The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या खेळाडूंनी त्यांच्या पहिल्याच नाही तर शेवटच्या मॅचमध्येसुद्धा शतक ठोकलंय

by द पोस्टमन टीम
23 April 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेट हा खेळ आज भारतातील गल्लीबोळातून खेळला जातो. क्रिकेटमधील कुठल्या खेळाडूच्या नावावर कुठला रेकॉर्ड आहे हे तर क्रिकेटप्रेमींना असते. निदान आपल्या आवडत्या खेळाडूबद्दल तरी माहिती असतेच असते.

आपल्या पदार्पणाच्या मॅचमध्ये आणि आपल्या निवृत्तीच्या मॅचमधे शतक ठोकले आहे, असा अनोखा विक्रम नोंदवणारे हे क्रिकेटवीर कोण आहेत आणि यात तुमच्या आवडत्या खेळाडूचे नाव आहे का जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

रेझी डफ (ऑस्ट्रेलिया)

रेझी डफ पहिला सामना खेळला होता तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड. १९०२ साली झालेल्या या सामन्यामध्ये त्याने १०४ धावा काढल्या होत्या. त्याच्या या धावसंख्येमुळे ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकू शकला.

१९०५ पर्यंत रेझी फॉर्ममध्ये होता. पण, यानंतर त्याची कामगिरी घसरू लागली. अशातच तो नशेच्या आहारी गेला. त्यामुळे त्याला वयाच्या २७व्या वर्षीच खेळातून निवृत्ती स्वीकारावी लागली.

१९०५ साली ओवल मैदानात खेळलेला सामना त्याचा शेवटचा सामना होता. या सामन्यातही त्याने १४६ धावांचा डोंगर उभा केला होता. पण, यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. १७ ऑगस्ट १८७८ रोजी जन्मलेल्या रेजीचे पूर्ण नाव होते रेजिनाल्ड अलेक्झांडर डफ, १३ डिसेंबर १९११ रोजी वयाच्या ३३व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला.



बिल पॉन्सफोर्ड (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील एक उत्कृष्ट सलामीवीर म्हणून त्याला ओळखले जाते. बिल पॉन्सफोर्डचा जन्म १९ ऑक्टोबर १९०० रोजी झाला. १९२४ साली त्याने पहिला सामना सिडनीच्या मैदानात खेळला होता. या सामन्यात त्याने ११० धावा करून सर्वांचे लक्ष वेधले होते.

१९४३ साली जेव्हा त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा शेवटच्या सामन्यात त्याने २६६ धावा काढल्या होत्या. हा सामना ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड असा होता. एकूण २९ कसोटी सामने तो खेळला होता ज्यात सरासरी ४८.२२ प्रमाणे त्याने एकूण २१२२ धावा मिळवल्या होत्या. वयाच्या ९०व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया)

ग्रेग चॅपेलला तसे तर क्रिकेटमध्ये अनेक गोष्टींसाठी आठवले जाते. यात जितक्या चांगल्या गोष्टी आहेत तितक्याच वादग्रस्त गोष्टींचाही समावेश होतो. ग्रेगने एकूण ८७ कसोटी सामने खेळले आणि एकूण ७११० धावा मिळवल्या. १९७० साली त्याने पहिला सामना खेळला होता तो इंग्लंड विरुद्ध या पहिल्याच सामन्यात त्याने १०८ धावा काढत पहिले शतक पूर्ण केले.

१९८४ साली सिडनीच्या मैदानात झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना त्याने १८२ काढल्या होत्या.

कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यातही त्याने सहजरीत्या शतक पूर्ण केले. ग्रेग चॅपेलने काही काळ भारताचे प्रशिक्षकपदही भूषवले.

मोहम्मद अझरूद्दीन (भारत)

मोहम्मद अझरूद्दीन तर क्रिकेटचा जादुगार म्हणूनच ओळखला जातो. भारताच्या क्रिकेट टीमला लाभलेला एक सर्वोत्तम कॅप्टन!

८ फेब्रुवारी १९६४ रोजी अझरूद्दीनचा जन्म झाला. त्याने आपला पहिला कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध खेळला होता. या पहिल्यावहिल्या सामन्यात अझरने ११० धावा बनवल्या. मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात अडकल्याने त्याच्या खेळण्यावर बंदी घालण्यात आली.

२००० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेला सामना त्याच्या शेवटचा सामना ठरला ज्यात त्याने १०२ धावा केल्या होत्या.

अझरने ९९ कसोटी सामने खेळले आणि यात त्याने ६२१५ धावा केल्या. मॅच फिक्सिंग प्रकरणात जर अडकला नसता तर कदाचित १०० कसोटी सामने खेळावे हे अझरचे स्वप्न सहज पूर्ण झाले असते. त्याने ३३४ एक दिवसीय सामने खेळले. यातही त्याने एकूण ९३७८ धावा केल्या.

ॲलीस्टर कुक (इंग्लंड)

या यादीतील आणखी एक नाव म्हणजे ॲलीस्टर कुक. इंग्लंडच्या टीममधील ते सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये कुकचे नाव पहिले घेतले जाते. तो इंग्लडचा एक उत्तम सलामीवीर होता. २००६ साली नागपूरला भारताविरुद्ध झालेल्या सामन्यातून त्याने खेळाला सुरुवात केली. या सामन्यात त्याने १०४ धावा काढल्या होत्या.

२०१८ साली त्याने शेवटचा सामना खेळला तोही भारताविरुद्धच. यात सामन्यातही त्याने १४७ धावा केल्या.

सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा क्रमांक पाचव्या स्थानावर आहे. ॲलीस्टरच्या आधी या यादीत तेंडुलकर, रिकी पॉंटिंग, जॅक्स कॅलीस आणि राहुल द्रविड यांचा नंबर लागतो.

ॲलीस्टरने एकूण १६१ कसोटी सामने खेळले. यात त्याने एकूण १२४७२ धावा केल्या आहेत. शिवाय, पदार्पण आणि निवृत्ती अशा दोन्ही वेळेस शतक ठोकून हाही विक्रम स्वतःच्या नावावर केला. विशेष म्हणजे कुकचा पदार्पणाचा सामनाही भारता विरुद्ध आणि निवृत्तीचा सामनाही भारता विरुद्धच होता.

या सगळ्या दिग्गज खेळाडूंनी आता क्रिकेटला रामराम ठोकला असला आहे. पण, यांच्या चाहत्यांच्या मनात आजही यांचे स्थान कायम आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

समाजाच्या काळ्या बाजूला प्रकाशझोतात आणणारा मंटो प्रत्यक्षात एक संसारी गृहस्थ होता..!

Next Post

भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी महिलेची नियुक्ती व्हायला ४० वर्ष लागले

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी महिलेची नियुक्ती व्हायला ४० वर्ष लागले

आजही अनेक देश यु*द्धनीती तयार करण्यासाठी या हजार वर्ष जुन्या पुस्तकाचा आधार घेतात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.