The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्रजांनी या यु*द्धात विजय मिळवून आपल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली होती

by द पोस्टमन टीम
11 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इंग्रजांनी भारतावर २००  वर्ष राज्य केले हे आपण ऐकत असतो. एका मोठ्या जनांदोलनानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचे आपण इतिहासात वाचले आहे. भारतात सर्वप्रथम इंग्रज आले नव्हते. त्यांच्या अगोदर फ्रेंच आणि डच व्यापाऱ्यांनी भारतात कारखाने सुरु केले होते. भारतीयांवर आपली पकड मजबूत करण्यापूर्वी ब्रिटीशांसमोर फ्रेंच, डच आणि पोर्तुगीजांचे आव्हान होते.

डच आणि फ्रेंचांना पिटाळून लावणे हे भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा दृष्टीने त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यासाठी कर्नाटकच्या भूमीवर ब्रिटिशांनी तीन यु*द्धे केली. या ऐतिहासिक यु*द्धांमुळे ब्रिटीशांना भारताच्या भूमीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करता आले होते. कर्नाटकच्या या यु*द्धांमध्ये फ्रेंच आणि ब्रिटीश सैन्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते.

आज आपण कर्नाटकच्या त्या पहिल्या यु*द्धाविषयी जाणून घेणार आहोत, ज्याला अंबूरचे यु*द्ध म्हणून देखील ओळखले जाते. हे यु*द्ध चार मुस्लीम शासकांमध्ये कर्नाटक आणि हैद्राबादवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा दृष्टीने झाले होते. या यु*द्धात इंग्रजी आणि फ्रेंच सैन्याने वेगवेगळ्या पक्षाची बाजू घेतली होती.

कर्नाटकचे पहिले यु*द्ध अंबुर येथे लढवण्यात आले होते. हे यु*द्ध भारतीय इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.



१७४८ साली इंग्लंड आणि फ्रान्स शांततापूर्ण पद्धतीने भारतात व्यापाराला चालना देत होते. याच काळात निजाम असफ जहाँ प्रथम याचा मृत्यू झाला. निजाम उल मुल्कच्या मृत्युनंतर मुजफ्फर जंग याची निजाम म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुघल सम्राट अहमद शहा बहादूरने या निर्णयाची पुष्टी केली, पण निजाम उल मुल्कचा मुलगा नासीर जंग याने यासाठी नकार दिला. त्याने मुजफ्फर जंग याचा पराभव करत हैद्राबादवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

हैद्राबादच्या राजगादीच्या लालसेचे रुपांतर गृहयु*द्धात झाले. याच गृह्यु*द्धातून पुढे कर्नाटक यु*द्धाची ठिणगी पडली. हैद्राबादच्या सिंहासनावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मीर अहमद अली खान अर्थात नासीर जंग आणि मुजफ्फर जंग एकमेकांसमोर उभे ठाकले.

मुजफ्फर जंगने आपली ताकद दाखवून देण्यासाठी फ्रान्सच्या सैन्याशी करार केला. या करारानंतर फ्रेंच गव्हर्नर जनरल जोसेफ फांकोस डुप्लेक्सच्या मदतीने खानने त्याचा जावई चांद साहिब याला मराठ्यांच्या कैदेतून मुक्त केले. मुजफ्फर जंगला नासीर जंगला मदत करणाऱ्या त्याच्या सगळ्याच सहकाऱ्यांचा नाश करायचा होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अन्वरुद्दीन मोहम्मद हा कर्नाटकचा नवाब नासीरचा सर्वांत मोठा समर्थक होता. चांद साहिब हा अन्वरुद्दीनचा शत्रू होता. मुस्लीम सरदारांच्या या अंतर्गत यु*द्धादरम्यान इंग्रज आणि फ्रेंच लोकांचे आपसात वेगळे यु*द्ध सुरु होते. फ्रेंच लोकांना कर्नाटकातील ब्रिटीशांचा प्रभाव कमी करायचा होता. अन्वरुद्दीन कर्नाटकच्या नवाबपदी विराजमान राहणे यासाठी फ्रेंच लोकांच्या हिताचे नव्हते, त्यांनी चांद साहिब व मुजफ्फर जंगचे यासाठी समर्थन करण्यास सुरुवात केली.

चंदा साहिब याला एकाच वेळी फ्रेंच आणि मुजफ्फर जंग याचे समर्थन मिळाले होते. त्यामुळे त्याने अन्वरुद्दीनच्या विरोधात यु*द्ध करण्याची तयारी सुरु केली आणि त्याला या यु*द्धात विजय संपादन करून अरकोटच्या नवाबपदी विराजमान व्हायचे होते. इकडे फ्रेंच वर्चस्व सिद्ध करण्याची तयारी करत असताना इंग्रज मात्र पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्यांना या राजकारणाची कल्पना नव्हती. ते अन्वरुद्दीन आणि नासीर जंगचे समर्थक होते.

१७४९ साली इंग्रज सैन्याने नवाब मोहम्मद अन्वरुद्दीनला फ्रेंच सैन्याचा विरोधात मैदानात उतरवले. वृद्धापकाळामुळे नवाब अन्वरुद्दीनचा निभाव लागला नाही आणि यु*द्धात गोळी लागून त्याचा मृत्यू झाला.

चांद साहिबने आता अरकोटच्या नवाबपदावर आपले नाव कोरले. याच काळात मोहम्मद अली खान हा अन्वरुद्दीनचा पोरगा जीव वाचवून पळाला आणि त्याने त्रिचीनापल्ली येथे आसरा घेतला.

नासीर जंग याने मोहम्मद अली खानाच्या समर्थनार्थ त्रिचीनापल्ली येथे सैन्य रवाना केले. या काळात रॉबर्ट क्लाइव्ह या ब्रिटीश अधिकाऱ्याने एक जबरदस्त योजना आखली. मोहम्मद अली खान याला पकडण्यासाठी फ्रेंचे सैन्याने त्रिचीनापल्लीला घेराव घातला होता. याचा फायदा घेऊन इंग्रजांनी आरकोटच्या किल्ल्यावर आक्र*मण केले. त्यांनी किल्ल्याला घेराव घातला. फक्त ५१० इंग्रज सैनिक हे मुजफ्फर खान आणि चंदा साहिबच्या सैन्याच्या विरोधात उभे होते.

क्लाइव्ह आणि त्याच्या साथीदारांनी काही काळातच आरकोटचा किल्ला ताब्यात घेतला. इंग्रजांनी आक्र*मण केल्याची माहिती जशी फ्रेंच लोकांना मिळाली तसा त्यांनी त्रिचीनापल्लीचा वेढा सोडून सैन्य घेऊन आरकोटच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली. पण त्यांच्या जाण्याची वाट बघत असलेल्या इंग्रजांनी संधीचा फायदा घेऊन त्रिचीनापल्ली ताब्यात घेतली. आता फ्रेंच सैन्य दोन्ही बाजूने इंग्रजांच्या सैन्याने घेरले गेले होते.

१७५३ मध्ये या यु*द्धात फ्रेंच पूर्णपणे पराभूत झाले होते. यामुळे चंदा साहिब आणि मुजफ्फर जंग याला ताब्यात घेण्यात आले. इंग्रजांनी मोहम्मद अली खानला आरकोटचा नवा नवाब घोषित केले. इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी आपसात युती केली. पण यु*द्ध मात्र थांबले नाही, पुढील काही वर्षे ते सुरु राहिले.

यु*द्धात नासीर जंगचा मृत्यू झाला. यामुळे इंग्रजांच्या मदतीने सलाबत जंग हैद्राबादचा नवाब बनला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

विश्वास बसणार नाही पण हा माणूस अठरा वर्षे विमानतळावर अडकून पडला होता

Next Post

साऊथमधे धुमाकूळ घातलेला सुरीयाचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता हिंदीत आलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

साऊथमधे धुमाकूळ घातलेला सुरीयाचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता हिंदीत आलाय

या मंदिरातील झुलत्या खांबांचं रहस्य अजूनही शास्त्रज्ञांना उलगडलेलं नाही !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.