The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतःच स्वतःचा इन्कम टॅक्स कसा भरायचा शिकून घ्या..!

by द पोस्टमन टीम
11 March 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मार्च महिना आला की सगळ्यांना वेध लागतात आयकर परतावा अर्थात ITR भरण्याचे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परतावा भरता येतो.

याविषयी अधिक विस्ताराने जाणून घेऊयात..

आयकर विवरण अर्थात इन्कमटॅक्स रिटर्न्स म्हणजेच सरकारला आपल्या उत्पन्नाविषयीची माहिती देणं आणि त्या अनुषंगाने कर भरणे. जे प्रत्येक कमावत्या व्यक्तीला बंधनकारक आहे. हे एक प्रकारचं राष्ट्रीय कर्तव्यच आहे, जे प्रत्येक सुजाण भारतीयानं पार पाडलंच पाहिजे. मात्र हे रिटर्न्स भरताना काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी, ही माहिती योग्य प्रकारे भरली गेली नाही तर किंवा वेळेत आयकर विविरण आणि कर भरला नाही तर दंडही भरावा लागतो.

ITR फ़ॉर्म ऑनलाईन, ऑफ़लाईन आणि सॉफ़्टवेअरद्वारे, अशा तीन पद्धतीनं भरता येतो.

ITRसाठी सगळ्यात आधी तुम्हाला कोणता फ़ॉर्म भरावा लागणार आहे याची खात्री करून घ्या. जर तुमचा वार्षिक पगार/ उत्पन्न ५० लाखांहून कमी असेल तर तुम्हाला ITR-1 भरावा लागेल. यानंतर आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. हा फ़ॉर्म ऑनलाईन (ई-फ़ायलिंग) किंवा ऑफ़लाईन अशा दोन पद्धतीनं भरता येतो.



ऑनलाईन पद्धतीने फ़ॉर्म भरणं सोपं आणि सुलभ आहे. प्रत्येक प्रकारचा करदाता ऑनलाईन फ़ॉर्म भरू शकतो. आर्थिक वर्षातलं तुमचं उत्पन्न जर ५ लाख रुपये किंवा त्याहून जास्त असेल तर तुम्हाला फ़ॉर्म भरणं अनिवार्य आहे. परदेशात जर काही संपत्ती तुमच्या नावावर असेल तर आणि तुमच्या उत्पन्नाचे ऑडिट गरजेचं असेल तर त्यांनीही फ़ॉर्म भरणं अनिवार्य आहे.

फ़िजिकल फ़ॉरमॅटमधे (वास्तविक) ITR भरण्यापेक्षा ऑनलाईन भरणं तुलनेनं सोपं आणि सुरक्षित आहे. इंटरनेटचा वापर करत कधीही आणि कुठेही फ़ॉर्म भरण्याची सुविधा ऑनलाईन पध्दतीत आहे. आयकर विभागाच्या ऑनलाईन ITR फ़ायलिंग पोर्टलवरून (संकेतस्थळावरून) थेट आयकर भरू शकता (हीच सोय आता अनेक बॅंकाही ऑनलाईन देऊ करत आहेत. तुमच्या बॅन्केत ही सोय आहे का? याची माहिती घ्या.) किंवा जावा अथवा एक्सेल शिटमधूनही हा फ़ॉर्म भरु शकता. हे फ़ॉर्म भरल्यानंतर ऑफ़लाईन जाऊन प्रत्यक्ष देऊन यावे लागतात. या दोनही पध्दतीत फ़ॉर्म भरण्याची पध्दत साधारण एकसारखीच आली तरीही प्रक्रियेचा फ़रक आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

आयटीआरच्या ई-फ़ायलिंगसाठी सर्वात आधी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. यासाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

इथे सर्वप्रथम रजिस्टर ऍज ‘टॅक्सपेयर’ असा ऑप्शन सिलेक्ट करून रजिस्टर करा. यानंतर लॉग इन करा.

यानंतर ई फ़ाईल पर्याय निवडून त्यात इन्कम टॅक्स रिटर्न्सवर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर स्क्रिनवर एक नविन खिडकी उघडेल याठिकाणी तुमचा पॅन क्रमांक आधीच भरलेला दिसेल. यात तुम्ही ड्रॉप डाऊन मेन्यूत ॲसेसमेंट वर्ष निवडून ITR फ़ॉर्म निवडा. योग्य ती सर्व माहिती योग्य प्रकारे आणि अचूक भरल्याची खातरजमा केल्यानंतर फ़ॉर्म सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यातही प्रिपेअर ॲण्ड सबमिट ऑनलाईन हा पर्याय तुम्ही निवडू शकता. यात तुम्हाला, तुमच्या ITR ची शहानिशा (व्हेरीफ़ाय) कोणत्या पद्धतीनं करायची आहे याची निवड करु शकता. याचे दोन मार्ग आहेत, आधार किंवा नेट बॅन्किगच्या माध्यमातून आणि ITRच्या बंगलोरस्थित सेंट्रल प्रोसेसिंग यूनिटमधे पाठवून.

व्हेरिफ़िकेशन हा ITR चा शेवटचा टप्पा असला तरीही तुम्हाला आधीच तो पर्याय या टप्प्यावर निवडावा लागतो.

ITR भरत असताना तुम्हाला भाषा निवडीचा (इंग्रजी किंवा हिंदी) पर्यायही देऊ केला जातो. बॉक्समधे हा पर्याय असतो, तुम्हाला हव्या त्या भाषेवर क्लिक करून तुम्ही त्या भाषेत तुमचा फ़ॉर्म भरू शकता. सबमिट केल्यानंतर सर्वसाधारण सूचना नीट, काळजीपूर्वक वाचा. यानंतर उजव्या बाजूच्या टिकमार्कवर क्लिक करा. यानंतर तुमची ITR ऑनलाईन फ़ायलिंग प्रक्रिया चालू होईल.

ITR ऑनलाईन फ़ायलिंगचे सात टप्पे-

  1. सामान्य निर्देश
  2. उत्पन्नाची माहिती
  3. सवलतीबाबतचं विवरण
  4. आयकर मोजणी
  5. TDS आणि इतर टॅक्स चुकते केले असतील तर त्याची माहिती
  6. बॅन्क खात्याची माहिती
  7. व्हेरिफ़िकेशन (फ़ेरपडताळणी)

सामान्य निर्देश- याठिकाणी तुमची सर्वसाधारण माहिती असते. जसे की, संपूर्ण नाव, पॅन क्रमांक आणि इतर माहिती. वरवर बघता हे पान भरणं सोपं वाटत असलं तरीही हे पान भरण्यासाठी तुम्हाला टॅक्स नियमांची साधारण माहिती असणंही गरजेचं आहे. या फ़ॉर्ममधे काही माहिती आधीच भरलेली असते तर काही माहिती तुम्ही संपादित करू शकता. जसे की, बदललेला ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक इत्यादी. यानंतर आधार क्रमांक इत्यादी माहिती भरायची आहे. याठिकाणी एक लक्षात घ्यायला हवंय की, आयकर विभागाच्या सध्याच्या नियमांनुसार आधार क्रमांक जोडणं अनिवार्य आहे. आधार क्रमांकाशिवाय तुम्ही ITR फाईल करूच शकत नाही. आधारसाठी फ़ॉर्म भरला असेल मात्र अजून आधार क्रमांक मिळाला नसेल तर तुम्ही आधार एनरोलमेंट आयडीही याठिकाणी भरू शकता.

जर ITR  भरण्यात काही चूक झालेली असेल त्यामुळे तुम्ही रिवाईज रिटर्न भरत असाल तर तुम्हाला कोड १७सोबत रिवाईज्ड १३९ (५) निवडायचा आहे. मात्र यामधे तुम्हाला काही जास्तीची माहितीही द्यावी लागणार आहे.

एकदा पार्ट-एमध्ये तुम्ही सर्व माहिती भरून ती व्हेरिफ़ाय करून सेव्ह केली की फ़ॉर्मच्या पुढील टप्प्यावर म्हणजे उत्पन्न माहितीवर जायचं आहे. फ़ॉर्मच्या दुसर्‍या भागात तुम्हाला चालू आर्थिक वर्षातील तुमच्या उत्पन्नाविषयीची संपूर्ण माहिती भरावयाची आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव असतो. जसे की, बेसिक सॅलरी, HRA, विशेष भत्ते, अन्य भत्ते, रिएम्बर्समेंट इत्यादी. तुमचा जो पगार आहे त्याच्या प्रत्येक हिस्स्यावर टॅक्स भरावा लागत नाही. तुमच्या पगाराचा (उत्पन्नाचा) काही हिस्सा हा टॅक्सपासून मुक्तही असतो. याशिवाय काही गोष्टींच्या ठराविक भागावर टॅक्स बसतो. यादृष्टिनं तुम्ही तुमची सर्व कागदपत्र तयार ठेवली पाहिजेत. जेणेकरून ती उत्पन्नाच्या माहितीसोबत जोडता येतील.

यानंतरचा टप्पा आहे तो म्हणजे उत्पन्नाची विस्तृत माहिती. चार्टर्ड अकाऊंटंट याबाबतीत एक सल्ला असा देतात की, कधीही ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही एक्सेल शिटमधे तुमच्या उत्पन्न कराबाबतची माहिती नीट भरून हिशोब करा. यामुळे जेंव्हा तुम्ही साईटवर जाऊन माहिती भराल तेंव्हा कमी वेळ लागेल. इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर ITR  फाईल करण्यासाठी केवळ १५ मिनिटांचा वेळ असतो. यासाठी तुम्ही माहिती भरता तेंव्हा वेळोवेळी ते पेज सेव्ह करत चला. अन्यथा तुम्हाला दरवेळेस पहिल्यापासून माहिती भरावी लागेल. फ़ॉर्म १६ मधे याबाबतची सर्व माहिती असते. याशिवाय दर महिन्याला मिळणार्‍या सॅलरी स्लिपवरही काही माहिती असते.

हा लेख केवळ मार्गदर्शक आणि जुजबी माहितीसाठी आहे. तुमच्या उत्पन्न विवरणासाठी कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मजुराच्या मुलीने फेडरेशनला नडून देशासाठी कांस्यपदक आणलंय

Next Post

हा कसोटी सामना भारताच्या खिलाडूवृत्तीसाठी नेहमीच स्मरणात राहील

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

हा कसोटी सामना भारताच्या खिलाडूवृत्तीसाठी नेहमीच स्मरणात राहील

पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या एसपीजी गार्ड्सची नेमणूक कशी करण्यात येते ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.