The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी सोन्याची खाण असलेलं वागडू साम्राज्य

by द पोस्टमन टीम
7 December 2023
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पश्चिम अफ्रिकेतील घाना साम्राज्याची भरभराट सहाव्या ते तेराव्या शतकात झाली. पश्चिम सुदान सवाना प्रदेश, उत्तरेस सहारा वाळवंट आणि रेनफ़ॉरेस्ट या दरम्यान असणारं हे साम्राज्य समृध्द होतं. शेती आणि व्यापार अशा दोन्ही बाबतीत संपन्न असा हा प्रदेश होता.

प्राचीन काळातील अनेक राजवटींप्रमाणेच घाना साम्राज्यही समृध्द होतं. सोनं, लोह, तांबे आणि हस्तीदंत यांचा मुबलक साठा आणि व्यापारासाठी नायजर, सेनेगलसारख्या नद्या यांच्यामुळे घाना साम्राज्यात मोठ्या प्रमाणात व्यापार उदीम केला जात असे.

घाना याचा स्थानिक भाषेतील अर्थ आहे, राजा. त्यावरूनच या साम्राज्याला हे नाव दिलं गेलं असावं. घाना साम्राज्याची राजधानी होती कोम्बी सालेह.

या राजांच्या ताब्यात मोठे सोन्याचे साठे असल्यानं ही राजघराणी प्रचंड श्रीमंत होती. त्या काळात केवळ राजाच्याच ताब्यात सोन्याचे साठे असत त्यामुळे या साठ्यांवर केवळ त्यांचा हक्क होता. याच कारणामुळे घाना राजांची प्रतिष्ठा सर्वदूर उत्तर अफ्रिका आणि युरोपमधे पसरली. या साम्राज्याला सोन्याची खाण म्हणून ओळखले जाऊ लागले.

प्रदीर्घकाळ समृध्दी पाहिल्यानंतर इसवी सनाच्या शतकापासून घाना साम्राज्यात दुष्काळ, गृहयु*ध्द यांनी थैमान घातलं. भरीस नदीव्यतिरीक्त इतर व्यापारी मार्गही चालू झाले आणि सोसो राजवटीनंतर याला उतरती कळा लागली. माली साम्राज्यानंतर घाना साम्राज्य ढासळले.



घाना साम्राज्याची जीवनवाहिनी होती नायझर नदी. वर्षभर खळखळून वाहणाऱ्या या नदीला गवताळ प्रदेश तयार झाले आणि सवाना प्रदेशात सातत्याने मोठ्या प्रमाणात पूर येत राहिल्यानं या भागातली जमीन सुपिक बनली. साधारण साडेतीन हजार वर्षांपूर्वी या पुरामुळे शेतीसाठी पूरक अशी जमीन निर्माण झाली आणि या क्षेत्रातील वार्षिक पर्जन्यमानात यामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डाळी, कंद, फ़ळफ़ळावळ, लाल रंगाचा आफ्रिकन तांदूळ, बाजरी, तेलबिया यांना पूरक अशी जमीन असल्यानं याचं पिक मुबलक प्रमाणावर घेतलं जात होतं याशिवाय गुरंढोरं, मासेमारी आणि मेंढ्या वगैरे मोठ्या प्रमाणात पाळल्या जात. एकूणच घाना साम्राज्यात अन्नधान्याचीही संपन्नता होती.

घाना साम्राज्यात बहुतेक करून सोनिंके उर्फ़ सारकोले लोक रहात आणि ते मंडे म्हणजेच मॅण्डिगो भाषा बोलत असत. दक्षिण पूर्वेकडील नायजर नदी आणि नैऋत्येकडील सेनेगल नदी दरम्यान या लोकांची वसाहत असल्याचे पुरावे आढळतात. या नद्या आणि उत्तरेकडील सहारा वाळवंटात घाना साम्राज्य व्यापू शकेल अशा सपाट गवताळ प्रदेशांचा एक नैसर्गिक त्रिकोण बनला (आजच्या मॉरिटानिया आणि मालिचा दक्षिणेकडील भाग). या प्रदेशात रहाणार्‍या सोनिकेंना स्थानिक भाषेत वागडू किंवा मुस्लिम भूगोल शास्त्रज्ञ वांगरा असंही संबोधतात.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

घानाची राजधानी होती कोम्बी सालेह. सध्याच्या माली बाम्कोच्या उत्तरेकडे दोनशे मैलावर ही राजधानी होती. हे एकशेदहा एकरमध्ये पसरलेलं एक विस्तृत असं शहर असल्याचे पुरावे आहेत.

उत्खननात एक मोठी मशीद, एक मोठा सार्वजनिक चौक, सर्किट भिंत आणि स्मारक गेटचे अवशेष सापडले आहेत. या काळात सामान्यपणे घरं एकमजलीच असावीत असं एकूण अवशेषांवरून लक्षात येतं. चिखल आणि वाळलेलं गवत यापासून बनविलेल्या वीटांचं बांधकाम केलं जायचं तसेच याबरोबरच दगड आणि लाकडाचा वापरही केला जात असे. घाना राजा हा जनताप्रिय, न्यायी आणि धर्मप्रमुख होता असे म्हणतात.

पुरातत्त्व खात्यानं केलेल्या संशोधनात या साम्राज्यात मोठ्या प्रमाणावर धातूकाम होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. सहाव्या शतकातील काही वस्तू याचा पुरावा आहेत. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धातू काम केलं जात असल्याचं आणि त्यासाठी तांब्याचा वापर केला जात असावा असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे या उत्खननात सापडलेल्या मातीच्या भांड्यांच्या अवशेषांचे रासायनिक विश्लेषण केले असता त्या काळात टिकावू, सुबक अशी मातीची भांडीही मोठ्या प्रमाणावर बनविली जात असल्याचं आणि त्याचाही व्यापार केला जात असल्याचं निदर्शनास आलं.

घाना प्रदेश हा सोन्यासाठी प्रसिद्ध होता. इथून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे उत्खनन केले जात असावे आणि जलमार्गानं त्याचा व्यापार केला जात असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. मात्र हे सर्व कशाप्रकारे होत असावं याबद्दलचा त्या काळातला काही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही.

अकराव्या शतकाच्या आधीच्या घाना साम्राज्याबद्दल एकूणच संधिग्दता आहे याचं कारण या काळातला कोणत्याही प्रकारचा लिखित पुरावा उपलब्ध नाही. इतकंच काय घाना साम्राज्य नेमकं कधी अस्तित्वात आलं या संबंधीचाही ठोस असा काही पुरावा असल्यानं या साम्राज्याचा उदय साधारण इ.स. पूर्व सहाव्या शतकातला मानला जातो. मात्र या साम्राज्यावर ऐश्वर्याचा तळपता सूर्य इस. पूर्व ९ ते ११ या शतकात होता याबद्दल अभ्यासकांचं दुमत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

क्रिकेटमध्ये ‘बॉलरची’सुद्धा द*हश*त असू शकते हे मुरलीधरनने दाखवून दिलं

Next Post

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय मुलाला अमानुषपणे पिंजऱ्यात कैद करून प्राणिसंग्रहालयात ठेवलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय मुलाला अमानुषपणे पिंजऱ्यात कैद करून प्राणिसंग्रहालयात ठेवलं होतं

फिट्सचा आजार असल्यामुळे ब्रिटिश राजघराण्याने या प्रिन्सला कधीच जगासमोर येऊ दिलं नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.