The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगभरात ४० प्रकारचे वेगवेगळे कॅलेंडर लोक वापरतात

by द पोस्टमन टीम
31 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजच्या काळात कॅलेंडरचा वापर करत नसेल अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ आहे. कॅलेंडरचा प्रमुख उद्देश हा भूत, भविष्य आणि वर्तमानातील वेळेची निश्चिती करणे इतकाच आहे. विविध मानवी संस्कृतीत धार्मिक सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी विविध कॅलेंडरचा वापर करण्यात येतो.

जगभरात ४० वेगवेगळ्या प्रकारचे कॅलेंडर्स आहेत, आज आपण त्यातीलच काही प्रमुख कॅलेंडर्सची माहिती घेणार आहोत.

माया कॅलेंडर

पुरातत्व संशोधकांनी ग्वान्टेमाला या देशात माया संस्कृतीच्या काही गुप्त ठिकाणांचा शोध घेतला होता. तिथेच असलेल्या एका खोलीतील भिंतीवर त्यांना काही असाधारण चित्रे आणि लेख आढळून आले होते. या लेख व चित्रांमधून माया संस्कृतीच्या कालगणना पद्धतीची माहिती मिळत होती. यात भूतकाळात घडून गेलेल्या आणि भविष्यात घडणाऱ्या कालचक्राचा वेध घेण्यात आला होता.

ही संशोधकांनी या कॅलेंडरचा मदतीने २१ डिसेंबर २०१२ ला पृथ्वी नष्ट होईल, असा दावा केला होता. काही संशोधकांनी या कॅलेंडरच्या मदतीने माया संस्कृतीचे लोक चंद्राच्या आयुर्मानाची गणना होते, असा दावा केला. काहींनी हे कॅलेंडर कालचक्र मापन करते असा दावा केला होता.

या कॅलेंडरमध्ये वर्षाला ३६५ दिवस असतात असा उल्लेख सर्वप्रथम करण्यात आला होता.

या कॅलेंडरमध्ये २०-२० दिवसांचे १८ महिने आहेत. ३६५ दिवसांच्या पूर्ततेसाठी ५ दिवस अधिक जोडण्यात आले आहेत. काहीवेळा कालचक्रात काही बदल घडले यामुळे हे कॅलेंडर आज वापरात नाही. त्यात काळाचे योग्य मूल्यमापन शक्य नाही. असे असले तरी देखील या कॅलेंडरचा संशोधनकार्यासाठी वापर करण्यात येतो.

ज्युलियन कॅलेंडर

ज्युलियस सीझर या रोमन सत्ताधीशाने या रोमन कॅलेंडरची सुरुवात केली होती. इसवी सन पूर्व ४५ मध्ये सर्वप्रथम या कालगणना पद्धतीचा वापर करण्यात आला होता. या कॅलेंडरचा पहिला दिवस नवीन वर्ष म्हणून आज साजरा केला जातो. तेव्हापासून आजपर्यंत जगभरात १ जानेवारीला नववर्ष साजरे करण्यात येते.

रोमचा राजा ज्युलियस सीझरने प्रचलित रोमन कॅलेंडरमध्ये बदल करून ज्युलियन कॅलेंडर लागू केले होते. सीझरने प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ सोसिजीन्सच्या मदतीने या चंद्रावर आधारित कालगणनेचा वापर करण्यास सुरुवात केली होती. या कॅलेंडरमध्ये फेब्रुवारीत दर चार वर्षांनी अतिरिक्त महिना जोडण्यात येतो.

ग्रेगोरियन कॅलेंडर

आज आपण ग्रेगोरियन कालगणना पद्धतीने आपल्या दिवसाचे, महिन्याचे आणि वर्षाचे मूल्यमापन करत असतो.  हिंदू कॅलेंडर विक्रम संवताच्या आधारावर हिंदू सणांची ज्याप्रमाणे कालगणना करण्यात येते, तसेच या कॅलेंडरचा वापर ख्रिस्ती लोक करतात. ग्रेगोरियन कॅलेंडरचा प्रमुख उद्देश हा ईस्टरची तारीख बदलण्याचा होता. १५८२ साली पोप ग्रेगोरी आठवे यांनी या कॅलेंडरची निर्मिती केली. त्या अगोदर युरोपात ज्युलियन कॅलेंडर प्रचलनात होते.

साधारण कॅलेंडरमध्ये दर चार वर्षानी एक लीप वर्ष असते, पण ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये असे लीप वर्ष नसते. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे दर चार वर्षांनी फेब्रुवारीत एका अतिरिक्त दिवसाची गणना केली जात नाही.

ग्रेगोरियन सौर वर्षात दरवर्षी २६ सेकंदांचा फरक असतो. सन ४९०९ साली ग्रेगोरियन कॅलेंडरचा एक दिवस पूर्ण होतो. ग्रेगोरियन कॅलेंडरच्या अगोदर इंग्रजांचे एक वर्ष २५ मार्चपासून सुरू होते, पण याला बदलण्यासाठी ज्युलियस सीझरने १ जानेवारीला नववर्ष घोषित केले.  असे असले तरी बहुतांश युरोपीय देश २५ डिसेंबरला येशूच्या जन्मदिनी नववर्षाची सुरुवात करतात.

हिंदू कॅलेंडर

भारतीय पंचांग हे भारतात कालगणनेसाठी वापरण्यात येणारे एक अधिकृत कॅलेंडर आहे. शक संवत याचा वापर भारतीय हिंदू कॅलेंडर आणि कंबोडियन बौद्ध कॅलेंडरमध्ये करण्यात येतो. ग्रेगोरियन कॅलेंडर समवेत या कालगणना पद्धतीचा स्वीकार २२ मार्च १९५७ रोजी भारत सरकारने केला होता. वर्तमानातील ग्रेगोरियन कॅलेंडरची तिथी ही पंचांगातील ७८ ई घटवून काढता येते.

भारतात विक्रम संवताची सुरुवात इसवी सन पूर्व ५७साली करण्यात आली होती. हे कॅलेंडर विभिन्न रुपात सर्व भारतभर वापरले जाते. हे नेपाळचे अधिकृत राष्ट्रीय संवत आहे. १२ महिन्यांचे वर्ष आणि ७ दिवसांचा आठवडा या कॅलेंडरमुळे जगाला मिळाला आहे. विक्रम संवत ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ५७ जोडून काढता येतो. याच कॅलेंडरनुसार हिंदू पंचाग व त्याच्याशी संबंधित कार्य पार पाडले जाते. याला हिंदू कॅलेंडर देखील मानले जाते.

भारतीय संस्कृतीत पहिले वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या रुपात साजरे करण्यात येते. चैत्र शुद्ध प्रतिपदा, चंद्राच्या कलेचा पहिला दिवस आहे. यालाच वर्षाचा आरंभ मानला जातो. ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली होती, असे मानले जाते.

राष्ट्रीय कॅलेंडरची तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरशी मिळतीजुळती आहे. चैत्राचा पहिला महिना २२ मार्चला असतो. लीप वर्षात हा २१ मार्चला असतो. भारतात वित्तीय वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत असतं. ही इंग्रजांच्या कॅलेंडरची रचना आहे. भारतात काही पाश्चात्य देशातील धार्मिक कार्यक्रम जसे ख्रिसमस, ईस्टर वगळता बहुतेक सण हे हिंदू कॅलेंडरच्या मदतीने साजरे केले जातात.

हिजरी कॅलेंडर

भारतीय संस्कृतीत एकेकाळी चंद्राचा कालगणना करण्यासाठी वापर करण्यात येत होता. एका महिन्यात चंद्राच्या स्थितीत होणाऱ्या बदलांवरून येणाऱ्या काळाचा अंदाज बांधला जात होता. त्याच वेगवेगळ्या स्थितीच्या आधारावर कालगणना करण्यात येत होती. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत व पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत हिंदू तसेच मुस्लिम धर्मात देखील सण उत्सव गणना करण्यात येते. मुसलमान लोक चंद्राच्या आधारे कालगणना करतात. याला हिजरी कॅलेंडर देखील म्हटले जाते.

मोहम्मद पैगंबर ज्यादिवशी मक्केहुन मदिनेला गेले त्यादिवसाला हिजरतचा दिवस म्हणतात व तो दिवस हिजरी कॅलेंडरचा पहिला दिवस असतो. १६ जुलै ६२२ ही तारीख हिजरी कॅलेंडरची सुरुवात मानली जाते. याच आधारावर रमजान आणि ईदची तारीख ठरवली जाते. ईद चंद्र दिसतो त्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केली जाते. हिजरी पंचांगचा पहिला महिना मोहरम असतो. नववा महिना रमजान असतो. याचे प्रत्येक महिने दरवर्षी १० दिवस मागे सरकत असतात.

या कॅलेंडरमुळे संसारात भौगोलिक अंतर वगळता ईदच्या तारखेत जास्त फरक आढळून येत नाही. सौर कालगणनेनुसार वेगवेगळ्या दिवशी रमजान साजरा करावा लागला असता. चंद्र कॅलेंडरमुळे जगभरातील मुस्लिम एकाच दिवशी रमजान साजरा करतात.

सौदी अरेबियाला इस्लामिक कॅलेंडरमुळे बरेच आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे तेथील सरकार कार्यालयीन कामाकाज करण्यासाठी पाश्चात्य कॅलेंडरचा वापर करते. चंद्र कॅलेंडर पाश्चात्य कॅलेंडरचा तुलनेत ११ दिवस लहान आहे. पाश्चत्य कॅलेंडरमुळे सौदी सरकारच्या ११ दिवसांच्या वेतनाची बचत होते.

हे प्रस्तुत कॅलेंडर आज विश्वाभरात प्रचलनात आहेत, अनेक देशात व संस्कृतीत त्यांचे स्थानिक कॅलेंडर देखील वापरले जाते. प्रत्येकाची वेगळी गोष्ट आणि वेगळा इतिहास आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 


ShareTweet
Previous Post

भारतात फेसबुकचा विस्तार करणाऱ्या स्त्रीचा संघर्षमय प्रवास

Next Post

त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

हि*टल*रला शांततेचा नोबेल पुरस्कार द्यायला निघाले होते स्वीडिश सरकार !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.