The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अशा चित्रविचित्र कामगिऱ्या करून या भारतीयांनी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलंय

by द पोस्टमन टीम
24 February 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् ही अशी नोंदवही आहे, ज्यात जगभरातील रोकॉर्डसचे कलेक्शन करण्यात आले आहे. दरवर्षी या गिनीज बुकची नवीन आवृत्ती बाहेर पडते, ज्यात सर्व रेकॉर्ड्स नोंदवले जातात. गिनीज बुक हे जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे. यात खूप साऱ्या भारतीय लोकांचे नाव देखील वेगवेगळ्या  रेकॉर्डसाठी नोंदवण्यात आले आहे.

चला आपण अशाच काही अजबगजब भारतीयांबद्दल जाणून घेऊ ज्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये आहे..

सर्वात मोठी पगडी

पंजाबचे अवतार सिंह मौनी नामक गृहस्थ जगभरात त्यांच्या विशेष टोपीसाठी ओळखले जातात. त्यांची ही विशालकाय पगडी तब्बल ६५१ मीटर लांब कापडापासून तयार करण्यात आली आहे. ही पगडी घालून जेव्हा ते रस्त्यावर चालतात, तेव्हा लोकांच्या नजरा त्यांच्यावर स्थिरावतात. त्यांचा गिनीज बुक रेकॉर्ड आजवर कोणीच मोडू शकलेलं नाही.

सगळ्यात छोटी महिला

नागपूरच्या ज्योती आमगे या जगातील सर्वात छोट्या महिला असून त्यांची उंची फक्त ६२.८ सेंटीमीटर इतकी आहे. त्यांना पृथ्वीवरील सर्वात छोटी महिला मानले जाते. त्यांची अनेक प्रकारे चाचणी करून यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यांची उंची इतकीच असून त्या याहून १ सेंटीमीटर लहान अथवा मोठ्या नाहीत,



सगळ्यात लांब मिशी

आजकल मिश्या ठेवण्याची फॅशन आहे. पण जयपूरचे राम नामक गृहस्थ हे मिश्यांचे इतके दिवाने आहेत की त्यांनी त्या कधी कापल्याच नाहीत. त्यांच्या मिश्या इतक्या वाढल्या की त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. आज त्यांच्या मिशा १८.५ फूट लांब आहेत. १९७० पासून ते मिशा वाढवत असून रोज दोन तास त्यांची  निगा राखण्यात घालवतात.

नाकाने टायपिंग

खुर्शीद हुसेन नावाच्या युवकाने तब्बल ६ तास प्रॅक्टिस करून ४७ सेकंदात आपल्या नाकाने १०३ शब्द टाईप केले आहेत. त्यांनी नाकाने टायपिंग करून हा रेकॉर्ड बनवल्याने सर्वत्र त्यांचे करण्यात आले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

फास्टेस्ट डिस्टन्स लिम्बो स्केटिंग

५ वर्षीय श्रेया देशपांडेने आपल्या टॅलेंटने अनेकांना धक्का दिला आहे. त्यांनी २६ गाड्यांच्या खालून स्केटिंग करून एक जागतिक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे. त्यांनी आपल्या या रेकॉर्डसाठी १५८ फूट २ इंच अंतर कापले आहे. या अगोदर अंकित कोकणे नावाच्या बेळगावच्या मुलाने १२६ फूट अंतर पार करून हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला होता. श्रेयाचे आई वडील बिझनेसमन असून, श्रेयाने हा रेकॉर्ड करण्यासाठी वर्षभर मेहनत घेतली आहे.

शरीरावर बनवले ३०५ देशांच्या झेंड्याचे टॅटू

हा एक वेगळ्या प्रकारचा रेकॉर्ड आहे. एका सत्तर वर्षीय भारतीय व्यापाऱ्याने स्वतःच्या शरीरावर ३०५ देशांच्या झेंड्यांचे टॅटू बनवले आहे. प्रकाश ऋषि असे या व्यक्तीचे नाव आहे. ज्यावेळी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले होते, त्यावेळी ते म्हणाले होते की लोक मला मुर्ख आणि जोकर म्हणतात पण यामुळे माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यांना हे आवडले म्हणून त्यांनी हे केले. त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्याचा आनंद असल्याचे देखील ते म्हणाले होते.

सगळ्यात मोठे नखं

रेकॉर्ड बनवण्यासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही. काही लोक यासाठी इतके कष्ट घेतात की ते तहानभूक देखील विसरतात. एक व्यक्तीने तर चक्क आपले नख वाढवले आहेत. श्रीधर चिल्लम असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या नखांसाठी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदवण्यात आले आहे. तब्बल ७८ वर्ष त्यांनी हाताचे नखं कापली नाहीत. हा रेकॉर्ड बनवणे त्यांच्यासाठी इतके सोपे नव्हते, यामुळे नख खराब होण्याची शक्यता होती. पण ते नख वाढवून त्यांचे संगोपन करण्यात यशस्वी ठरले. आज त्यांच्या नखांची लांबी ९०९ सेंटीमीटर इतकी आहे.

सगळ्यात तिखट मिर्ची खाण्याचा रेकॉर्ड

तामिळनाडूच्या आनंदिता दत्ता यांच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे. त्यांनी २ मिनिटाच्या कालावधीत जगातील सर्वात तिखट ५१ मिर्च्या खाल्ल्या होत्या. इतकेच नाही त्यांनी या मिर्च्यांना आपल्या डोळ्यात देखील टाकले होते. भूत मिर्ची म्हणून ओळखली जाणारी ही मिर्ची जगातील सर्वात तिखट मिर्ची आहे. एका स्पर्धेदरम्यान एका कुकने हे मिर्ची खाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.

सर्वाधिक लोकांची गळाभेट घेण्याचा रेकॉर्ड

लोक भेटल्यावर एकमेकांची गळाभेट घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का एका माणसाने २०१२ मध्ये २४३५ लोकांची तासभरात गळाभेट घेण्याचा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला होता. जयसिम्हा रविरा असे त्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या नावावर हा एकच नाही असे अनेक रेकॉर्ड नोंदवण्यात आलेले आहेत.

तर ही होती त्या अजबगजब भारतीयांची यादी ज्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपला ठसा उमटवला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

‘ये दिल मांगे मोअर’ म्हणत कॅप्टन विक्रम बत्राने पाकिस्तानी सैन्याचा सर्वनाश केला होता

Next Post

जपानने पर्ल हार्बरवर ह*ल्ला केला आणि हि*टल*रच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जपानने पर्ल हार्बरवर ह*ल्ला केला आणि हि*टल*रच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालं

शेन वार्नच्या स्वप्नातही सचिन त्याची धोधो धुलाई करायचा..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.