याच्या कारणावरून जर एवढा वादंग उफाळून येत असेल तर कोण कशाला चर्चच्या बाहेर पडलेली ती लाकडी शिडी उचलायला जाईल.

त्यानंतर २००८ सालीही असाच प्रकार घडला. २००८ साली अर्मेनियन संत या चर्चमध्ये एक उत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. तेव्हा त्यांनी तिथे आलेल्या एका ग्रीक संताला या उत्सवात सामील करून घेतले नाही. यावेळीही अनेक ग्रीक संत जेरुसलेममध्ये जमले आणि त्यांनी हा उत्सवच साजरा न होऊ देण्याची भूमिका घेतली. यातूनच तिथे मोठा गदारोळ मजला. संतांची भांडणे मिटवण्यासाठी शेवटी पोलिसांना चर्चमध्ये येणे भाग पडले आणि त्यांनी त्यातील दोन संतांना अटक केली. या घटना घडल्यानंतर या चर्चच्या आणि त्यातील मालमत्तेच्या बाबतीत ख्रिश्चन धर्मीय लोक अधिकच सजग झाले आहेत.

अनेकदा छोट्या छोट्या कारणावरून चर्चच्या सहाही मालकांमध्ये एकी न झाल्याने अशाप्रकारे वादाचे प्रसंग निर्माण झालेले आहेत. म्हणूनच तर त्या खिडकी बाहेर ठेवलेल्या लाकडी शिडीलाही कुणी कुणाला हात लावू देत नाही. खरे तर ही शिडी नेमकी तिथे कशी आणि कधी आली याबद्दलही कुणालाच ठोस माहिती नाही. कुणीही कुणालाही तिथे शिडी ठेवताना पाहिलेले नाही.

काही लोकांच्या मते अंदाजे ३०० वर्षापूर्वी एक गवंडी तिथे काही तरी छोटे-मोठे दुरुस्तीचे काम करायला आला होता आणि त्याच्याकडूनच चुकून ती शिडी तिथे विसरली गेली असेल. पण, त्यानंतर १७५७ चा तो करार झाला आणि चर्चशी संबधित नसलेली ती शिडीही तिथेच अडकून पडली.

१७२८ साली एका चित्रकाराने या चर्चचे रेखाचित्र रेखाटले आहे, त्यातही ही शिडी त्या ठिकाणीच असलेली दिसते. 

त्यानंतर १७५७ साली काढलेल्या चित्रातही ही शिडी तिथेच पाहायला मिळते आणि आजही ती शिडी तिथेच आहे. तिची जागा तसूभरही बदललेली नाही.

१९६४ साली पोप पॉल सहावा यांनी असा आदेश काढला होता की जोपर्यंत कॅथोलिक आणि अर्थोडॉक्स चर्चमध्ये एकमत होत नाही तोपर्यंत ती शिडी तिथेच राहील. आजच्या घडीलाही या दोन चर्चेसमध्ये कुठल्या मुद्द्यावर एकी होईल याची शाश्वती कुणीही देणार नाही आणि पुढेही ती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ती शिडीही तिथून हलण्याची शक्यता नाही.

१९९७ साली एका व्यक्तीने ती शिडी तिथून चोरली होती, पण नंतर सगळीकडे एकच हलकल्लोळ मजला. पोलिसांवरही या घटनेचा ताण आला, परिस्थिती चिघळल्याचे लक्षात आल्यावर त्या चोरानेच ती शिडी पुन्हा होती त्याठिकाणी आणून ठेवली. त्यानंतर २००९ साली फक्त साफसफाई करण्यासाठी ती शिडी हलवण्यात आली होती. पण आजही कुणी त्या शिडीला हात लावण्याचे धाडस करत नाही.

तुम्ही इथून पुढेही जेव्हा केव्हा जेरुसलेमला भेट द्याल तेव्हा ती शिडी तुम्हाला त्याच ठिकाणी दिसेल. जो कोणी त्या शिडीला हात लावण्याचा प्रयत्न करेल त्याची गाठ पोलिसांशीच पडेल, हा तिथला साधा नियम आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फिट्सचा आजार असल्यामुळे ब्रिटिश राजघराण्याने या प्रिन्सला कधीच जगासमोर येऊ दिलं नाही

Next Post

तमन्नाची हॉटस्टारवर रिलीज झालेली ‘नोव्हेंबर स्टोरी’ वेबसिरीज कशी आहे..?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

तमन्नाची हॉटस्टारवर रिलीज झालेली 'नोव्हेंबर स्टोरी' वेबसिरीज कशी आहे..?

दुसऱ्या महायु*द्धात हा कार्यकर्ता चक्क धनुष्यबाण घेऊन लढला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.