The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिटार हे ग्रीकांनी आपल्याला दिलेलं अजून एक अनमोल गिफ्ट आहे

by द पोस्टमन टीम
30 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


गिटारने संगीताच्या क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. आज संगीत मैफिलींमध्ये मोठ्या प्रमाणावर गिटारचा वापर करण्यात येतो. मोठमोठे चित्रपट असो की संगीतकारांचे कॉन्सर्ट्स, प्रत्येक ठिकाणी गिटार हा असतोच.

गिटार हे वाद्य आज लोकप्रिय असले तरी त्याचा शोध आठव्या शतकात लागला होता. युरोपात सर्वप्रथम गिटारचा वापर करण्यात आला होता. सुरुवातीला याला वीणा म्हणून ओळखले जात होते. काही इतिहासकार मानतात की गिटारचा शोध हा प्राचीन ग्रीक लोकांनी लावला होता. प्राचीन काळच्या लोकांना संगीताची फार आवड होती. लोक थंडी पडल्यावर शेकोटी तयार करून तिच्या सभोवती एकत्र येऊन बसत. त्यावेळी लोक एका लाकडाला एक तार बांधून त्यातील तरंगातून निर्माण होणाऱ्या संगीताचा आनंद घ्यायचे. आजही अशा प्रकारची दृश्ये आपल्या  काही प्राचीन काळाचे दर्शन घडवणाऱ्या चित्रपटात देखील असे गिटार दाखवण्यात आले आहेत.

प्राचीन ग्रीक संस्कृतीत गिटारचा ‘कितारा’ म्हणून उल्लेख केला जायचा. यावरूनच गिटार हा शब्द प्रचलित झाल्याचे मानले जाते.

जगभरात आजवर झालेल्या अनेक संस्कृतींचा संगीत एक महत्त्वाचा भाग आहे. संगीतामुळे प्रत्येक संस्कृतीला एक वेगळी ओळख निर्माण करता आली आहे. युरोपात पॉप संगीत लोकप्रिय असून भारतात लोक शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत. हळूहळू संगीतात विविध वाद्यांचा शोध लावण्यात आला. यातूनच आधुनिक गिटारचा जन्म झाला.

गिटारच्या रचनेत काळानुसार अनेक बदल घडत गेले. सुरुवातीच्या काळात लाकडाच्या पृष्ठावर तार बांधून गिटार वाजवला जात होता. आधी चपटा चौकोनी असा लाकडाचा आकार होता, पुढे काळानुसार त्याचा आकार गोलाकार करण्यात आला. यानंतर यामधे तारा गुंफण्यात आल्या, ज्यामुळे संगीताची एक वेगळीच धुन तयार होऊ लागली.



ज्यावेळी गिटारच्या माध्यमातून निरनिराळ्या स्वरांची व तालांची निर्मिती होऊ लागली, त्यावेळी गिटारला इतर संगीतवाद्यांपेक्षा अधिक महत्त्व मिळण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गिटार तयार करण्यात आले.

गिटारचे दोन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले आहे. एका श्रेणीत होता ध्वनिक गिटार तर दुसऱ्या श्रेणीत इलेक्ट्रिक गिटारचा समावेश करण्यात आला. या दोन्ही प्रकारच्या गिटारांच्या रचनेत आणि आवाजात फरक आहे. ध्वनिक गिटार हे हातांनी तयार करण्यात येतात. संगीतकार आपल्या आवडी व सोयीनुसार तारांमध्ये बदल करून त्याच्या मनाप्रमाणे ध्वनिक गिटार वाजवू शकतो. ध्वनिक गिटारांचा आवाज जरी कमी असला तरी संगीताला एक सुंदर लय आणि ताल यामुळे मिळतो. ध्वनिक गिटारातून बाहेर पडणाऱ्या स्वरांनी कानाला आराम मिळतो, मन शांत होते, माणसाला एक वेगळेच समाधान प्राप्त होते. ध्वनिक गिटाराचे संगीत हे मंत्रमुग्ध करणारे असते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पूर्वीच्या काळी जेव्हा माईकचा शोध लागला नव्हता, तेव्हा ध्वनिक गिटारचा आवाज मर्यादित लोकांना ऐकू यायचा. बऱ्याचदा संगीताच्या मैफिलीत मागच्या रांगेत बसणाऱ्या व्यक्तींच्या कानांपर्यंत हा आवाज पोहचत नव्हता. याचा परिणाम असा झाला की लोक यामुळे गिटारच्या कॉन्सर्ट अथवा संगीत मैफिलींना कमी उपस्थित राहू लागले.

ध्वनिक गिटारच्या मर्यादेमुळे आणि त्याच्या लोकप्रियतेत आलेल्या कमतरतेमुळे हळूहळू हे वाद्य हद्दपार होण्यास सुरूवात होऊ लागली होती. पण माईकचा शोध लागला आणि गिटार लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली. गिटारवादक माईकसमोर गिटार वाजवायचे आणि त्याचा आवाज लोकांपर्यंत पोहचायचा.

पुढे याच पद्धतीच्या गिटारवादनातून ‘पॉप्युलर म्युझिक’ अर्थात ‘पॉप म्युझिक’ या संगीतप्रकाराचा उदय झाला.

आधी शास्त्रीय संगीत प्रकारात वाजवण्यात येणारा गिटार आता मनोरंजनासाठी देखील वाजवण्यात येतो. यानंतर इलेक्ट्रिक गिटारचा शोध लावण्यात आला. इलेक्ट्रिक गिटारच्या मदतीने अनेक प्रकारच्या नवीन स्वरांची निर्मिती करणे शक्य आहे. या गिटारमध्ये नायलॉनच्या तारांचा वापर करण्यात आला असल्यामुळे यामधून निर्माण होणारा स्वर हा ध्वनिक गिटारापेक्षा जास्त तीव्रतेचा असतो.

इलेक्ट्रिक गिटारच्या शोधानंतर पॉप संगीताला एक वेगळी ओळख मिळाली. पाश्चिमात्त्य देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गिटारचा वापर करण्यात येतो. फिल्म्स, संगीत कॉन्सर्टमध्ये देखील आता इलेक्ट्रिक गिटारचाच वापर करण्यात येतो. जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सन देखील त्याच्या कार्यक्रमात इलेक्ट्रिक गिटार हातात घेऊन नाचायचा. जीम मॉरिसन देखील इलेक्ट्रिक गिटारच्या वापरासाठी प्रसिद्ध होता. हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या बहुतांश गाण्यात इलेक्ट्रिक गिटारचा प्रयोग करण्यात आला आहे.

आज पाश्चिमात्त्य देशात उदयास आलेले हे वाद्य भारतातदेखील लोकप्रिय ठरते आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जगात कितीही राडे झाले तरी स्वित्झर्लंड त्यात का पडत नाही..?

Next Post

नादिया मुराद : ही महिला आयसिस विरोधात खंबीरपणे उभी राहिलीये

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

नादिया मुराद : ही महिला आयसिस विरोधात खंबीरपणे उभी राहिलीये

डेथ व्हिसल म्हणून फेमस झालेली ॲझटेक व्हिसल काय आहे हे संशोधकांना अजून कोडंच आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.