The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरनेच आईनस्टाईचा मेंदू चोरला होता..!

by द पोस्टमन टीम
17 April 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आईनस्टाईन म्हटले की आठवते त्याचे संशोधन आणि त्याची प्रचंड बुद्धिमत्ता! आईनस्टाईनच्या सिद्धांतांनी भौतिकशास्त्रात मोलाची भर घातली. त्याचा सापेक्षतेचा सिद्धांत तर जगप्रसिद्ध आहे. त्याच्या भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी त्याला प्रसिद्ध नोबेल पुरस्कारही मिळाला होता. आईनस्टाईनने जे शोध लावले त्यातही त्याचा सापेक्षतेचा सिद्धांत खूप महत्त्वाचा समजला जातो. अशा या महान संशोधकाचा मेंदू नेमका कसा काम करत असेल याबद्दल सर्वांनाच कुतूहल असणार. साहजिक आहे ते!

आईनस्टाईनलाही हे माहिती होते की, त्याच्या पश्चात त्याच्या मेंदूचा, शरीरातील इतर अवयवांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न होणार. म्हणूनच आपल्यानंतर आपल्या मृतदेहाचे नेमके काय करायचे याबाबत त्याने स्पष्ट सूचना लिहून ठेवल्या होत्या.

आपल्या मेंदूचाच काय शरीरातील कोणत्याही अवयवाचा अभ्यास केला जाऊ नये अशी त्याची इच्छा होती. आपला देह जाळून त्याची राख सर्वत्र पसरावी अशी त्याने इच्छा व्यक्त केली होती. आपल्या पश्चात आपले भक्त तयार होतील या भीतीने त्याने ही इच्छा बोलून दाखवली होती.

१८ एप्रिल १९५५ रोजी आईनस्टाईनचा मृत्यू झाला, त्यावेळी थॉमस हार्वे या एका पॅथॉलोजीस्टने आईनस्टाईन किंवा त्याच्या कुटुंबीयांना कसलीच सूचना न देता आईनस्टाईनचा मेंदू काढून घेतला. काही दिवसांनी हार्वेने हे कृत्य केल्याचे उघड झाले, पण त्याने कशीबशी आईनस्टाईनचा मुलगा, हान्स अल्बर्टची समजूत काढली. त्यानेही विज्ञानात अधिक माहितीची भर पडावी या हेतूने नाखुशीने का होईना पण हार्वेला संमती दिली.

यानंतर अवघ्या काही दिवसांत हार्वेने प्रिन्स्टन हॉस्पिटलमधील नोकरी गमावली. आता त्याला फिलाडेल्फियाला जाणे भाग होते. आपल्यासोबत त्याने आईनस्टाईनचा मेंदूही नेला. त्याने आईनस्टाईनच्या मेंदूचे २४० भाग केले होते. हे सगळे भाग त्याने सिलॉइडिनमध्ये जतन करून ठेवले होते. त्याने हे सगळे भाग एका बरणीत जमवले होते आणि ही बरणी त्याच्या घराच्या तळमजल्यात लपवून ठेवली होती.



हार्वेची पत्नी त्याला सतत त्याने आईनस्टाईनचा मेंदू लपवून ठेवल्याची गोष्ट सगळ्यांसमोर उघड करेन अशा धमक्या देऊ लागली. तेव्हा हार्वेने घर सोडले आणि तो मिडवेस्टमधे गेला. तिथेही त्याने आपल्यासोबत हा सगळा जामानिमा नेलाच होता. काही कालावधीसाठी त्याने कान्सासमधील विचीटा येथे एका बायोलॉजी लॅबमध्ये मेडिकल सुपरवायझर म्हणून काम केले. इथेही त्याने आईनस्टाईनच्या मेंदूचे ते तुकडे सायडरमध्ये घालून तो बॉक्स एका बिअर थंड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनखाली लपवून ठेवला होता.

त्यानंतरही तो वेस्टन, मिसुरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेला. जिथे जाईल तिथे त्याला वेळ मिळेल तेव्हा तो या मेंदूचे निरीक्षण करून त्याचा अभ्यास करत होता. त्याचे मेडिकल लायसन्स रद्द करण्यात आले. यानंतर तो पुन्हा लॉरेन्स, कान्सास अशा ठिकाणी फिरत राहिला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

हार्वेने आईनस्टाईनच्या मृतदेहाचे विच्छेदन करत असताना कोणाच्याही परवानगीशिवाय त्याचा मेंदू स्वतःकडे ठेवला, तो इतर कुणाच्या हाताला लागू नये म्हणून तो नेहमी इथून तिथे तिथून इथे भटकत राहिला. त्याला वाटले होते की या मेंदूवर अभ्यास करून तो काही तरी ठोस संशोधन मांडू शकेल, पण दुर्दैवाने त्याचे हे स्वप्न पूर्ण झालेच नाही.

उलट त्याच्यावर नाना तऱ्हेचे आरोप मात्र झाले ज्यामुळे त्याला त्याची नोकरी गमवावी लागली, त्याचे लग्न मोडले आणि त्याला लपत छपत सगळीकडे भटकावे लागले. आईनस्टाईनच्या देहाचे शवविच्छेदन करून जेव्हा त्याने त्याचा मेंदू काढून घेतला तेव्हा त्याला वाटले होते की, जगातील सर्वांत अमुल्य वस्तू आपल्याकडे आहे, पण या अमुल्य वस्तूमुळेच त्याच्यामागे वर्तमानपत्राच्या पत्रकारांपासून ते अमेरीकन लष्करापर्यंत सगळेच हात धुवून मागे लागले.

दरम्यान आपल्या मित्रांमध्ये बसून तो आपल्याकडे आईनस्टाईनच्या मेंदूचे तुकडे असल्याच्या बाता मारत राहिला. हे तुकडे तो अभ्यासासाठी वेगवेगळ्या संशोधकांना देणार असल्याचेही तो सांगत होता. १९८५ साली हार्वे आणि कॅलिफोर्नियातील काही सहकाऱ्यांनी मिळून आईनस्टाईनच्या मेंदूचा अभ्यास करून त्याच्याबद्दल माहिती देणारी एक शोधपत्रिका प्रकाशित केली. या पत्रिकेत असा दावा करण्यात आला होता की, आईनस्टाईनच्या मेंदूत न्युरॉन्स आणि ग्लीया पेशींची संख्या जास्त आहे.

यानंतर आईनस्टाईनच्या मेंदूतील पेशींची रचना, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याच्या मेंदूची रचना याबद्दल माहिती देणारे पाच वेगवेगळे संशोधन प्रकाशित झाले. या संशोधकांच्या मते, आईनस्टाईनच्या मेंदूच्या अभ्यासातून हे स्पष्ट होईल की माणसाची बुद्धिमत्ता मेंदूतील नेमक्या कुठल्या घटकावर अवलंबून असते.

हार्वेने आईनस्टाईनच्या मेंदूचे वजन केले तेव्हा ते १२३० ग्रॅम इतके होते. आईनस्टाईनच्या वयाच्या व्यक्तींमध्ये मेंदूचे वजन याच्यापेक्षाही जास्त असते, आईन्स्टाईनच्या मेंदूचे वजन मात्र सामान्य लोकांच्या मेंदूपेक्षा कमी भरले.

त्याने याचे जे वेगवेगळे तुकडे केले होते ते जगभरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन्सकडे अभ्यासायला पाठवले. अनेकांनी हेच निष्कर्ष दिले की आईनस्टाईनचा मेंदू आणि सामान्य व्यक्तीचा मेंदू यात काही फारसा फरक नाही.

आईनस्टाईनच्या मेंदूमधे न्युरॉन्स आणि ग्लीअल पेशी यांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. ग्लीअल पेशीमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. आईन्स्टाईनच्या मेंदूच्या या भागातून एक गोष्ट सिद्ध झाली की, हा मेंदू विविध वैज्ञानिक कोडी सोडवण्यासाठी जास्त वापरला गेला आहे. कदाचित म्हणूनच न्युरॉन्स आणि ग्लीअल पेशींचे हे प्रमाण त्यामुळेच वाढले असेल.

त्यानंतर १९९६ साली बर्मिंगहॅमच्या अलाबामा विद्यापीठातील ब्रीट अँडरसन यांनीही आईनस्टाईनच्या मेंदूवर अभ्यास करून एक शोधनिबंध प्रकाशित केला. त्यांनाही असे आढळून आले की त्याच्या मेंदूतील न्युरॉन्सची संख्या आणि मेंदूच्या कंट्रोल ग्रुपमधील पेशींची संख्या एकसारखीच आहे. या पेशीची रचना दाटीवाटीची असल्याने त्यांनी सांगतिले ज्यामुळे कोणत्याही माहितीवर प्रक्रिया करणे सोपे जाते.

१९९९ साली कॅनडा येथील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या सँड्रा विटलसन यांनीही एक शोध निबंध प्रकाशित केला. यासाठी त्यांनी आईनस्टाईनच्या मेंदूचे फोटो अभ्यासले. त्यांच्या मते आईन्स्टाईनच्या मेंदूतील पॅरिएटल लोब्यूल हा भाग सामान्य माणसापेक्षा जास्त रुंद आहे. मेंदूचा हा भाग गणिती क्रिया आणि आजुबाजूची माहिती साठवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो.

२०१२ साली मानववंशशास्त्रज्ञ डीन फाल्कने हार्वेने आईनस्टाईनच्या मेंदूचे जे फोटो घेतले होते त्यावरून त्याच्या प्रत्येक भागाचा बारकाईने अभ्यास केला आणि खूप महत्त्वाचे निरीक्षण मांडले. आईनस्टाईनच्या मेंदूतील मिड-फ्रॉंटल लोबमध्ये एक जास्तीची वळी असल्याचे तिला आढळले. सामान्य माणसाच्या मेंदूत तीनच वळ्या असतात पण आईनस्टाईनच्या मेंदूमध्ये चार वळ्या होत्या. आईनस्टाईनच्या पेरिएटल लोब्जमधेही कमालीची विपरीत सममिती होती.

त्याच्या उजव्या मोटार स्ट्रीपवर एक एक मोठा गोळा तयार झाल्याचे तिच्या निदर्शनास आले. विशेषत: ज्यांना संगीताची आवड असते अशा लोकांच्या मेंदूत असे बदल झालेले दिसून येतात. आईन्स्टाईनला देखील पियानो वाजवण्याचा छंद होता.

त्याच्या डाव्या आणि उजव्या मेंदूला जोडणाऱ्या फायबर्स कंट्रोल ग्रुपमधील फायबरपेक्षा पातळ असलाचे दिसून आले. यावरून त्याच्या मेंदूच्या दोन्ही बाजूमध्ये उत्तम सहकार्य होते हे दिसून येते.

परंतु पेस युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक टेरेंस हाइन्स यांच्या मते, हार्वे आणि त्याच्या साथीदारांनी आईनस्टाईनच्या मेंदूचे जे काही संशोधन केले आणि त्यावरून जे निष्कर्ष मांडले ते पूर्णतः गोंधळात टाकणारे आहेत. त्यांच्या मते हे निष्कर्ष आईनस्टाईनच्या पूर्ण मेंदूचा एकत्रित अभ्यास करून काढलेले नाहीत तर त्याच्या मेंदूचे छोटे छोटे भाग करून मग त्याचा अभ्यासावरून हे निष्कर्ष काढलेले आहेत.

त्याच्या मेंदूच्या एका भागात न्युरॉन्स आणि ग्लीअल पेशींचा रेशो जास्त आढळून आला याचा अर्थ संपूर्ण मेंदूत न्युरॉन्सची संख्या जास्त होती असे मानणे चुकीचे ठरते. शिवाय त्याच्या मेंदूच्या फोटोवरून जे संशोधन मांडण्यात आले तेही संदिग्ध आहे. कारण, एकतर ते फोटो त्याच्याच मेंदूचे होते का याची शाश्वती देता येत नाही.

दुसरे म्हणजे, या फोटोच्या अभ्याससावरून त्याच्या पेरीएटल लोबवर जास्त वळ्या होत्या आणि त्याच्या मेंदूचा हा भाग १५% मोठा होता असे निष्कर्ष काढण्यात आले.

मेंदूतील हा भाग जर खरंच तितका प्रगत असता तर आईनस्टाईनचे गणिती कौशल्य असामान्य असायला हवे होते जे प्रत्यक्षात अजिबात नव्हते, असे प्रा. हाइन्स याचे मत आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आईनस्टाईन जन्मत:च या सगळ्या वैशिष्ट्यांसह जन्मला होता की, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्याच्या मेंदूत हे बदल झाले हेही सांगता येणे शक्य नाही. असा सगळा सावळा गोंधळ असतानाही विनाकारण त्याच्या मेंदूचा अभ्यास करण्यात विनाकारण पैसा, वेळ आणि उर्जा वाया घालवण्यात आली असे वाटते. कारण, या सगळ्या निष्कर्षातून कुठलीच ठोस माहिती हाताला लागलेली नाही.

याउलट, आईनस्टाईनच्या मेंदूचा अभ्यासच केला गेला नसता तर किमान हा सगळा खर्च आणि ऊर्जा तर वाचली असतीच, पण महत्त्वाचे म्हणजे त्याची इच्छा तरी पूर्ण झाली असती!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जिद्दीला पेटल्यावर माणूस काय करू शकतो..? या माणसाने डोंगर फोडला होता..!

Next Post

डोमेस्टिक क्रिकेटचा बॉस असलेल्या वसिम जाफरने इंटरनॅशनलचा नादच सोडून दिला

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

डोमेस्टिक क्रिकेटचा बॉस असलेल्या वसिम जाफरने इंटरनॅशनलचा नादच सोडून दिला

पाकिस्तानचा बाजार उठवण्यात 'जिया उल हक'चा सिंहाचा वाटा आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.