The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फंदफितुरी झाली नसती तर ‘राणा सांगा’ने बाबराला हुसकावून लावलंच असतं

by द पोस्टमन टीम
11 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


इतिहासातील यु*द्धांच्या अनेक गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो. महाभारतापासून, पानिपत ते बक्सारच्या लढाईपर्यंत भारताच्या या भूमीवर कित्येक छोट्या मोठ्या लढाया झालेल्या आहेत. या सगळ्या यु*द्धांनी इथल्या इतिहासाला एक नवे वळण दिले. काही यु*द्धाचे परिणाम तर दीर्घकाळापर्यंत जाणवत राहिले.

अफगाणी शासक बाबर दिल्लीत आला आणि त्याने दिल्लीचा तात्कालीन शासक इब्राहीम लोदीचा पराभव करून दिल्लीची गादी बळकावली. इब्राहीम लोदी पानिपतमधील यु*द्धात पराभूत झाला आणि बाबरला भारतात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर बाबरने भारतात मुघल साम्राज्याचा पाया घातला.

दिल्ली काबीज केल्यानंतर आता त्याला हळूहळू संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घ्यायचा होता. आजपर्यंत जी यु*द्धनीती वापरून तो जिंकत आला तीच यु*द्धनीती त्याने पुढच्या यु*द्धातही वापरली. भारतातील विखुरलेल्या छोट्या छोट्या राजांना बाबरचा पराभव करणे शक्यच नव्हते. त्यामुळे बाबरची भारतातील आक्र*मकता वाढतच होती. जनतेवरील जुलूम वाढत होता. त्याच्या साम्राज्याबरोबरच क्रौ*र्याचाही विस्तार वाढत होता.

मेवाडच्या राजपूत घराण्यातील राजा राणा सांगा यांना वाटले इतर अफगाणी राजाप्रमाणे बाबर देखील लुटालूट करेल आणि परत जाईल. पण, बाबरचे सरदार दिल्लीनंतर हळूहळू संपूर्ण उत्तर भारतावर आक्र*मण करू लागले.

मेवाडचे राजे राणा रायमल यांचे धाकटे पुत्र असलेले राणा सांगा हे १५०९ मध्ये मेवाडचे उत्तराधिकारी बनले. १५०९-१५२७ या काळात त्यांनी आपल्या पराक्रमाने राज्याचे रक्षण तर केलेच शिवाय साम्राज्य विस्तारही केला. त्यांच्या शासनकाळात मेवाड साम्राज्यात भरभराट आणि समृद्धी होती. राणा सांगा यांच्या जीवनातील बहुतांश काळ यु*द्धभूमीवरच गेला. यु*द्धात एक हात, एक डोळा, अर्धा पाय गमावून, शरीरावर ८० पेक्षा जास्त जखमांचे व्रण झेलल्यानंतरही ते हरले नाही.



राणा सांगा हे नाव ऐकताच शत्रूला धडकी भरत असे. शत्रूच्या मनातील ही भीती किती सार्थ होती हे त्यांनी शेवटच्या क्षणीही सिद्ध करून दाखवले.

दिल्लीतील इब्राहीम लोदी, गुजरातचा महमूद शाह बेगडा आणि माळव्यातील नसिरुद्दीन खिलजी सुलतान अशा तिन्ही बलाढ्य शत्रूंना त्यांनी एकाच वेळी अंगावर घेतले तरीही या यु*द्धात विजय राणा सांगा यांचाच झाला. इब्राहीम लोदीसोबत झालेल्या बुंदीच्या लढाईत त्यांचा एक हात छाटला गेला. त्यांचा एक डोळा तर बालपणीच निकामी झाला होता. एका पायाच्या गुढघ्यात बाण घुसल्याने गुडघ्यातून खालचा पायही काढावा लागला होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

परंतु बाबरचा उच्छाद कानावर पडताच त्याला रोखण्यासाठी शेवटी राणा सांगा स्वतः मैदानात उतरले. आपल्या नेतृत्वाखाली सर्व राजपूत राजांना संघटित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. दिल्ली, गुजरात आणि मुगल बादशहांच्या ह*ल्ल्यापासून आपला प्रदेश सुरक्षित ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. मांडूच्या यु*द्धात त्यांनी सुलतान मोहमदचाही पराभव केला होता. मोहमदला त्यांनी काही काळ कैदही केले होते, पण नंतर त्यांनी सुलतान मोहमदची सुटका केली आणि त्याचे राज्यही त्याला परत दिले. शत्रूची सुटका करून त्याचा सन्मान करण्याइतके औदार्यही त्यांच्यात होते.

परंतु बाबर कालपी, बयाना, आग्रा आणि धौलपूर पर्यंत येऊन पोहोचला तेव्हा मात्र राणा सांगा स्वतः मैदानात उतरले.

१६ मार्च १५२७ रोजी दोघेही खानवा येथील यु*द्धभूमीत दोघेही आमनेसामने आले. या यु*द्धात राणा सांगा यांच्यासोबत हसन खाँ मेवाती, बसीन चंदेरी आणि इब्राहीम लोदीचा भाऊ महमूद लोदीसुद्धा होते.

पानिपतमध्ये बाबरने जी रणनीती वापरली तीच त्याने खानवा यु*द्धातही अवलंबली. परंतु राणा सांगाच्या सेनेनेही चांगलेच प्रत्युत्तर दिले. राणा सांगा यांच्या सैन्याने लढाईचे पारडे आपल्या बाजूने फिरवले होते. या यु*द्धात ते बाबरच्या ताब्यातील बायाना किल्ला परत मिळवण्यात यशस्वी झाले होते. परंतु, बाबरने दारुगोळा आणि तोफांचा भडीमार सुरु केला आणि त्याने काही काळातच यु*द्धाची स्थिती बदलून टाकली.

आतापर्यंत राणा सांगा यांचे सैन्य मजबूत वाटत होते पण, बाबरने फितुरीद्वारे सैन्यात फुट पडली.

राणा सांगाकडून जर बाबरचा पराभव झाला असता तर भारतावर राज्य करण्याचे त्याचे स्वप्न धुळीला मिळाले असते. म्हणून काहीही करून त्याला या यु*द्धात विजय मिळवायचाच होता आणि त्याने मिळवला देखील. खानवाचे यु*द्ध जिंकल्यानंतर बाबरचे भारतातील स्थान अधिक बळकट झाले.

या यु*द्धात राणा सांगा जखमी झाल्यानंतर पृथ्वीराज कच्छवाह यांनी त्यांना यु*द्धभूमीतून बाहेर आणले आणि मेवाडमधील काल्पी येथे सुरक्षितपणे पोहोचवले. नेहमीप्रमाणे इथेही काही असंतुष्ट सरदारांची फितुरीच राजा राणा सांगा यांच्या जीवावर बेतली. जखमी अवस्थेतील राणा सांगा यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला पण तरीही राणा सांगा यांनी हार मानली नव्हती. ते पुन्हा बसवा येथे गेले आणि पुन्हा एकदा त्यांनी मुघलाविरोधात तलवार उचलली.

यु*द्धात त्यांचे शीर छाटले गेले तरी त्यांचे धड शत्रूशी लढत होते. अनेक यु*द्धांत विजय प्राप्त केलेल्या या राजाला अशी सहजासहजी हार मान्यच नव्हती. आपल्या साहस आणि शौर्याद्वारे त्यांनी इतर राजांसमोर एक आदर्श उदाहरण घालून दिले.

एक हात, एक डोळा, आणि पाय गमावलेला असतानाही बाबरसारख्या शत्रूवर चालून जाण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. इथेच त्यांच्यातील अदम्य साहसाची प्रचीती येते. शरीरावर असंख्य जखमांचे व्रण झेलूनही त्यांनी स्वतःतील इच्छाशक्ती हरू दिली नाही. बाबरविरुद्धचे यु*द्धही ते जिंकू शकले असते. नव्हे अर्धेअधिक यु*द्ध तर त्यांनी जिंकल्यातच जमा होते. फक्त फितुरीमुळेच ते या यु*द्धात हरले.

राणा सांगा आणि खानवा यु*द्धातील त्यांचा पराक्रम दोघांनाही इतिहास कधीच विसरू शकणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अलार्म क्लॉक परवडायचे नाही म्हणून झोपेतून उठवायला माणूस ठेवायचे

Next Post

या माणसाला जंगली लांडग्यांनीच पालनपोषण करून लहानाचं मोठं केलंय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या माणसाला जंगली लांडग्यांनीच पालनपोषण करून लहानाचं मोठं केलंय

आज मैलाच्या दगडावरच्या या रंगांचा अर्थ माहिती करून घ्या !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.