The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्या दिवशी हि*टल*रच्या हवाई दलाने ब्रिटनच्या आकाशात अक्षरशः तांडव केलं होतं

by द पोस्टमन टीम
21 December 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इतिहासातील काही घटना कितीही क्रू*र आणि वेदनादायी असल्या तरी त्यातून मिळणारे धडे शिकण्यासारखे असतात.

जर्मनचा सर्वेसर्वा हि*टल*रच्या महत्त्वाकांक्षा किती मोठ्या होत्या हे तर सगळ्यांनाच माहिती आहेच आणि या महत्त्वाकांक्षांनीच जगाला दुसऱ्या महायु*द्धाच्या खाईत लोटले हेही आपल्याला माहिती आहे. परंतु शेवटी हि*टलरचा कसा दयनीय अंत झाला हेही आपण पहिले.. दुसऱ्या महायु*द्धात हि*टल*रची सर्व आघाड्यांवर सरशी होत होती.

पण अचानक असे काय झाले की हि*टल*रला आत्मह*त्येचा मार्ग स्वीकारावा लागला?

सगळीकडे मिळणाऱ्या विजयाने हि*टल*र आंधळा झाला होता. संपूर्ण जग पादाक्रांत करण्याची आपली इच्छा त्याला आता आवाक्यात आल्याचे दिसत होते. त्याने फ्रांसवर कब्जा मिळवला होता. आणि आता त्याला ब्रिटनवर कब्जा मिळवायचा होता.



ब्रिटनशी यु*द्ध करणे किती महागात पडेल याची जाणीव असतानाही हि*टल*रने हे वेडे धाडस केले आणि इथेच त्याने आपल्या विनाशाचा पाया रचला. हि*टल*रच्या अपयशाचा पाया रचून हुकुमशाहीला प्रत्युत्तर देणाऱ्या ‘बॅटल ऑफ ब्रिटन’विषयी फार कमी लोकांना माहिती असेल.

जर्मनीवर निरंकुश सत्ता प्राप्त झाल्यावर हि*टल*रला आपण काहीही करू शकतो असा भ्रम निर्माण झाला होता आणि याच भ्रमात त्याने ब्रिटनवर कब्जा मिळवण्याची योजना आखली. तसेही त्याकाळात हि*टल*र खरोखर एक शक्तिशाली हुकुमशाहा होता. त्याच्या एका इशाऱ्यावर त्याच्या लष्करातील तिन्ही दले कोणत्याही देशावर ह*ल्ला करण्यास तयारच होती. आपल्या या मजबूत सैन्यदलाच्या बळावरच त्याने सर्वत्र आपल्या नावाची द*हश*त माजवली होती.

असे असले तरी ब्रिटन काही छोटा देश नव्हता. त्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही अशी त्यांची ख्याती होती. शिवाय, ब्रिटनचे हवाई दल अत्यंत मजबूत होते. या हवाई दलावर मात करणे सोपे नव्हते. ब्रिटनवर ह*ल्ला करण्यापूर्वी त्यांच्या रॉयल एअर फोर्सला कसे तोंड द्यायचे याचे नियोजन करणे खूपच महत्त्वाचे होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

असे असले तरी हि*टल*रने आपला निर्णय बदलला नाही. त्याला ब्रिटनवर ह*ल्ला करायचाच होता. ब्रिटनवर कब्जा म्हणजे अर्ध्याअधिक पृथ्वीवर कब्जा एवढीच एक कल्पना त्याच्या डोक्यात घोळत होती. रॉयल एअर फोर्सला टक्कर देण्यासाठी त्याने आपल्या हवाई दलाला मैदानात उतरवले.

हि*टल*रचे हवाई दल आणि ब्रिटनचे रॉयल एअर फोर्समधील हे यु*द्ध आकाशातच लढले गेले. जर्मनीच्या हवाई दलाने जोरात तयारी केली. हि*टल*रने सैन्याला ह*ल्ला करण्याचा इशारा देताच ना*झी सैन्याची फाइटर विमाने ब्रिटनमध्ये घुसली तो दिवस होता १२ ऑगस्ट १९४०.

जर्मन हवाई दलाने रॉयल एअर फोर्सच्या रडार केंद्रांवर ह*ल्ले सुरु केले. ब्रिटनमधील मॅनस्टोन, लिम्पेन, केंट, ससेक्ससारख्या प्रमुख शहरांवरही ना*झी सैन्याने ह*ल्ले सुरु केले. रॉयल एअर फोर्सच्या रडार केंद्रातील जास्तीत जास्त विमाने त्यांनी नष्ट केली.

जर्मनी आपल्यावर असा काही ह*ल्ला करेल यापासून अनभिज्ञ असणाऱ्या ब्रिटनला या आकस्मिक ह*ल्ल्यामुळे चांगलाच धक्का बसला. पण आपल्या सैन्यावर आणि विशेषत: रॉयल एअरफोर्सवर ब्रिटनचा विश्वास होता. रॉयल एअरफोर्सनेही हा विश्वास खरा करून दाखवला.

ब्रिटनला आपली फायटर विमाने चालवण्यासाठी तज्ज्ञ, निष्णात आणि धाडसी वैमानिकांची गरज होती. आश्चर्य वाटेल पण यासाठी फक्त ब्रिटीश सैनिकच नाही तर पोलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे, बेल्जियम, फ्रांस, पोलंड आणि झेकोस्लोव्हाकिया अशा सगळ्या देशातून निष्णात वैमानिक या हवाई यु*द्धात भाग घेण्यास तयार झाले.

जर्मनीने हे यु*द्ध १२ ऑगस्ट १९४० रोजी सुरु केले आणि हे यु*द्ध आकाशातच लढले गेले, त्यामुळे त्यांनी या दिवसाला इगल डे असे नावही दिले होते. जमर्न सैन्याची लढण्यासाठी ब्रिटनने आपल्या वायू दलाचे तीन वेगवेगळे भाग पाडले.

ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्स आणि जर्मन वायुदलातील ही लढत बराच वेळ सुरु होती. कुठलाच देश माघार घेण्यास तयार नव्हता. या काळात संपूर्ण आकाश धुराने काळवंडून गेले होते.

ब्रिटनने अजिबात हार मानली नाही. जर्मनीला काहीही करून हरवणे आवश्यक होते. या यु*द्धात जर ब्रिटनचा पराभव झाला असता तर ब्रिटनचे भविष्यच अंध:कारमय झाले असते! संपूर्ण जगभर वसाहती करून आणि इतर देशांना गुलाम बनवणाऱ्या ब्रिटनवर हि*टल*रची गुलामी करण्याची नामुष्की ओढवली असती. शिवाय ब्रिटनच्या पराभवाने हि*टल*रला आणखी ताकद मिळाली असती. आधीच सर्वत्र सुरु असलेल्या अनाचार, गोंधळ आणि क्रूरतेत आणखी भर पडली असती.

हि*टल*रचा पराभव होणे आवश्यक होते म्हणूनच तर इतर देशांनीही ब्रिटनलाच या युद्धात सहाय्य केले.

दुसरीकडे जर्मनीला संपूर्ण विश्वात आपल्या ताकदीचा दरारा दाखवून द्यायचा होता. म्हणून त्यांच्यासाठीही हे यु*द्ध अटीतटीचेच होते. ब्रिटनने आपल्या हवेतच प्रभावी रक्षातंत्र उभारले. ब्रिटनच्या या योजनेची जर्मनीला थोडी देखील कल्पना नव्हती. ब्रिटनच्या या जाळ्यात जर्मनी फसली गेली. त्यामुळे जर्मनीचा पराभव झाला.

ब्रिटनने जर्मनची अनेक विमाने पाडली. पण ब्रिटनचे देखील या लढाईमुळे खूप नुकसान झाले.

हे यु*द्ध हरल्यानंतर हळूहळू हि*टल*रचा प्रभाव कमी कमी होऊ लागला. ना*झी सैन्याच्या अधोगतीला इथूनच सुरुवात झाली. हि*टल*रच्या महत्त्वाकांक्षेने सगळ्या जगाला वेठीस धरले होते पण, शेवटी पराभवाची कल्पना सहन न झाल्याने त्याने आत्मह*त्येचा मार्ग स्वीकारला.

हि*टल*रच्या अंतासोबतच महासंहारक ठरलेले दुसरे महायु*द्धही संपुष्टात आले मात्र, त्याची धग बराच काळ जाणवत राहिली.

त्यानंतर महायु*द्धाने शीतयु*द्धाचे रूप घेतले. एकमेकांवर उघड कुरघोडी करणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर छुप्या पद्धतीने कुरघोडी सुरु झाल्या. पण या संहारातून, यु*द्धामुळे कुणाचेच भले होत नाही आणि होणारही नाही ही साधी बाब महत्त्वाकांक्षी राष्ट्रांच्या गळी पुरती उतरलेली नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

फ्रांसला जायला परवडत नसेल तर पुद्दुचेरीला जाऊन या

Next Post

या माणसाने हि*टल*रच्या तावडीतून ११०० ज्यू लोकांची सुटका केली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या माणसाने हि*टल*रच्या तावडीतून ११०० ज्यू लोकांची सुटका केली होती

आई-वडिलांनी पाकिस्तान निवडला पण निदा फाजली शेवटपर्यंत भारतातच राहिले !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.