The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मार्व्हलचा थॉर या लढवय्या जमातीचा देव आहे

by द पोस्टमन टीम
18 April 2025
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


व्हायकिंग यो*द्ध्यांबद्दल तुम्ही चित्रपटातून अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी पहिल्या असतीलच. त्यांना बघताना इतकी हिं*स्र आणि शूर जमात खरेच अस्तित्वात होती का? असा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल. आज आपण याच व्हायकिंग यो*द्ध्यांविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

व्हायकिंग ही एक शूर यो*द्ध्यांची जमात होती. या जमातीतील मुलांना अगदी लहान वयापासूनच लढण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. नुसते लढणे नाही तर लढताना कशाचीही पर्वा न करणे, अक्षरशः देहभान हरपून लढणे त्यांना शिकवले जाई. एवढेच नाही तर, असे लढणाऱ्यालाच स्वर्ग म्हणजे वल्हालामध्ये जागा मिळते अशी मान्यता होती. त्यांच्या पुराणकथा आणि श्रद्धेनुसार तुम्हाला जर लढताना मरण आलं आणि तुम्ही खरोखरच लढण्याचा आनंद मिळवला असेल तर मृत्यूनंतर असे यो*द्धे वल्हालामध्ये जातात. वल्हाला या जागेला या जमातीत स्वर्गाइतकेच महत्व आहे. या जमातीतही दोन प्रकारचे वंश आढळतात.

 एक कोल्ह्याचे वंशज आणि दुसरे अस्वलाचे. अस्वलाच्या वंशाचे सदस्य स्वतःला बेर्सेकर्स म्हणवून घेतात.

समुद्राच्या लाटांवर स्वार होऊनही ज्या चपळतेने यांच्या हालचाली सुरु असतात, ते पाहिल्यास आश्चर्याचा धक्काच बसेल. समुद्रातील पाणी असो की खोल नदीतील त्यांचा वेग आणि चपळता कुणालाच रोखता आलेली नाही. त्याच्या प्रत्येक जहाजावर एक लढाऊ सैनिकांची तुकडी असतेच. हे व्हायकिंग्ज अचानक कुठून येतील आणि ह*ल्ला करून लुटून पळून जातील याचा पत्ताही लागणार नाही. त्यांच्या थांगपत्ता लागणे निव्वळ अशक्यच.

आपल्या शत्रूची कमकुवत बाजू काय आहे, याची त्यांना चांगलीच माहिती असते. त्यामुळे त्यांना आपला शत्रू ठरवणेही सोपे जाते. फ्रँकिश सिव्हील वॉ*र (८४०-८४३) दरम्यान त्यांनी समुद्रकिनारी असलेल्या ब्रिटीशांच्या नि:शस्त्र मठांवर ह*ल्ला केला आणि फ्रांसच्या दिशेने पळून गेले होते.



भाला फेकण्यात आणि वापरण्यात आजपर्यंत त्यांच्याइतके तरबेज कुणीच ठरले नसेल. अगदी शत्रूकडून वेगाने आलेला भाला पकडून तोच उलटा शत्रूच्या दिशेने फेकण्याचे कसबही त्यांनी लीलया अवगत केलेले असे. भाला वापरण्यात ते अतिशय तरबेज होते.

त्यांच्याकडून वापरले जाणारे आणखीन एक शस्त्र म्हणजे कुऱ्हाड. जेव्हा यु*द्ध नसेल तेव्हाही त्यांना या शास्त्राचा फायदा व्हायचाच. म्हणून यु*द्धात कुऱ्हाड वापरण्याला ते निषिद्ध समजत असत. त्यांच्याकडे तलवारी असल्या तरी अगदी मोजक्याच असत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

एखाद्या यो*द्ध्यांकडे तलवार असणे हे त्याच्यासाठी मानाचे चिन्ह समजले जाई.

लढाईत शत्रूच्या ह*ल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी व्हायकिंग यो*द्धे लाकडाची ढाल वापरत. ही ढाल एक मीटर व्यासाची असे. ही ढाल बनवण्यासाठी शक्यतो ते लवचिक लाकडाचा वापर करत ज्यामुळे शत्रूचे शस्त्र त्या ढालीतच रुतून बसेल. श्रीमंत यो*द्ध्यांनाच फक्त लोखंडी किंवा साखळीचे चिलखत घालणे परवडत असे. व्हायकिंग्ज यु*द्धात शिरस्त्राण जरूर घालत पण, त्यांच्या शिरस्त्राणाला शिंगांसारखी आकृती बसवलेली नसे.

१८७० नंतर थिएटरमधून होणाऱ्या सादरीकरणात व्हायकिंग्जची पात्रे शिंगे असलेली शिरस्त्राणे वापरू लागले. ओपेरा कार्यक्रमात अशा प्रकारची व्हायकिंग्ज पात्रे दिसू लागली. मात्र ओरिजिनल व्हायकिंग अशा प्रकारचे शिरस्त्राण वापरत नसत.

बेर्सेकर्स व्हायकिंग्जची दहशत इतरांच्या मानाने जास्त होती. यु*द्धात स्वतःच्या रक्षणासाठी हे लोकं कुठल्याही प्रकारचे चिलखत वगैरे वापरत नसत, पण यु*द्ध लढताना त्यांना कसलेच भान राहत नसे. ते भान हरपून लढाई लढत असत. परंतु ते अस्वलाच्या कातडीपासून बनवलेले कपडेच परिधान करत ज्यामुळे ते बेर्सेकर्स आहेत हे सर्वांना सहज लक्षात येईल.

व्हायकिंग यो*द्धे लढताना देहभान हरपून लढत इतके की त्यांना त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमांचीही जाणीव नसे. फक्त लढायचं आहे आणि समोरच्याचे तुकडे तुकडे करायचे आहेत, एवढ्याच एका उद्देशाने ते अक्षरश: झपाटून गेलेले असत.

या व्हायकिंग यो*द्ध्यांमध्ये स्त्रियांचाही समावेश असे. मध्ययुगीन काळाचा विचार करता व्हायकिंग जमात खूपच पुढारलेली होती असेच म्हणावे लागेल. व्हायकिंग जमातीतील स्त्री यो*द्ध्यांच्या हाडांचे सापळे सापडले आहेत. १८८० साली स्वीडनचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ बिरका यांना अशाच प्रकारचा एक सापळा सापडला होता. या मृतदेहासोबत त्याच्या कबरीत तलवार, कुऱ्हाड, बाण, दोन ढाली आणि दोन घोडे देखील होते. या हाडाच्या सापळ्याची डीएनए टेस्ट केली तेव्हा हा सापळा एका स्त्रीचा असल्याचे सिद्ध झाले. या पुराव्यानंतर या समाजातील स्त्रियांबद्दल अधिक माहिती मिळवणे शक्य झाले.

आजपर्यंत व्हायकिंग जमातीचे पडद्यावर किंवा नाटकात जे चित्रण केले जाई, त्यात यो*द्धा स्त्रिया दाखवल्या जात पण ती निव्वळ एक कल्पना असावी असे वाटत होते. परंतु, या संशोधनानंतर या समाजातील स्त्रियांना इतर स्त्रियांच्या तुलनेत अधिक स्वातंत्र्य होते, हे सिद्ध झाले. त्यांना अधिकारही जास्त होते.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या स्त्रिया लढाईत भाग घेत होत्या असे मिळालेल्या पुराव्यांवरून लक्षात येते. या जमातीत खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता होती. 

नॉर्सने आपल्या काव्यात अशा स्त्री यो*द्ध्यांचा उल्लेख केला होता. पण ही एक कवीकल्पना असावी असेच वाटत होते. परंतु बिरकाच्या संशोधनामुळे हे स्पष्ट झाले की नॉर्सच्या काव्यातील स्त्री यो*द्ध्या या केवळ कल्पना नव्हत्या तर वास्तवातही अशा यो*द्ध्या स्त्रिया होऊन गेल्या आहेत.

आठव्या ते दहाव्या शतकाच्या काळात व्हायकिंग समाज अस्तित्वात होता. आज या समाजातील लोकांच्या कथा आणि त्यांच्या जीवनाविषयी वाचताना आपल्याला आश्चर्य वाटते. या समाजाच्या कथा आपल्याला कल्पनेच्याही पलीकडच्या वाटतात. परंतु, त्याकाळातील वातावरण, परिस्थिती या सगळ्यामुळे हे लोकं अधिकाधिक निडर, बेफिकीर बनले होते, हेच खरे. चांगले जीवन जगण्याच्या प्रबळ इच्छेनेच त्यांना हातात तलवार घ्यायला भाग पाडले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एवढे आधुनिकीकरण झाले तरीही अजून कच्च्या तेलाचे सर्व व्यवहार ‘बॅरेल’मधेच होतात

Next Post

ही आहेत जगाच्या इतिहासातील माहित नसलेली महत्त्वाची यु*द्धं..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

ही आहेत जगाच्या इतिहासातील माहित नसलेली महत्त्वाची यु*द्धं..!

नील आर्मस्ट्राँगच्या मृत्यूचं प्रकरण त्याच्याच पोरांनी पैसे घेऊन दाबलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.