The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाबराच्या क्रौर्याने घागरा नदीचा प्रवाह रक्ताने लाल केला होता

by द पोस्टमन टीम
13 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


इतिहास साक्षी आहे की भारताने आजवर कुठल्याच देशावर ना आक्र*मण केले ना कुठले विजय अभियान चालवले. पण भारताने आपली संस्कृती आणि अस्तित्व वाचवण्यासाठी मोठा लढा जरूर दिला आहे. भारतात राजपुतांच्या इतिहासात १५२६ साली झालेल्या पानिपत आणि १५२७ साली झालेल्या खानवा यु*द्धाचे फार महत्त्व आहे. असंख्य सैनिकांच्या रक्ताने भारताच्या भूमीचा अभिषेक या दोन यु*द्धांमुळे झाला होता. हे यु*द्ध जरी काही काळाने समाप्त झाले तरी त्यांचा इतिहास चिरकालासाठी अमर झाला.

भारताच्या भूमीवर १५२९ साली अजून एक यु*द्ध लढण्यात आले होते, ज्याचा देखील इतिहास प्रसिद्ध आहे. हे यु*द्ध भारतीय राजे आणि आक्र*मक यांच्यात न होता, मुघल आणि अफगाणी सैन्यात झाले होते.

घागरा यु*द्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यु*द्धात सैनिकांनी पहिल्यांदा आपल्या रक्ताने भूमीच नाहीतर बिहारमध्ये वाहत जाणारी घागरा नदी लाल केली होती. या यु*द्धामुळे बाबराचे विशेष काही नुकसान झाले नाही पण यानंतर तो एका असाध्य रोगाने आजारी पडला आणि यु*द्धानंतर एक वर्षाच्या आतच त्याचे निधन झाले होते.

भारतावर राज्य करण्याचे स्वप्न मुघलांच्या अगोदर अफगाणांनी पहिले होते. सुलतान मोहम्मद गझनवी या अफगाण सुलतानाने भारतावर आक्र*मण केले. यानंतर शाहबुद्दीन मोहम्मद घोरी भारतावर चालून आला व त्यानेच येथे मुस्लिम साम्राज्याचा पाया रचला होता. इसवी सन १२०० ते १५२६ या काळात दिल्लीच्या तख्तावर सुलतानांचे राज्य होते. हे सुलतान शासक प्रामुख्याने अफगाणी वंशाचे होते. दिल्लीवर राज्य करणारे अफगाण शासक म्हणून लोदी राजवंशाचे राजे प्रसिद्ध होते.



परंतु बाबराने भारतातील अफगाणी पठाणांची राजवट संपुष्टात आणली होती. शेरशहा सुरीने एकदा अफगाणांना पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, पण अकबराने त्याचा पडाव केला, यानंतर दिल्लीच्या राजकारणात अफगाणांना पुन्हा कधीच संधी मिळाली नाही.

पानिपताच्या यु*द्धानंतर अफगाणी सत्ता परत येण्याची कुठलीच शक्यता नव्हती. पण फार्मुली आणि नूहानी या दोन पठाणांना मात्र हे मंजूर नव्हते. पानिपत व खानवा येथील पराभवानंतर अफगाणी पठाणांकडे सैन्य व ह*त्यार दोन्ही नव्हते. पण या काळात आतूनच एक विद्रोहाची ठिणगी पडली आणि तिला वारा देण्याचे काम केले बंगालचा शासक नुसरत शहा याने !

त्याने दिलेल्या सहकार्यामुळे अफगाणी विद्रोहाला चालना मिळाली. नुसरत शहाच्या मनात बाबरबद्दल विशेष राग होता, त्याची बाबरच्या विजयी अभियानाला खंडित करण्याची संपूर्ण तयारी होती. याचाच एक भाग म्हणून त्याने अफगाणांच्या बंडाला पूर्णपणे हवापाणी देण्यास सुरुवात केली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

बाबर चंदेरीच्या विजयी अभियानात व्यस्त असल्याचे पाहून अवध प्रांतातील पठाणांनी बंड पुकारले. याचा बाबराच्या अभियानावर परिणाम होत नव्हता पण, त्याला हा विद्रोह दाबताही येत नव्हता. विद्रोही अफगाणांनी कनौज आणि शमशाबादवर अधिपत्य प्रस्थापित केले होते. यानंतर त्यांनी आग्र्यावर विजय संपादन करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली.

इकडे बाबर चंदेरीच्या यु*द्धात व्यस्त होता. ज्यावेळी अफगाणी सैनिकांच्या विद्रोहाची आणि आग्रा काबीज करण्याच्या योजनेची माहिती मिळाली. बाबर हे जाणून होता की जर अफगाणी सैनिकांना स्वतःची ताकद सिद्ध करण्याची संधी मिळली आणि त्यांनी आग्रा काबीज केला तर त्यांना दिल्ली हिसकावून घ्यायला जास्त काळ लागणार नाही. हा विद्रोह चिरडण्यासाठी त्याने स्वतःहून पुढाकार घेतला आणि आक्र*मण करण्याचा निर्णय घेतला.

बाबराने ज्या इब्राहिम लोदीला पानिपतावर धूळ चारली होती, त्याचा भाऊ महमूद लोदी याने बंड पुकारून बिहारवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पूर्वेकडील सत्ताधीश महमूद लोदीला सर्व प्रकारची मदत पुरवत होते.

महमूदला बाबराला हरवून आपल्या भावाच्या अपमानाचा प्रतिशोध घ्यायचा होता.

चंदेरीचे यु*द्ध जसे संपले तसा बाबर अवध प्रांताच्या दिशेने निघाला. बाबराच्या आगमनाची चाहूल लागताच बिब्बन नावाच्या पठाणाने बंगालमध्ये आश्रय घेतला. बाबरने याचा फायदा घेत लखनऊवर ताबा मिळवला. अफगाणी सैन्य यावेळी बनारस आणि चुनार या दोन भागांवर आपले राज्य निर्माण करण्यात व्यस्त होते. बाबरने लखनऊहुन बिहारच्या दिशेने कूच केली. त्याने बंगालच्या नुसरत शहाला अफगाणी विद्रोह्यांना मदत न करण्याची विनंती केली, पण नुसरत शहाने मोठ्या अभिमानाने हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्याने बाबरशी उघड शत्रुत्व घेतले.

१५२९ साली बाबरने बंडखोरांवर ह*ल्ला चढवला. एकीकडे बाबराची फौज दुसरीकडे बंडखोरांची फौज आणि दोघांच्या मध्यभागी घागरा नदी, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महमूद लोदी यु*द्धात उतरला होता, त्याला वाटले पानिपत, खानवा आणि चंदेरीच्या यु*द्धानंतर बाबरमध्ये पुन्हा यु*द्ध करण्याची हिंमत, ताकद उरलेली नसेल, यासाठी त्याने कमी सैन्य घेऊन यु*द्ध लढण्याचा निर्णय घेतला.

पण घडलं उलटंच आणि सगळ्या अफगाण सैन्याला चिरडून टाकत त्यांच्या मृत शरीरांना घागरा नदीच्या पाण्यात फेकून दिले. असं म्हणतात की त्या हिं*सक यु*द्धात अफगाणी सैनिकांच्या रक्ताने घागरा नदी लाल झाली होती.

महमूद यु*द्धभूमी सोडून बंगालमध्ये जाऊन लपला. त्याला वाटले की बंगालमध्ये त्याला आसरा मिळेल आणि बाबर तिथपर्यंत येऊ शकणार नाही. पण बाबरला तो तिथे लपल्याची माहिती मिळाली आणि बाबर बंगालच्या दिशेने निघाला.

आतापर्यंत बाबरच्या विरोधात असलेल्या बंगाली सुलतानाची बाबर चाल करून येतोय हे ऐकून तारांबळ उडाली आणि त्याने बाबरला मैत्री प्रस्ताव पाठवून त्याच्याशी करार केला.

त्याने महमूद बंगाल सोडून जाणार नाही, असे वचन बाबरला दिले आणि महमूदला बंगालमध्ये जहागीर दिली. पुढे महमूदने बिहारचा कारभार पाहणाऱ्या मुघल सरदाराशी चर्चा करून आपसात प्रदेश वाटून घेतला, यानंतर पठाणांनी देखील बाबरचे नेतृत्व स्वीकारले.

काही काळातच बाबरने हिंदुस्थानातील आपले साम्राज्य कश्मीर ते ग्वाल्हेर आणि ग्वाल्हेर ते चंदेरी असे विस्तारले होते, आता त्याला यु*द्ध करायचे नव्हते. यामुळे त्याने १५२९ मध्ये काबूलला जाऊन राहण्याचा निर्णय घेतला पण तो काबूलला जात असताना लाहोरला थांबला जिथे त्याला त्याचा मुलगा हुमायूनचे पत्र मिळाले ज्यात त्याने आग्र्यातील असंतोषाची माहिती दिली होती. यामुळे बाबर परतला. पुढे १५३० मध्ये त्याने हुमायूनला आपला वारस म्हणून नेमले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

IPLमध्ये ६३ चेंडूत १२० धावा करणारा पॉल वाल्थटी सध्या काय करतोय..?

Next Post

चार वेळा तोंडावर आपटलेला बाबर पाचव्यांदा आक्र*मण करायला आला आणि जिंकला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

चार वेळा तोंडावर आपटलेला बाबर पाचव्यांदा आक्र*मण करायला आला आणि जिंकला

या शीख सरदारांनी लाल किल्ल्यावर केसरी ध्वज फडकवत बादशाहची सत्ता उखडून टाकली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.