The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फिट्सचा आजार असल्यामुळे ब्रिटिश राजघराण्याने या प्रिन्सला कधीच जगासमोर येऊ दिलं नाही

by द पोस्टमन टीम
7 December 2024
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचम पहिल्या महायु*द्धाच्या काळात ब्रिटनच्या राजगादीवर बसला. राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांना एकूण सहा मुले. त्यांचा दुसरा मुलगा जॉन वयाच्या तेराव्या वर्षीच मरण पावला. जॉनला चौथ्या वर्षापासूनच फिट्स येण्याचा त्रास होता. अपस्माराच्या तीव्र झटक्यानेच त्याचा मृत्यू झाला. पण, राजा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी त्याला हा त्रास असल्याचे सत्य सर्वांपासून लपवून ठेवले. त्याच्या मृत्युनंतरच त्यांनी ही माहिती उघड केली आणि नंतर तर त्यांनी प्रिन्स जॉनच्या सगळ्याच आठवणी पुसून टाकल्या.

त्याच्या शेवटच्या दिवसांतही त्यांनी त्याला शाही परिवारातून वगळून टाकले होते आणि एकटे राहण्यास भाग पाडले होते. त्यांनी आपल्याच मुलाविषयी त्यांनी इतकी निर्दयी भूमिका का घेतली याचे कोडे मात्र अखेरपर्यंत उलगडले नाही.

जॉनचा जन्म १९०५ साली झाला. तो चार वर्षाचा झाल्यानंतर त्याला फिट्सचा त्रास सुरु झाला. जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांनी त्याच्यावर उपचार करण्याऐवजी आपल्या घराण्याची इज्जत सांभाळण्यासाठी त्याला घरापासून आणि समाजापासूनही दूर ठेवत होते. त्याच्या मृत्युपूर्वी दोन वर्षे आधीच त्याला सँडरिंगहम इस्टेटमधील वूड फार्मवर एकट्यालाच ठेवण्यात आले.

प्रिन्स जॉनला अशा प्रकारे विजनवासात पाठवण्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो घेण्यात आला होता. या फोटोमध्ये चार वर्षांचा जॉन आपला मोठा भाऊ प्रिन्स एडवर्डच्या मांडीवर बसला आहे. विशेष म्हणजे या फोटोवर शाही घराण्यातील चारही सदस्यांची हस्ताक्षरेही आहेत.

त्यामुळे या फोटोला जास्तच महत्व आले आहे. कदाचित प्रिन्स जॉनची शाही नॅनी किंवा केअर टेकर यांच्या मागणीवरून तो फोटो घेण्यात आला असावा. दोन वर्षांपूर्वी फोटो संग्रह करण्याचा छंद असलेल्या एका व्यक्तीच्या संग्रहात हा फोटो होता जो त्याने लिलावासाठी काढला. तेव्हा सर्वांचे लक्ष या फोटोतील छोट्या जॉनने वेधले होते. जॉनचा अकाली मृत्यूमागचे कारणही तेव्हाच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्याला शेवटच्या काळात इतकी क्रू*र वागणूक का मिळाली हे मात्र कुणालाही समजू शकले नाही.



४.५ X ३.७५ इंचाचा हा फोटो लिलावात काढण्यात आला तेव्हा त्याची सुरुवातीची किंमतच तीन हजार पौंड इतकी होती.

प्रिन्स जॉनला तेराव्या वर्षीच अपस्मारचा तीव्र झटका आला. घरापासून लांब राहत असताना त्याची नॅनी शार्लट बिल त्याची काळजी घेत असे. इतक्या लहान वयात झालेल्या त्याच्या दुःखद मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती हे कळल्यावर तर त्याहून जास्त धक्का बसेल.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

शाही घराण्यातील नोंदीनुसार जॉर्ज पंचम त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या जवळ नव्हताच, पण त्याच्या अंत्यविधीसाठीही तो हजर नव्हता. शाही घराण्याच्या ‘फॅमिली ट्री’मधून त्याचे नावही काढून टाकण्यात आले.

शाही घराण्याची सार्वजनिक प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रिन्स जॉनला इतर कुणासमोर येऊ तर दिले नाहीच पण, त्याच्या सर्व खाणाखुणासुद्धा मिटवण्यात आल्या.

प्रिन्स जॉनचा मोठा भाऊ प्रिन्स एडवर्डची प्रतिक्रिया तर खूपच थक्क करणारी होती. त्याने याबाबत एक पत्र लिहिले होते, जे अलीकडे २०१५ साली समोर आले. या पत्रात तो लिहितो, “त्याच्या मृत्यूने आम्हा सर्वांची सुटका केली होती. उलट आम्ही सगळेच यासाठी प्रार्थना करत होतो. वय वाढेल तशी जॉनची स्थिती अगदीच दयनीय होऊ लागली होती. त्याच्यात आणि एखाद्या जनावरात काहीच फरक राहिला नव्हता. हाडामांसाचा जिवंत गोळा म्हणूनच फक्त त्याला भाऊ म्हणावे लागायचे नाही तर त्याच्यात होतेच काय.”

अपस्मारसारख्या जीवघेण्या आणि सामाजिकदृष्ट्या कलंक म्हणून बघितल्या जाणाऱ्या आजारावर आजही परिणामकारक आणि प्रभावी औषध उपलब्ध नाही. त्यातही फिट्स येणाऱ्या व्यक्तीला समाजात एक वेगळी वागणूक मिळते. आजही या आजार असलेल्या व्यक्तींवर दीर्घकाळ आणि चिकाटीने उपचार केल्यास ती व्यक्ती पूर्णत: बरी होते, याबाबत समाजात जागृती करावी लागते. मग त्याकाळी या आजाराबद्दल किती गैरसमज असतील हे ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्याच वागणुकीवरून स्पष्ट दिसून येते.

जॉनला एकटे पाडले गेले, त्याला त्याच्या इतर भावंडांपासून दूर ठेवले गेले. त्याला वाळीत टाकल्याची भावना छळू लागली असावी म्हणून तो अधिकच खचला होता. त्याचे आई-वडीलही त्याला भेटण्याची टाळाटाळ करत असत. त्याचवेळी ड्युक ऑफ अल्बानी हा त्यांचा दूरचा नातेवाईक याच आजाराने ग्रस्त होता पण तो नंतर बरा झाला. कदाचित शाही कुटुंबाला असेही वाटले असेल की जॉनही यातून बरा होईल.

जॉन अकरा वर्षाचा होईपर्यंत आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. शाही परिवारातील इतर मुलांप्रमाणे त्यालाही सगळ्या सार्वजनिक कार्यक्रमात सण-समारंभात सामील करून घेतले जाई. त्याच्या अकराव्या वाढदिवसानंतर त्याची स्थिती खूपच बिघडते आहे, असे वाटू लागल्यावर त्याला घरापासून दूर ठेवण्यात आले.

२००८ साली त्याच्यावर जी डॉक्युमेंटरी बनवण्यात आली होती त्यामधे जॉनसोबत खेळणाऱ्या एल्सी होलिंग्जवर्थ या त्याच्या एका बालमैत्रिणीने ही माहिती दिली.

त्याचा स्वभाव कसा होता या प्रश्नावर ती म्हणाली, “तो खोडकर होता. दरवाजांच्या हँडल्सना गम लावून ठेवत असे, खुर्ची किंवा सोफ्यावर पिना लावत असे. त्याला विनोद सांगण्याची खूप आवड होती.” “मी एकदा आजारी असताना तो माझ्यासाठी चहा घेऊन आला होता,” ही आठवणही तिने सांगितली.

जॉनच्या आजारपणामुळे त्याला वेगळे ठेवण्यात आले असले तरी, शाही घराण्यातील इतर मुले जी कुटुंबासोबत राहत होती त्यांना खूपच प्रेमळ वागणूक मिळत होती असे काही नाही. जॉर्ज पंचम मुलांच्या बाबतीत खूपच खत्रूड होते असे सांगितले जाते. शिस्त पालनाच्या बाबतीत त्यांनी कुठल्याच मुलावर दया-माया दाखवली नाही. इतर मुलांनाही त्यांच्या अशा हेकेखोर स्वभावाचे परिणाम भोगावे लागलेच.

राजा जॉर्ज आणि मेरी या दोघांतही काहीसा भावनिक शुष्कपणा होताच. कदाचित तो त्यांना वारशातूनच मिळाला असावा. प्रिन्स जॉनच्या आयुष्यावर बेतलेली डॉक्युमेंटरी बनवताना त्याच्याबद्दल कुठेही काही लिखित पुरावे आढळले नाहीत. स्टीफन पॉलीकॉफनेही याच विषयावर आधारित नाटक बनवण्याचा विचार केला तेव्हा त्यालाही यासंदर्भात जास्त माहिती मिळाली नाही. शाही ग्रंथालयात त्याला सुरुवातीला अभ्यास करण्यासाठी परवानगी दिली गेली, पण प्रिन्स जॉनचा विषय काढताच त्याची ही परवानगी देखील रद्द करण्यात आली.

आज प्रिन्स जॉनचे अस्तित्व केवळ त्या फोटोतच शिल्लक आहे. नाही तर शाही परिवाराने कधीचाच त्याच्या सगळ्या खुणा पुसून टाकल्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय मुलाला अमानुषपणे पिंजऱ्यात कैद करून प्राणिसंग्रहालयात ठेवलं होतं

Next Post

जर कधी जेरुसलेमला गेलात तर या शिडीला चुकूनही हात लावू नका, नाहीतर दं*गली पेटतील

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जर कधी जेरुसलेमला गेलात तर या शिडीला चुकूनही हात लावू नका, नाहीतर दं*गली पेटतील

तमन्नाची हॉटस्टारवर रिलीज झालेली 'नोव्हेंबर स्टोरी' वेबसिरीज कशी आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.