The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजस्थानमध्ये चक्क उंदरांचं मंदिर आहे !

by द पोस्टमन टीम
25 February 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


शीर्षक वाचून चक्रावलात ना? भारत मंदिरांचा देश म्हणून प्रसिद्ध आहेच, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात वेगवेगळी मंदिरं आहेत. ही मंदिरं वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्धही आहेत. कुठल्या मंदिराचा देव कोपतो, तर कुठे एखाद्या विशिष्ट पद्धतीने केलेलीच पूजा पावते, वगैरे वगैरे.

आज आपण जरा विचित्र वाटणाऱ्या अशा आगळ्यावेगळ्या उंदरांच्या मंदिराची गोष्टं वाचणार आहोत.

राजस्थानच्या बिकानेरपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर एक असं मंदिर आहे ज्या मंदिरात नजर जाईल तिथं तुम्हाला उंदरं दिसतील. एवढे उंदीर असूनही कोणी त्यांना पळवून लावत नाही, मारत नाही. उलट लोक त्यांचे लाडच करताना तुम्हाला दिसतात.

देशनोक येथे स्थित हे मंदिर करणी मातेचं मंदिर आहे. करणी मातेला लोक दुर्गेचं रूप मानतात. असं म्हणतात की या करणी मातेच्या मंदिराची स्थापना १५व्या शतकात बिकानेरचे महाराज गंगासिंह जी यांनी केली होती.

मुघलांच्या वास्तुशिल्पकलेपासून प्रेरणा घेऊन या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं होतं. आणि हेच मुख्य कारण ठरलं हे मंदिर इतकं प्रसिद्ध होण्याचं आणि इथं उंदीर येण्याचं.



एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उंदीर येण्यामागे बऱ्याच कहाण्या आहेत. यातील सगळ्यात प्रसिद्ध आहे २०,००० सैनिकांची गोष्टं.

एक मोठ्ठ यु*द्धं सुरु होतं, जवळपास २०,००० सैनिक हरणार अशा परिस्थितीत होते. त्यांनी आपला जीव वाचावा म्हणून लढाई न करता यु*द्धभूमीवरून पळ काढला. आणि ते येऊन पोहोचले देशनोकला. इथं करणी मातेला कळलं की ते यु*द्ध सोडून पळून आलेत, तिला प्रचंड राग आला. कारण त्याकाळी यु*द्ध सोडून पळून येणं हा गुन्हाच होता. या गुन्ह्याची शिक्षा म्हणजे डायरेक्ट मृत्युदंड! मातेला त्यांच्यावर दया आली, तिने त्यांची शिक्षा माफ केली पण त्यांना सगळ्यांना शिक्षा म्हणून उंदीर बनवलं आणि सध्या जिथे मंदिर आहे तिथे राहायला जागा दिली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आता गोष्ट किती खरी किती खोटी हे तर मानणाऱ्यावर आहे. पण इथल्या भक्तांसाठी मात्र हे उंदीर मंदिराचाच एक भाग आहे.

आज इथं वीस हजाराहून जास्तं उंदीर आहेत. करणी मातेप्रमाणेच त्यांचीही येथे पूजा होते. हे उंदीर येणाऱ्या भाविकांच्या अंगावर काय चढतात, लटकतात काय, त्यांच्या हातातला प्रसाद काय खातात! पण कोणीच त्यांना काहीच करत नाही. उलट तुम्ही प्रसाद खायच्या आधी जर या उंदरांनी खाल्ला तर ते शुभ मानतात.

इथं या उंदरांची विशेष काळजी घेतली जाते. यांच्यामुळेच आज हे मंदिर जगप्रसिद्ध झालं आहे. इथं कधी जाल तर पाय अगदी सांभाळून ठेवा, कारण कधी कुठून उंदीर पायाखाली येईल याचा काहीच नेम नाही. आणि मंदिरात नियमच आहे की उंदरांना कुठल्याच प्रकारे नुकसान पोहोचता काम नये! मारणं तर फार लांब!

इथं जर कोणी उंदराला मारलं तर त्याला लगेच शिक्षा देण्यात येते. त्या व्यक्तीला सोनं किंवा चांदीची उंदराची मूर्ती बनवून मंदिरात दान करावी लागते.

गंमत अशी की, जिथं जिथं उंदीर असतात तिथं हमखास आजारपणं येतातच. पण या मंदिरात, जिथं वीसेक हजार उंदीर आहेत, तिथं एकही व्यक्ती उंदरांमुळे आजारी पडलेली नाही. अगदी त्या उंदराचा उष्टा प्रसाद खाऊनही! याला जादूटोणा म्हणायचा की चमत्कार!

अजून एक अशीच गंमत आहे. इथं काळे आणि पांढरे दोन्ही उंदीर आहेत. पण पांढऱ्या उंदरांची संख्या तुलनेने कमी आहे. जर तुम्हाला काळ्या उंदरांमध्ये एक पांढरा उंदीर दिसला तर तुमचं भाग्य फळफळलं असं म्हणतात. कारण हा पांढरा उंदीर म्हणजे स्वतः करणी माताच आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे.

अशा या विचित्र वाटणाऱ्या, अद्भुत मंदिराबद्दल अजून काही माहिती तुम्हाला असेल तर आम्हाला नक्की कळवा! याशिवाय असे काही मंदिरं तुम्हाला माहिती असतील तर त्याबद्दलही कमेंट्समध्ये नक्की लिहा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

काय सांगता..? अमेरिकेत चक्क कुमार सानू दिवस साजरा केला जातो..!

Next Post

ब्लॉग : डॉक्टर हेडगेवार यांचे अखेरचे दिवस

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

ब्लॉग : डॉक्टर हेडगेवार यांचे अखेरचे दिवस

मंदिरं लुटणाऱ्या खिलजीच्या मुलीने एका हिंदू देवतेच्या प्रेमात स्वतःचा जीव दिला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.