The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा अलवरच्या राजाने आलिशान रोल्स रॉइसचा वापर कचरा उचलण्यासाठी केला होता

by द पोस्टमन टीम
13 June 2025
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


एकेकाळी भारतातील राजे इतके श्रीमंत होते की ब्रिटिशांना देखील त्यांच्या श्रीमंतीचा हेवा वाटायचा. हिरे-माणिक, सोने-नाणे असो की आलिशान गाड्या, भारतीय राजे आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची एकही संधी सोडत नव्हते. या अशाच राजांपैकी एक होते महाराजा जयसिंह!

अलवरच्या या महाराजाने आलिशान गाड्यांची निर्मिती करणाऱ्या रोल्स रॉइसचा माज उतरवला होता. महाराजा जयसिंह यांचा हा किस्सा फार प्रसिद्ध आहे.

महाराज जयसिंह हे गर्भश्रीमंत होते. असे म्हणतात की, त्यांच्याकडे एवढी संपत्ती होती की त्यांच्या कित्येक पिढ्यांनी बसून खालले असते. गोष्ट आहे १९२० सालची. ज्यावेळी जयसिंह लंडनला गेले होते. भारतात ते जरी सोने, भरजरी वस्त्रे परिधान करून अनेक गाड्यांच्या ताफ्यात फिरत असले तरी लंडनमध्ये एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे ते जीवन जगत होते. ते साधारण वस्त्र आणि सोबत नोकर चाकर न घेता, शहराच्या प्रवासावर निघायचे.

एकदा असेच फिरस्तीवर असताना ते रोल्स रॉइसच्या शोरूमसमोर येऊन उभे राहिले. ते आलिशान गाड्यांचे शौकीन असल्यामुळे त्यांनी तेव्हाच रोल्स रॉइस विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि शोरूममध्ये प्रवेश केला.

आपल्याला आवडीची रोल्स रॉइस गाडी विकत घेण्यासाठी ते दुकानात गेले. तिथे आत गेल्यावर त्यांची एका गाडीवर नजर पडली. त्या गाडीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. ते त्या गाडीची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेण्यास उत्सुक होते. पण तिथल्या सेल्समनने महाराजा जयसिंह यांना पाहिले आणि त्याचा राग अनावर झाला. त्याला वाटले की ते एखादे गरीब भारतीय आहेत.



सेल्समनने जयसिंह यांना गाडी दाखवण्यास नकार देत, त्यांना धक्के मारून दुकानाच्या बाहेर काढले. जयसिंह यांना एवढा अपमान होऊन देखील वाईट वाटले नाही. ते संताप न करता, शांतपणे उभे राहिले. ते आपल्या संतापावर नियंत्रण ठेवून थंड डोक्याने त्यांच्या अपमानाचा बदल घेऊ इच्छित होते. ते दुकानातून हॉटेलच्या दिशेने रवाना झाले.

हॉटेलला पोहचल्यावर ते फार संतप्त होते. त्यांच्या डोक्यात फक्त रोल्स रॉइसला धडा शिकवायचा हा एकच विचार होता. त्यांनी पुन्हा राजसी वस्त्र धारण केले आणि त्यांनी त्या शोरूमला कळवले की अलवरचे महाराज गाडी खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये येणार आहेत. महाराज येणार म्हणून शोरूमच्या बाहेर रेड कार्पेट अंथरण्यात आले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

महाराज आले तेव्हा प्रत्येकाने त्यांच्यासमोर आपली मान खाली घातली आणि महाराजाने तिथल्या सर्वांत महाग गाड्या विकत घेतल्या आणि नगद पैसे देऊन गाड्या खरेदी केली. महाराजांची एवढी मोठी ऑर्डर बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी त्या गाडयांना भारतातील आपल्या राजमहलावर त्या सेल्समनसह पोहचवण्यास सांगितले. शोरूममधले लोक त्यावेळी मोठी ऑर्डर मिळाल्याचा आनंद साजरा करत होते, पण महाराजांनी मात्र एक वेगळीच योजना आखली होती.

गाड्या भारतात आल्यावर महाराजांनी आपला खेळ खेळण्यास सुरुवात केली.

सगळ्या गाड्या त्यांनी नगरपालिकेला भेट म्हणून दिल्या आणि आदेश दिले की आजपासून या गाड्यांचा वापर कचरा गाडी म्हणून करण्यात यावा. हे बघून सेल्समनच्या पायाखालची जमीन सरकली. जसा गाड्यांचा कचरा वाहून नेण्यासाठी वापर करण्यात येऊ लागला, तशी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली.

प्रत्येकाला एवढी महाग गाडी कचरा गाडी म्हणून वापरण्यास दिली, याचे आश्चर्य वाटले. रोज सकाळी आलिशान रोल्स रॉइसमध्ये कचरा भरताना बघून इंग्रजांच्या तोंडावरचा रंग उडाला होता. महाराजा जयसिंह यांच्या या खेळीने तो सेल्समन पाणी पाणी झाला होता, त्याला कळून चुकले होते की त्याने चुकीच्या माणसाशी  पंगा घेतला होता.

ज्यावेळी ही बातमी युरोपात पोहचली त्यावेळी रोल्स रॉइसचे ग्राहक दुःखी झाले. रोल्स रॉइस ही श्रीमंतीचे लक्षण होते. तिचा असा वापर केल्यामुळे तिची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. हळूहळू रोल्स रॉइसचे मार्केट कोसळले. ग्राहकांना त्या गाड्यांमध्ये अजिबात रस उरला नव्हता. कंपनीचे व्यवहार कमी होत चालले होते. दुसरीकडे महाराज या सर्वच गोष्टींचा आनंद घेत होते. त्याची खेळी यशस्वी ठरली होती.

ज्यावेळी रोल्स रॉइस आपली आब्रु वाचवण्यात असमर्थ ठरली, त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महाराज जयसिंह यांची पत्र लिहून माफी मागितली आणि म्हणाले की तुम्ही गाड्यांमधून कचरा उचलणे बंद करावे. इतकंच नाही त्यांनी महाराजांना सहा नव्या रोल्स रॉइस देण्याचे देखील वचन दिले. जयसिंहने यानंतर कंपनीला माफ करत कचरा उचलण्याचा कामावर बंदी आणली.

महाराज जयसिंह यांच्या या संपूर्ण रोल्स रॉइस प्रकरणातून कुठल्याही व्यक्तीला वेशभूषेचा आधारावर तोलणे चुकीचे आहे, ही शिकवण मिळते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मान सिंह – असा डाकू ज्याने गरिबांच्या कल्याणासाठी गुन्हेगारीचा मार्ग पत्करला होता

Next Post

बॉलिवूडच्या चित्रपटांना वैतागला असाल तर हे ‘पैसावसुल’ दक्षिणात्य चित्रपट तुम्ही नक्की पहा !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

बॉलिवूडच्या चित्रपटांना वैतागला असाल तर हे 'पैसावसुल' दक्षिणात्य चित्रपट तुम्ही नक्की पहा !

युगांडाच्या विमानतळावर घुसून मोसादने आतं*कवाद्यांचा खा*त्मा केला होता!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.