The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॉम्प्लॅन न पिता हा जगातला आजवरचा सर्वात उंच माणूस होता

by द पोस्टमन टीम
11 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काही लोक उंचच उंच तर काही एकदमच बुटकी असतात. जगातील सर्वात उंच आणि सर्वात बुटक्या व्यक्तींची दरवर्षी गिनीज बुकात नोंद केली जाते. आजपर्यंत जगातील सर्वात उंच व्यक्तीचा किताब मात्र रोबर्ट पेरीशिंग वॉड्लोच्याच नावावर आहे.

रॉबर्ट पेरीशिंग वॉड्लोची उंची ८ फुट ११.१ इंच होती. आज हयात असलेला जगातील सर्वात उंच माणूस सुलतान कोसेन देखील त्याच्यापेक्षा कमीच उंचीचा म्हणावा लागेल.

२२ फेब्रुवारी १९१८ रोजी एल्टन येथे रॉबर्टचा जन्म झाला. जन्मावेळी रॉबर्टची उंची सामान्य मुलांएवढीच होती. त्याचे आई-वडीलही सामान्य उंचीचे होते. तो एक वर्षाचा झाला तेव्हा साडे तीन फुटापेक्षा जास्त उंचीचा होता. तो शाळेत जाऊ लागला तेव्हा शाळेला त्याच्या उंचीनुसार बेंचेस बनवून घ्यावे लागले. आठव्या वर्षी तर तो त्याच्या वडिलांपेक्षाही मोठा दिसू लागला होता. १३ व्या वर्षी तो स्काऊटमध्ये जॉइन झाला तेव्हा तो ७ फुट ४ इंच उंच होता. त्याच्यासाठी युनिफॉर्म शिवताना १३ मीटर लांबीचे कापड लागत असे.

सामान्य मुलांमध्ये वयाच्या एका ठराविक टप्प्यावर उंची वाढण्यास कारणीभूत असणाऱ्या हार्मोन्सचा स्त्राव थांबतो आणि त्यांची उंची आहे तितकीच राहते. रॉबर्टच्या बाबतीत मात्र ही वाढ कधीच थांबली नाही. त्याच्या मृत्युपर्यंत त्याच्या शरीराची उंची वाढतच होती.



असे असले तरी रॉबर्ट इतर बाबतीत मात्र सामान्य मुलांसारखाच होता. त्याचा स्वभाव अतिशय शांत आणि समजूतदार होता. इतरांसोबतची वागणूक, शिस्त, संयम सगळेच गुण वाखाणण्याजोगे होते. लोक त्याला ‘जेंटल जायंट’ म्हणत असत. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याच्या गावातील लोक आजही त्याची आठवण काढतात.

पण तरीही, त्याच्या अति उंचीमुळे त्याला लोकांच्या विचित्र नजरा झेलाव्या लागतात. शिवाय, शारीरिक त्रास सहन करावा लागतो तो वेगळा, पण रॉबर्टने हे सगळे अतिशय संयमाने हाताळले.

तो शाळेत असताना त्याच्या शिक्षकांपेक्षाही उंच दिसायचा. उंचीने जरी तो अवाढव्य असला तरी त्याचे मन मात्र कोणत्याही सामान्य मुलाप्रमाणे निरागस होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९३७ साली तो जगातील सर्वात उंच व्यक्ती ठरला होता. हायस्कूलमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर रॉबर्ट एका शु कंपनीच्या प्रमोशनसाठी संपूर्ण देशभर फिरला होता. इंटरनॅशनल शु कंपनीने रॉबर्टला त्याच्या मापानुसार 39AA मापाचे शूज बनवून दिले होते. त्यानंतर त्यांच्या शूजचे प्रमोशन करणे हा रॉबर्टचे एक काम झाले. रिंग्लिंग ब्रदर्स सर्कस या सर्कस कंपनीसोबतही त्याने संपूर्ण देश पालथा घातला.

त्याला प्रवासाची आवड होती. तो नेहमीच कुठे ना कुठे भ्रमंती करत असे. प्रवास करतानाही त्याला खूप समस्या जाणवायच्या. सामान्य उंचीच्या कारमध्ये बसता येत नव्हते. म्हणून कारमधील सीट्स त्याच्या उंचीनुसार बदलाव्या लागत. फक्त त्याची उंचीच असामान्य होती असे नाही तर त्याचे केस, त्याचा शेविंग ब्रश, लायटर आणि शूज यांचे माप देखील असामान्यच होते.

रॉबर्टला फोटोग्राफी आणि पियानो वाजवण्याचा छंद होता, पण त्याच्या लांबलचक हातांमुळे या दोन्ही गोष्टी त्याला फारशा जमत नसत.

रॉबर्टची उंची सतत वाढत होती. कारण, त्याच्या पिट्यूटरी ग्लँडची वाढच थांबली नव्हती. त्याला हायपरप्लेसिया नावाचा आजार होता ज्यात पिट्युटरी ग्लँडमधून स्त्रवणाऱ्या ग्रोथ हार्मोनचे सिक्रीशन थांबत नव्हते. यामुळे त्याची उंची सतत वाढत होती. पण या सतत वाढणाऱ्या उंचीचा रॉबर्टच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागला. त्याला आपले वजन सांभाळणे कठीण होऊन बसले. त्याचे पाय आणि घोटे हळूहळू अशक्त होऊ लागले. चालताना त्याचे पाय लटपटत असत. त्याच्या पायांना त्याच्या शरीराचा भार पेलता यावा म्हणून त्यांना कृत्रिम आधार देण्यात आला.

विसाव्या वर्षीच त्याला चालताना काठीचा आधार घ्यावा लागला. त्याचे निधन झाले तेव्हा त्याचे वजन ४५० पौंड म्हणजे २०४.१२ किलो होते.

वाढत्या उंचीमुळे आणि वजनामुळे त्याच्या शरीरातील इतर अवयव आणि त्यांचे काम नीट होत नव्हते. त्याचे शरीर कमजोर होऊ लागले. त्याच्या पायात झालेल्या जखमेमुळे तो हैराण झाला होता. या जखमेतील संसर्ग वाढत होता. याच जखमेमुळेच १५ जुलै १९४० रोजी त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्युसमयी तो फक्त २२ वर्षांचा होता. त्याच्या मृत्युपूर्वी १८ दिवस आधीच डॉक्टरांनी त्याची उंची मोजली होती, जी ८ फुट ११.१ इंच होती. डॉक्टरांच्या मते तो जर आणखी काही वर्षे जगला असता तर, तो नऊ फुटापेक्षाही जास्त उंच झाला असता.

त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी खास शवपेटी बनवून घेतली होती. डझनभर लोकांनी ती शवपेटी उचलून घेतली होती. आजपर्यंतच्या उंच व्यक्तींच्या मृतदेहाची जशी चोरी झाली तसे काही रॉबर्टच्या बाबतीत घडू नये म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी १० फुट ६ इंच लांबीची, १००० पौंड वजनाची स्टीलची शवपेटी बनवून घेतली होती. ती शवपेटी दफन करून त्यावर कॉंक्रीट टाकण्यात आले.

रॉबर्टच्या एल्टन या गावात जिथे तो शाळेत गेला त्याठिकाणी आजही त्याचा ब्राँझचा पुतळा उभारलेला आहे. हा पुतळा ८ फुट ११.१ इंच उंचीचा आहे. या पुतळ्याला आजही त्या गावातील लोक एखाद्या जिवंत माणसासारखीच वागणूक देतात.

या गावात आज रॉबर्टला प्रत्यक्ष पाहिलेले लोक खूप कमी आहेत. मात्र अनेक पुस्तके, मुलाखती यामधून त्याच्या आठवणी आजही या गावात जिवंत आहेत.

२०१८ साली रॉबर्टची जन्मशताब्दी झाली, पण आजही त्याच्या जन्मगावी त्याच्याबद्दल खूप आदर दाखवला जातो. हा सन्मान सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. अनेक ठिकाणी शूजच्या दुकानातून त्याच्या शूजची प्रतिकृती लावलेली दिसते. ‘रीप्लेज बिलीव्ह इट ऑर नॉट!’ या मनोरंजन क्षेत्रातील कंपनीनेदेखील रॉबर्टचे पुतळे त्यांच्या म्युझियममधे उभारलेले आहेत. उंचच्या उंच रॉबर्टच्या पुतळ्या शेजारी माणसे उभी राहिली की जेमतेम त्याच्या कमरेपर्यंतच पोहोचू शकतात. लहान मुलांना तर हा भला मोठा पुतळा पाहून गंमतच वाटते.

रॉबर्टनंतर त्याच्या इतकी उंची असणारा दुसरा व्यक्ती कोणीही झाला नाही. म्हणूनच इतिहासातील सर्वांत उंच व्यक्ती म्हणून आजही रॉबर्ट वॉड्लोचेच नाव घेतले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अपघातात एक डोळा गमावून पण टायगर पतौडींनी मैदान गाजवलं होतं

Next Post

ही आहे हॉलिवूडमध्ये हवा करणाऱ्या भारतीयांची यादी

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

ही आहे हॉलिवूडमध्ये हवा करणाऱ्या भारतीयांची यादी

आपल्या घरचा बल्ब वर्षभर टिकत नाही पण हा बल्ब शंभर वर्षे सलग चालू आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.