The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एटीएम मशीन तयार करण्याची कल्पना एका चॉकलेट व्हेंडिंग मशीनवरून सुचली होती

by द पोस्टमन टीम
25 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्हाला तो काळ आठवतो का ज्यावेळी तुम्हाला बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेत तासन्तास रांगेत उभे रहावे लागत होते? त्यावेळी तुम्हाला असे वाटायचे की अशी एखादी मशीन असायला हवी होती, जिच्या मदतीने मी सहजपणे बँकेतून पैसे काढू शकेल? जर तुम्ही नव्वदच्या दशकात बँकेचे व्यवहार पार पाडले असतील तर कदाचित हा विचार तुमच्या डोक्यात नक्कीच आला असेल. पण तुमचा हा विचार इतक्या जलदगतीने एटीएम मशीनच्या रूपाने सिद्ध होईल, याचा तुम्ही स्वप्नात देखील विचार केला नसेल.

एटीएम मशीनने बँकेतून पैसे काढण्याची प्रक्रिया अगदीच सोपी करून टाकली आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की या एटीएम मशीनचा शोध लावणाऱ्या संशोधकाचे भारताबरोबर एक कनेक्शन आहे? ते कनेक्शन काय आहे हे आपण जाणून घेऊ आणि त्याबरोबरच बहुपयोगी एटीएम मशीनच्या इतिहासावर एक नजर टाकूया..

जॉन शेफर्ड या एटीएम मशीनच्या संशोधकाचा जन्म भारतात झाला होता. २३ जून १९२३ रोजी शिलॉंगला जन्माला आलेल्या शेफर्डचे वडील विलफ्रीड बेरॉन स्कॉटलंडहून कामाच्या निमित्ताने भारतात आले होते. उत्तर बंगालच्या चटगाव पोर्ट कमिशनमध्ये ते चीफ इंजिनियर म्हणून कार्यरत होते.

काही वर्षांतच ब्रिटिशांनी त्याच्या वडिलांना पदोन्नती दिली आणि त्यांची लंडन प्राधिकरणाच्या बंदरावर नेमणूक केली. यामुळे त्यांना शिलॉंग आणि भारताला रामराम ठोकावा लागला.

जॉन शेफर्डची आई डोरोथी ही एक ऑलिम्पिक विजेती खेळाडू होती, त्यामुळे तिला लहान जॉनकडे लक्ष द्यायला कधी जमलेच नाही. शेफर्ड आई आणि वडिलांच्या वादात अडकला होता. अखेरीस शेफर्डची युरोपात रवानगी करण्यात आली कारण त्याच्या आई वडिलांना जॉनच्या शिक्षणावर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. शेफर्ड शिलॉंगहुन युरोपला परतला आणि एडिनबर्गच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.



शिक्षण पूर्ण झाल्यावर तो युरोपातच स्थायिक झाला, त्याने तेथील डायला रुई नावाच्या कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. तो या कंपनीत प्रिंटिंगचे काम बघायचा. पुढे त्याची नियुक्ती कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदी करण्यात आली.

शेफर्डचे आयुष्य आरामात चालू होते. एक दिवस अचानकपणे त्याला काही पैशांची गरज भासली. पैसे काढण्यासाठी तो बँकेत पोहचला त्यावेळी कामकाज बंद झाले होते. बँक बंद असल्यामुळे त्याच्याच खात्यातून पैसे काढता आले नाही. अशात त्याची नजर जवळच्या चॉकलेट व्हेंडिंग मशीनवर पडली. आणि शेफर्डने याच प्रकारची एखादी मनी व्हेंडिंग मशीन तयार करण्याचा निर्णय घेतला.  हे काम इतके सोपे नव्हते. त्याने मशीन बनवायला सुरुवात केली खरी पण, पैसे तर कधी टेक्निकल कारणांमुळे हे काम थांबायचे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

शेवटी एक दिवस त्याला ही मशीन तयार करण्यात यश आले. जून १९६७ मध्ये त्याने पहिले एटीएएम तयार केले जे एनफिल्ड टाऊनच्या बर्कलेज बँकेत वापरण्यात आले.

शेफर्डची मशीन चर्चेत आल्यावर लुथर जॉन सिमियन नावाच्या अमेरिकन माणसाने १९३९ सालीच मशीन तयार केल्याचा दावा केला. पण त्यावेळी त्याच्या मशीनला कुठल्याच बँकेने आर्थिक व्यवहारात गौडबंगाल होऊ शकते, या भीतीपोटी परवानगी दिली नव्हती. लुथर जॉनने त्यानंतर तब्बल २१ वर्षे परिश्रम घेऊन त्या मशीनचे दुसरे सुधारित रूप तयार केले होते. त्यावेळी एक बँक ते मशीन वापरायला तयार देखील झाली होती पण ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यमुळे ते मशीन वापरण्यात आले नव्हते. यामुळे जॉन शेफर्डच्या संशोधनातून निर्माण झालेली एटीएम मशीन जगातील पहिली यशस्वी मशीन ठरली होती.

एटीएम मशीनमुळे आज आपले आयुष्य सुलभ होण्यास फार मोठी मदत झाली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

Next Post

एका कवीने तयार केली होती जगातील सर्वात धोकादायक अेके-४७ बंदूक !

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

एका कवीने तयार केली होती जगातील सर्वात धोकादायक अेके-४७ बंदूक !

सगळ्यांना फुकट आहे, जाहिराती पण दाखवत नाही तर मग व्हॉट्सॲप पैसे कसं कमावतं?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.