The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार वेळा तोंडावर आपटलेला बाबर पाचव्यांदा आक्र*मण करायला आला आणि जिंकला

by द पोस्टमन टीम
2 December 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


१५२६ साली बाबरची नजर भारतावर पडली आणि त्याने भारत विजयाच्या मोहिमेचा नारळ फोडला. त्याने आपल्या सर्व सरदारांना एकत्र बोलावले आणि आपल्या सैन्यशक्तीला मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु केले. काबूलला संरक्षण मिळवून देण्यासाठी भारतावर विजय मिळवणे गरजेचे आहे, असं बाबरचं मत होतं. यासाठी अगोदर देखील त्याने चार वेळा स्वारी केली होती, पण दरवेळी त्याला अपयशाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे या भारत विजय अभियानात कुठल्याही प्रकारे सफल होणे, हेच त्याचे ध्येय होते.

त्याने यासाठी कमी सैनिक घेऊन जाण्याचे निश्चित केले. आपला मुलगा कमरानच्या हातात काबूलचा कारभार सोपवला आणि त्याने आपल्या निवडक पण ताकदवर सैनिकांना घेऊन भारताच्या दिशेने कूच केली. काबूलहुन बाबरचे सैन्य झेलम नदीच्या तटावर येऊन पोहचले. तिथे विश्रांती करून ते सिंधू नदी ओलांडून भारतात आले.

आपल्या मार्गात येणाऱ्या छोट्या छोट्या राज्यांना चिरडून त्यांच्या सैन्यशक्तीला स्वतःच्या गोटात सामील करत होता. यामुळे बाबरची ताकद वाढत गेली.

भारतात दाखल होण्यापूर्वी बाबरचा भारताशी खास संबंध होता. बाबर म्हणजे तैमूर लंगचा वंशज होता. तैमूरने देखील भारतावर आक्र*मण करून येथे असंख्य लोकांची कत्तल करून अमाप संपत्ती लुटली होती. तीच अपेक्षा घेऊन बाबर भारतात आला होता. बाबरला आयुष्यात आप्तस्वकीयांनी बऱ्याचवेळा फसवले असल्याने तो आपले प्रत्येक पाऊल सांभाळून टाकत होता. सशक्त योजना आणि मजबूत इराद्यांच्या बळावर त्याने अनेक ओळखीच्या लोकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली होती.

त्याने दिल्लीला आपला पहिला निशाणा बनवला. तो लहान लहान राज्यातील राजांना आपल्या जाळ्यात ओढत असे आणि आपली सैन्यशक्ती वाढवत असे. जो सरळ शरण आला त्याला सोबत घ्यायचे आणि जो विरोधात गेला त्याला चिरडून टाकायचे हीच बाबरनीती त्याने कायम वापरली होती.



भारतातील काही राजे एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत हे बघून येथे आपला साम्राज्य विस्तार करणे, अवघड नसल्याचे बाबरला लक्षात आले होते. त्याने आधी “फोडा आणि राज्य करा” नीती वापरून अनेक भारतीय राजांना आपसात लढवून मारलं. उरलेल्यांना आपल्या छत्राखाली घेऊन दिल्लीवर आक्र*मण करण्याची तयारी केली. यासाठी त्याने विशिष्ट प्रतिनिधी मंडळ देखील गठीत केले होते.

अनेक देशांच्या राजांच्या समर्थनाच्या बळावर बाबर आता भारतावर चालून आला होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

सुरतचा नवाब आणि मेवाडचा राणा सांगा दिल्लीच्या सुलतानाच्या विरोधात आहे हे बघून बाबराने त्यांचा दिल्लीला ताब्यात घेण्यासाठी वापर केला होता.

पंजाबचा शासक दौलत खान आपल्या स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत होता व हा देखील बाबराच्या हातचा प्यादा बनला. चार वेळा भारतावर आक्र*मण केल्यानंतर भारतात काय करावे आणि काय नाही, हे त्याला चांगलेच उमगले होते. १५१९ मध्ये त्याने पहिल्यांदा भारतावर आक्र*मण केले होते. त्याने बाजौर आणि आसपासच्या प्रदेशात प्रचंड रक्तपात केला. पण इथे त्याच्या विरोधात भिरा लोकांनी यु*द्ध केले, त्यामुळे त्याला हे रणमैदान सोडून पळ काढावा लागला होता.

पुढे त्याने १५२० मध्ये पेशावर वाटे आक्र*मण केले पण इथे देखील बदाखशने त्याच्या विरोधात आघाडी उघडली आणि बाबराचा डाव फसला. पुढे त्याने बजौरवर पुन्हा आक्र*मण केले आणि आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पण कंदहारमध्ये त्याच्या विरोधात अफगाणी उठाव करू लागले म्हणून त्याला परतावे लागले. वारंवार अपयश आल्याने तो एखाद्या जखमी प्राण्यासारखा चवताळला होता.

चार वर्षं थांबल्यानंतर तो पुन्हा भारताच्या १५२४ मध्ये भारताच्या स्वारीवर निघाला. हा चौथा प्रयास दौलत खानने ऐनवेळी दिलेल्या दग्यामुळे बारगळला. पाचव्या वेळी मात्र बाबर पूर्ण तयारीनिशी उतरला होता. काबूलची सत्ता आपल्या मुलाच्या हाती देऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये भारत ताब्यात घेणे हा एकमेव उद्देश तो बाळगून होता.

हळूहळू रस्त्यात येणारी प्रत्येक सत्ता हस्तगत करत आणि सैन्यशक्ती वाढवत बाबर दिल्लीजवळील पानिपत येथे येऊन पोहचला.

फक्त १२ हजार सैनिक सोबत घेऊन आलेल्या बाबराने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधीला यु*द्धासाठी आमंत्रित केले. इब्राहिम लोधीकडे बाबराच्या पाचपट सैन्य होते पण यु*द्धात मात्र बाबराच्या सैनिकांनी शब्दश: त्यांचे पानिपत केले.

तोफखान्याच्या बळावर बाबराने इब्राहिमचा पराभव केला. २१ एप्रिल १५२६ रोजी रणांगणात इब्राहिम लोधीने पडला आणि बाबराच्या हातात दिल्लीची गादी आली. बाबराने लोधीच्या ताब्यातील सर्वच राजवाड्यांवर आपला अधिकार निर्माण करत आपले वर्चस्व सिद्ध केले.

‘बाबरनामा’ या पुस्तकात बाबराने स्वतः तुलुगामा यु*द्धनीतीच्या बळावर सुलतानी फौजेला धूळ चारल्याचे वर्णन केले होते. दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर बाबराने भारतात मोठ्या प्रमाणात लूट आणि रक्तपात केला. तुर्क अफगाणी सुलतानांना हाकलून लावत त्याने मुघल साम्राज्य वसवले होते आणि स्वतःला ‘बादशहा’ म्हणून संबोधित करण्यास सुरुवात केली होती.

पण, मेवाडचा राणा संगा यांनी बाबाराला आव्हान दिले. राणा संगा यांच्यासाठी बाबर हा एक विदेशी लुटेरा होता/आहे आणि दिल्लीच्या गादीवर बसण्याचा त्याला अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. मुघल राजवट भारतात स्थापन होऊ देणे राणा सांगा यांना मंजूर नव्हते यामुळेच त्यांनी बाबराचा सामना करण्याचे ठरवले.

बाबरला देखील राणा संगा जिवंत असेपर्यंत भारतावर आपले राज्य स्थापित करता येणार नाही, हे माहिती होते. दोघांमध्ये १७ मार्च १५२७ मध्ये खानवा येथे मोठे यु*द्ध झाले. राणा सांगासमवेत मारवाड, ग्वाल्हेर, अजमेर, हसन खां, महमूद लोदी, बसिर चंदेरी हे लोक देखील बाबरच्या विरोधात संयुक्तपणे यु*द्ध लढायला उतरले होते.

पण बाबराने येथे पुन्हा एकदा ‘फोडा आणि राज्य करा’ नीती वापरून यांना आपसात लढवून शक्तिहीन केले, राणा सांगा यांचा पराभव केला व यु*द्धात विजय मिळवला.

अशाप्रकारे त्याने भारतात त्याने मुघल रियासतीला जन्म दिला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बाबराच्या क्रौर्याने घागरा नदीचा प्रवाह रक्ताने लाल केला होता

Next Post

या शीख सरदारांनी लाल किल्ल्यावर केसरी ध्वज फडकवत बादशाहची सत्ता उखडून टाकली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या शीख सरदारांनी लाल किल्ल्यावर केसरी ध्वज फडकवत बादशाहची सत्ता उखडून टाकली होती

विमानतळाची कडक सुरक्षाव्यवस्था भेदून विमान हायजॅक करणारा हा पठ्ठ्या अजूनही फरार आहे !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.