The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राणी एलिझाबेथबद्दलच्या या इंटरेस्टिंग गोष्टी माहित आहेत का..?

by द पोस्टमन टीम
19 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“LONDON BRIDGE HAS FALLEN”

ब्रिटनच्या पंतप्रधानांना हा निरोप गेला आणि एका क्षणात सगळं बदललं. गेली ७० वर्षे इंग्लंडची राणी म्हणून जी जगली ती निघून गेली होती. तिच्या ७० वर्षाच्या कार्यकाळात १५ पंतप्रधान येऊन गेले पण ती मात्र तिथेच होती. तिने अक्षरशः संपूर्ण जग बदलताना बघितलंय. ८ सप्टेंबर २०२२ रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिचा ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने मृत्यू झाला आणि संपूर्ण जगाला चटका बसला. आजवर तिच्याबद्दल हजारो लोकांनी लिहिलं असेल. कित्येक चित्रपटांमध्ये तिची भूमिका दिसते. (एखाद्या अभिनेत्रीने साकारलेली, अर्थातच!)

जगातील सर्वांत जास्त काळ राज्य करणाऱ्या या राणीबद्दल काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. राजगादीची वारसदार म्हणून तिचा जन्म झालाच नव्हता.

वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत एलिझाबेथचा आणि ब्रिटेनच्या गादीचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. पण १९३६ साली तिचे आजोबा, जॉर्ज पंचमचा मृत्यू झाला आणि हळूहळू परीस्थिती बदलू लागली. जॉर्ज पंचमचा मृत्यू झाल्यानंतर एलिझाबेथचा काका एडवर्ड आठवा याने सगळा कारभार हाती घेतला. पण, वर्षभराच्या आतच त्याने एका अमेरिकन सोशलाइटशी लग्न करण्यासाठी राजगादीवरचा आपला हक्क सोडला आणि त्यामुळे जॉर्ज सहावा म्हणजेच एलिझाबेथचे बाबा ब्रिटनचे सम्राट म्हणून घोषित करण्यात आले. आणि १० वर्षांची एलिझाबेथ ब्रिटीश साम्राज्याची वारसदार झाली.



२. राणीला दोन वाढदिवस होते.

हो! तुम्ही बरोबर वाचलं. बऱ्याचशा ब्रिटीश सम्राटांप्रमाणेच इंग्लंडच्या या राणीलादेखील दोन वाढदिवस आहेत. एक २१ एप्रिल आणि दुसरा ॲन्यूअल मिलिटरी परेडच्या दिवशी.

झालं असं होतं की, एप्रिलमध्ये जेव्हा एलिझाबेथचा जन्म झाला त्यावेळी ब्रिटनचं वातावरण भयंकर थंड असतं, बर्फ पडण्याची पण शक्यता जास्ती असते. त्यामुळे राणीचा (राजकुमारीचा) वाढदिवस साजरा करता येत नाही आणि म्हणून जेव्हा वातावरण जरा गरम होतं तेव्हा राणीचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. ॲन्यूअल मिलिटरी परेडच्या दिवशी सगळ्या ब्रिटनमधे राणीचा वाढदिवस साजरा होतो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

३. राणीकडे पासपोर्टच नव्हता.

नव्हे, राणीला पासपोर्टची गरजच पडली नाही. राणी १००हून अधिक देशांमध्ये गेली पण एकाही देशात जाण्यासाठी तिला पासपोर्टची गरज पडली नाही. पण, राजघराण्यातील इतर लोकांना, अगदी किंग चार्ल्सलासुद्धा, ब्रिटीश सरकारने पारित केलेला पासपोर्ट काढावा लागतो.

कारण, आता ब्रिटनमधले सगळे पासपोर्ट राणीच्या नावानेच पारित व्हायचे.

४. राणीला मद्यपानाची आवड 

याचा अर्थ हा नाही की ती कायमच लावून असते. 

तिची बहिण मार्गारेट हिच्या म्हणण्यानुसार, “राणीला दुपारच्या जेवणाअगोदर जीन आणि डबोनेट (वाईनचा एक प्रकार) घ्यायची, जेवताना एखादा ग्लास वाईन आणि ड्राय मार्टीनी, झोपण्यापूर्वी शाम्पेन लागते.”

हे जर खरं असेल राणी रोज सहा वेगवेगळ्या प्रकारचे मद्यप्राशन करायची.

५. राणी दरवर्षी ५०,०००हून अधिक लोकांचे आदरातिथ्य करायची

राणीला लोकांचे आगतस्वागत करणे फारच आवडत असे. दरवर्षी बकिंगहम पॅलेसमधे पन्नास हजाराहून जास्ती लोक भेट देतात. या सगळ्यांचे अगत्याने स्वागत केले जाते.

६. १००हुन अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये राणीवर आधारित भूमिका आहेत

आपल्यापैकी अनेकांनी नेटफ्लिक्सवरील “द क्राऊन” ही सिरीज नक्कीच बघितली असेल. यात राणीचा संपूर्ण प्रवास दाखवला आहे. तसेच, अभिनेत्री हेलेन मीरेनला तर “द क्वीन” या चित्रपटात राणीची भूमिका करण्यासाठी ऑस्करसुद्धा मिळाला आहे.

IMDb या वेबसाईटनुसार वेगवेगळ्या कलाकारांनी १००हून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये राणीची भूमिका वठवली आहे.

७. सगळ्यात जास्त कार्यकाल

वयाच्या २५व्या वर्षी, २ जून १९५३ साली वेस्टमिंस्टर ॲबीमध्ये राणीचा राज्याभिषेक झाला होता. गेल्या ७० वर्षांपासून ती ब्रिटनची राणी होती. आजवरच्या इतिहासातील सगळ्यात मोठा कार्यकाळ असणारी सम्राज्ञी म्हणून ती ओळखली जाते.

८. दुसऱ्या महायु*द्धात सहभाग

राणी एलिझाबेथने ट्रक चालवणे आणि दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण घेऊन दुसऱ्या महायु*द्धात आपला सहभाग नोंदवला होता. राजघराण्यातील ती एकमेव महिला सदस्य होती जी यु*द्धात प्रत्यक्ष सहभागी झाली.

१०. डॉग लव्हर क्वीन

हो! आपल्या सगळ्यांप्रमाणेच राणीला देखील कुत्र्यांची आवड होती. राणीला तिच्या १८व्या वाढदिवशी तिचा पहिला कुत्रा भेट मिळाला होता. तिच्याकडे ३०हुन अधिक कुत्रे होते.

११. राणीकडे लायसन्स नव्हते आणि टॅक्स पण भरावा लागत नव्हता

इंग्लंडची राणी असल्याने तिला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागायचा नाही. भारीच ना?

अर्थात, ती स्वतःहून सगळे कर भरायची ही गोष्ट वेगळी.

पासपोर्टप्रमाणेच सगळे गाडी चालवण्याचे परवाने तिच्या सहीने पारित होतात त्यामुळे तिला परवान्याची गरज नव्हती. सौदी अरेबियाचा एक राजदूत एकदा राणीला भेटायला आला होता, तेव्हा राणीने स्वतः गाडी चालवून फिरवून आणलं होतं. हे बघून तो आश्चर्यचकित झाला होता, कारण तेव्हा सौदीमधे बायकांना गाडी चालवण्याची परवानगीच नव्हती.

१२. राणी कधीच शाळेत गेली नाही

त्याकाळी राजकुमारीने इतर मुलांप्रमाणे शाळेत वगैरे जाणं हे प्रोटोकॉलच्या विरुद्ध होतं. म्हणूनच राणीचं संपूर्ण शिक्षण हे घरीच झालं. राणीला राज्यकारभारासाठी आवश्यक अशा सगळ्या विषयांचं शिक्षण घरीच देण्यात आलं होतं. तर, कॅन्टरबरीच्या आर्चबिशपच्या देखरेखीखाली राणीने धार्मिक शिक्षण पूर्ण केलं.

१३. तिने पहिल्यांदा “इमेल” पाठवला 

राणी एलिझाबेथ १९७६ साली इमेल पाठवून असं करणारी पहिली हेड ऑफ द स्टेट बनली. तिने HME2 हे युजरनेम वापरून इंग्लंडच्या Royal Signals and Radar Establishmentला पहिला इमेल पाठवला. (HME2 म्हणजे- हर मॅजेस्टी, एलिझाबेथ २)

इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) बद्दलच्या या काही अनोख्या बाबी तुम्हाला कशा वाटल्या आणि याशिवाय तुम्हाला काही माहिती असतील तर त्या गोष्टी, आम्हाला कमेंट्समधे लिहून नक्की कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इराणचे सर्वेसर्वा असलेले अयातोल्ला खोमेनी मूळचे उत्तरप्रदेशचे आहेत

Next Post

नेहरूंच्या इच्छेखातर गोदरेजने आशिया खंडातील पहिला टाइपरायटर बनवला होता !

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

नेहरूंच्या इच्छेखातर गोदरेजने आशिया खंडातील पहिला टाइपरायटर बनवला होता !

अमेरिकेचा हरवलेला अ*णुबॉ*म्ब अजूनही सापडलेला नाही !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.