The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना*झी सैन्यात झालेल्या कन्फ्युजनमुळे २५० किलोमीटर लांब ट्राफिक जॅम झालेलं

by द पोस्टमन टीम
9 December 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पहिलं महायु*द्ध संपलं. वर्सायचा तह झाला. वर्सायच्या तहानंतर जर्मनीच्या लष्करावर अनेक निर्बंध लादण्यात आले. महायु*द्धात, वर्सायच्या तहामुळे झालेला अपमान, जागतिक मंदी अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर्मनीत उजव्या गटांचा उदय झाला.

ना*झी पक्षानं सत्ता आपल्या घेतली आणि हि*टल*रने वर्सायच्या तहाला कचऱ्याची पेटी दाखवत पुन्हा एकदा लष्कर भरती सुरु केली. जर्मानीच्या यु*द्ध विभागाला सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळायचं आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून मजूर मिळायचं.

हि*टल*र आपली ताकद हळूहळू वाढवत होता आणि त्याच्या सत्तालालसेनं संपूर्ण जगाला दुसऱ्या महाभयंकर यु*द्धात ओढलं.

साधारण १९४०च्या दरम्यान, फ्रेन्च-बेल्जियम सीमेवर मोठ्या प्रमाणात जर्मन सैन्याच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आर्डेन भागातून फ्रान्सची सीमा ओलांडायची जर्मनीची योजना होती. ही योजना ऐकायला जितकी “परफेक्ट” तितकीच अंमलात आणायला कठीण. तेव्हा त्या सीमेलगत जवळपास २५० किमी अंतरावर जर्मन सैन्यच दिसत होतं. याला जगातील सगळ्यात मोठ्या “ट्रॅफिक जाम” म्हणता येईल. तेव्हा फ्रांस आणि ब्रिटनचं या लोकांकडे लक्ष गेलं नाही म्हणून. नेमकं काय झालं होतं? जाणून घेण्यासाठी आधी थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया..

तर झालं असं की, हि*टल*रनं झेक आणि ऑस्ट्रियावर ह*ल्ला चढवला आणि दुसऱ्या महायु*द्धाची सुरुवात झाली. ब्रिटन आणि फ्रांसने जर्मनीच्या या घुसखोरीकडे सुरुवातीला तर कानाडोळा केला पण पोलंडमधे घुसून जर्मनीने सगळ्या हद पार केल्या होत्या. आता फ्रांस आणि ब्रिटनने जर्मनीविरुद्ध यु*द्ध घोषित केलं.



ब्रिटनने तब्बल ३५०,००० सैनिकांची फौज फ्रांसला रवाना केली. दोन्ही देशांनी घेतलेल्या या पवित्र्याने हि*टल*रचं धाबं दणाणलं. एवढ्या मोठ्या सैन्यापुढे आपला टिकाव लागणार नाही हे त्याला माहिती होतं. यावर उपाय काढायला म्हणून त्याने आपल्या जनरल्सना बोलावणं धाडलं.

आता, पहिल्या महायु*द्धात चार वर्ष लढवल्यानंतर जर्मनीच्या पदरी हारच पडली होती. हि*टल*र स्वतः पहिल्या महायु*द्धात एक सैनिक म्हणून लढला होता. त्यावेळी ज्या नाचक्कीला सामोरं जावं लागलं होतं ती वेळ पुन्हा आपल्यावर ओढवू नये अशीच त्याची इच्छा होती. जनरल एरिक वॉन माईनस्टाईन याने आर्डेनमधून फ्रान्सच्या सीमा ओलांडण्याचा प्रस्ताव मांडला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पहिल्या महायु*द्धानंतर, फ्रांसने आपल्या सीमेभोवती तटबंदी मजबूत केली जेणेकरून भविष्यात जर्मनीने त्यांच्यावर ह*ल्ला करू नये. सीमेलगत केलेल्या या तटबंदीला “मॅजिनो लाईन” म्हणून ओळखलं जायचं.

पण या मॅजिनो लाईनमधे फ्रांस आणि बेल्जियमच्या सीमेदरम्यान एक गॅप होती. आर्डेनच्या दाट जंगलामधे ही गॅप होती. या घनदाट जंगलातून माणूस जाणं कठीण त्यामुळे हि*टल*र रणगाडे घेऊन सैन्य घुसवेल अशी फ्रांसला आशाच नव्हती, त्यामुळे त्यांनी त्या भागाकडे दुर्लक्ष केलं.

म्हणूनच या भागातून आपलं सैन्य घुसवण्याची योजना जनरल माईनस्टाईनने मांडली. या योजनेला जर्मनीच्या हाय कमांडने विरोध दर्शवला. पण हि*टल*रच्या पुढे कोणाचेच काही चालणे शक्य नव्हते आणि त्याला ही योजना पसंत पडली होती.

४२,००० गाड्यांचा ताफा घेऊन जनरल माईनस्टाईन या आर्डेनच्या जंगलात दाखल झाला. इथेच गोची झाली. जर्मन इन्फंट्रीला दुसऱ्या मार्गाने सीमा ओलांडायची होती पण ते रस्ता चुकले आणि माईनस्टाईनला आडवे आले. आता इन्फंट्री आणि टँक दोघंही रस्ता शोधण्याच्या नादात एकमेकांचा रस्ता अडवून बसले. सगळीकडे नुसता गोंधळ.

सगळ्या गाड्या हळूहळू पुढे जाऊ लागले, यात सगळ्यात तब्बल २५० किमीचा ट्रॅफिक जाम तयार झाला. फ्रान्सची काही विमाने इथं गस्त घालत होती त्यांनी या ट्रॅफिक जॅमबद्दल फ्रेंच हाय कमांडला सूचना केली पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.

इकडे मुंगीच्या पावलांनी जर्मन सैन्य सीमेकडे कूच करत होतं. अथक प्रयत्नांनंतर, अनेक तासांनी फ्रांसला भनक न लागू देता जनरल माईनस्टाईन आणि जर्मन सैन्य फ्रान्समध्ये घुसलं. त्यांच्या योजनेनुसार फ्रांसचं सैन्य दोन भागात विभागलं गेलं आणि त्यांची ताकद कमी झाली. पुढे काय झालं हे तर आपल्याला माहितीच आहे.

पण जर का त्यावेळी फ्रान्स हाय कमांडने आपल्या हवाई दलाच्या सूचनांकडे लक्ष देऊन त्यावर अंमलबजावणी केली असती तर फ्रान्स आणि ब्रिटीश सैन्य मिळून सहज जर्मनीला त्या जंगलातच कोंडीत पकडू शकले असते. इतकंच नाही तर, त्यांचे सगळे रणगाडे आणि इतर साहित्य नष्ट करून टाकू शकले असते.

जर हे झालं असतं तर कदाचित दुसऱ्या महायु*द्धाचं चित्र काहीतरी वेगळंच राहिलं असतं. पण, इतिहासात जर तरला काहीच अर्थ नसतो!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आज मैलाच्या दगडावरच्या या रंगांचा अर्थ माहिती करून घ्या !

Next Post

जहाजावर काम करणाऱ्या कामगाराने लावला होता व्हॅसलिनचा शोध !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जहाजावर काम करणाऱ्या कामगाराने लावला होता व्हॅसलिनचा शोध !

ब्रिटिशांच्या नाकर्तेपणामुळे ४० लाख बंगाली लोकांचा दुष्काळाने होरपळून जीव गेला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.