The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युरोपमध्ये जुन्याकाळी औषधासाठी मृतदेहांची तस्करी केली जायची

by द पोस्टमन टीम
29 March 2025
in आरोग्य, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब 


डोकेदुखी असो वा ब्रेन ट्युमर, आज आधुनिक वैद्यकशास्त्रात अनेक आजारांवर औषधं उपलब्ध आहेत. ज्या आजारांवर औषध उपलब्ध नाही, अशा आजारांवर उपचार करण्यासाठी काही ना काही उपाय देखील आहेत. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा लोकांकडे उपचार करण्यासाठी अशी कुठलीच व्यवस्था नव्हती. सुरुवातीपासूनच विविध रोगांवर मानवाने मात केली आहे. अनेक उपचार पद्धती मानवाने विकसित केल्या आहेत.

युनानी, हर्बल, आयुर्वेद, होमियोपॅथी आणि ॲलोपॅथी यांचा समावेश या उपचार पद्धतीत होतो. आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्राचा इतिहास हा फार जुना आणि क्लिष्ट स्वरूपाचा आहे, त्यावरच आज आपण नजर टाकूया…

१६०० ते १७०० इसवी सन पूर्व या काळात युरोपातील काही भागात डोकेदुखी, फिट येणे, खोकला, अल्सर आणि इतर कुठल्या साथीच्या आजरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मानवी देहाचा वापर करण्यात यायचा.

लोक रक्त एखाद्या औषधाप्रमाणे प्राशन करायचे. लोक शरीराचे मांस आणि हाडं हे औषध समजून खायचे.

असं करणं त्यावेळी फार नॉर्मल होतं, यावर सहजासहजी कोणाचाच आक्षेप नसायचा. मृत व्यक्तीच्या शरीराला औषध म्हणून वापरताना ही त्या मृतांना वाहिलेली एक श्रद्धांजली आहे, अशा प्रकारे त्या औषधीचे सेवन करायचे. मानवी शरीराचे अवयव त्याकाळी लोक एखाद्या खाद्यपदार्थासोबत सेवन करायचे.



युरोपातील लोक हीच उपचारपद्धती वापरत होते, ते इजिप्तच्या पिरॅमिडमधील थडगे चोरून आणायचे व त्या थडग्याची हाडे चावली तरी रोगमुक्त होता येते, अशी श्रद्धा ते लोक बाळगून होते. अमेरिकेत मात्र अशा प्रकारच्या उपचार पद्धतीला तीव्र विरोध दर्शविण्यात आला होता.

प्राचीन इजिप्तमध्ये लोक मृत व्यक्तीच्या थडग्याला एका पेटाऱ्यात बंदिस्त करून पिरॅमिडमध्ये ठेवायचे. ज्यावेळी मृत व्यक्तीच्या देहातील एखाद्या भागातून रक्तस्त्राव व्हायचा त्यावेळी शरीराचा तेवढा भाग कापून इजिप्तचे लोक त्याचे सेवन करायचे. मृत व्यक्तींच्या कवट्या एकत्र करून त्यांची भुकटी हे लोक तयार करायचे आणि त्या भुकटीचा डोकेदुखी पळवण्यासाठी वापर करायचे. कवट्यांच्या भुकटीपासून तयार करण्यात येणाऱ्या औषधांमध्ये युरोपियन लोक साखर अथवा चॉकलेट मिसळून त्याचे सेवन करायचे.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इजिप्त आणि मध्य युरोपात अशी उपचार पद्धती प्रचलित होती. लोक उपचारासाठी पिरॅमिड खोदून काढत त्यातील थडगे बाहेर काढत. इजिप्तमधून त्याकाळी या थडग्यांची यूरोपात तस्करी करण्यात येत होती. युरोपात या मम्मीचे मांस आणि रक्त हे ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी वापरले जायचे.

१५९४ साली फ्रेंच चिकित्सकांचा एक ग्रुप इजिप्तच्या यात्रेवर निघाले. त्यांनी तेथील अनेक पिरॅमिड तोडून टाकत तिथल्या थडग्यांना गोळा केले. या सर्व थडग्यांचा वापर त्यांनी औषधनिर्मितीसाठी करण्यास सुरुवात केली. फ्रेंच राजा फ्रान्सिस आणि महाराणी कॅथरीनच्या सांगण्यावरून त्यांनी हा प्रताप केला होता.

असं म्हणतात की उपचारासाठी औषधाची कमतरता भासायला नको म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह एकत्र केले होते. युरोपियन लोक एखाद्या जखमेवर उपचार करण्यासाठी त्या जखमेला मांसाचे तुकडे वापरून शेकायचे, मानवी मांसाने जखमा लवकर भारतात, असा विश्वास त्याकाळी लोकांना होता.

ज्या प्रेतांना पुरण्यात येत होते, त्यांच्यापासून देखील औषधं निर्माण करायच्या प्रक्रियेला युरोपियन लोकांनी शोधले होते. सडलेल्या मृत शरीराच्या डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचे शेवाळे तयार व्हायचे, युरोपात हेच शेवाळ काढून औषधांची निर्मिती करण्यात येत होती. वाढत्या रक्त प्रवाहाला थांबवण्यासाठी लोक या औषधाचा वापर करायचे. या औषधामुळे काही क्षणातच रक्त प्रवाह सामान्य होई.

त्याकाळात मध फार प्रसिद्ध होते, आजप्रमाणे तेव्हा देखील मधाचा वापर लोक औषध म्हणून करायचे फक्त फरक इतकाच असायचा की लोक मधामध्ये रक्त मिसळून त्याचे सेवन करायचे. एखाद्या प्रेतातील रक्त काढून घेत त्या रक्ताला मधात एकत्र करण्यात येई, यामुळे हे रक्त लवकर खराब होत नसे व लोक त्याचा औषध म्हणून वापर करत.

६ व्या शतकात पॅरासेल्युलस नावाच्या एका चिकित्सकाने माणासाचे ताजे रक्त पिणे हे शरीरासाठी फायदेशीर असते, असा अजब दावा केला होता. नवयुवकांनी या रक्ताचे सेवन करावे, यासाठी तो फार आग्रही होता. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही लोकांनी रक्तदानाला आपला व्यवसाय बनवले होते. अनेक लोक फक्त यासाठीच स्वतः रक्तदान करायचे. काही लोक यु*द्धात मेलेल्या सैनिकांचे रक्त यासाठी गोळा करायचे.

मृत व्यक्तीच्या शरीरापासून एक पेस्ट तयार करण्यात यायची व त्या पेस्टचे सेवन डोकेदुखी पळवण्यासाठी केला जायचा. पोटदुखीवर उपाय म्हणून देखील ही पेस्ट दिली जायची. महिलांना त्यांच्या मासिक पाळीचा जास्त त्रास होऊ नये म्हणून नवजात शिशूंच्या नाळेपासून औषधांची निर्मिती केली जायची.

मध्ययुगीन युरोपात अनेक विचित्र उपचार पद्धती होत्या. या अशाच काही विचित्र उपचार पद्धतींचे वर्णन करणारे एक पुस्तक लंडन येथे १६९० साली लिहिण्यात आले होते. ‘द ट्रेज़री ऑफ़ ड्रग्स अनलॉक‘ नावाच्या या पुस्तकात त्याकाळातील मृत मानवी शरीराचा वापर करून करण्यात येणाऱ्या विविध रोगांवरील उपचारांचा उल्लेख करण्यात आला होता.

१७ व्या शतकापर्यंत ही औषधे वापरात होती. पुढे आधुनिक वैद्यकशास्त्राचा जसा विकास होता गेला तशी ही विचित्र व किळस आणणारी उपचार पद्धती मागे पडत गेली. १८ व्या शतकात मात्र या अघोरी उपचार पद्धतींवर कायमचीच बंदी घालण्यात आली. विशेष म्हणजे युरोपमध्ये हा सगळा मूर्खपणा सुरु असताना भारतात मात्र आयुर्वेद आणि सुश्रुतचा प्रभावी वापर होत होता. 

आज आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला उपचारासाठी मानवाच्या अवयवांपासून तयार करण्यात आलेली औषधे सेवन करावी लागत नाहीत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

इस्राईल-इजिप्तच्या वादात सुएझ कॅनल आठ वर्षे बंद होता

Next Post

तुमच्या गुंतवणुकीची दामदुप्पट केव्हा होणार..? शोधा या सोप्या ‘ट्रिक’ने..!

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
Next Post

तुमच्या गुंतवणुकीची दामदुप्पट केव्हा होणार..? शोधा या सोप्या 'ट्रिक'ने..!

रशियाने खोदली होती नरकात घेऊन जाणारी विहीर!!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.