The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका कवीने तयार केली होती जगातील सर्वात धोकादायक अेके-४७ बंदूक !

by द पोस्टमन टीम
10 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एक कवी आपल्या कवितेतून त्याच्या मनातील सुंदर विश्वाचे दर्शन विश्वाला करून देत असतो. तो मनुष्याच्या आतील भावनिकतेला साद घालतो. पृथ्वीवरील सौंदर्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे कविता. यामुळे सामान्य माणूस कवी मनाच्या लोकांकडे जास्त आकर्षित होतो.

जगभरात अनेक कवी होऊन गेले, ज्यांना प्रतिभेमुळे प्रसिद्धी मिळाली. पण एक असा देखील एक कवी होऊन गेला ज्याला प्रसिद्धी त्याच्या साहित्यासाठी नाही तर, त्याने लावलेल्या अेके-४७ या बंदुकीमुळे प्रसिद्धी मिळाली होती. मिखाईल कलाश्निकोव्ह असे या कवीचे नाव. चला जाणून घेऊ हा कवी नेमका कोण होता..

अेके-४७ या बंदुकीच्या लोकप्रियतेची कथा फार प्रसिद्ध आहे. १९४१ मध्ये झालेल्या द्वितीय विश्वयु*द्धात सोव्हिएत संघाच्या लाल सेनेचा कमांडर मिखाईल कलाश्निक्लोव्ह जखमी झाला होता. परंतु मिखाईल झालेल्या जखमेमुळे दुःखी नव्हता. तो या विचारात होता की कशाप्रकारे त्याला एखाद्या अशा ह*त्याराची निर्मिती करता येईल ज्याच्या बळावर तो शत्रूंचा बिमोड करू शकेल. अशा बंदुकीची निर्मिती करावी जी काही क्षणात शत्रूच्या मोठ्या टोळीला एकाच वेळी यमसदनी पाठवू शकेल.

यु*द्धात जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये बेडरेस्ट सांगण्यात आला होता. तिथेच मिखाईलने बंदूक तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली.



तब्बल ७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना आधुनिक स्वरूपाच्या बंदुकीची निर्मिती करण्यात यश आले. त्याच्या या बंदुकीने इतिहास घडवला होता.

सन २०१३ मध्ये मिखाईलचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले.

मिखाईलचा जन्म रशियाच्या अल्ताई क्षेत्रातील कुरियर गावात झाला होता. त्याला बालपणापासून एक कवी व्हायचे होते. परंतु तो नंतर सैन्यदलात भरती झाले. तिथे असताना देखील त्याने आपले लिखाण थांबवले नाही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

मिखाईलने त्याच्या कौशल्याच्या बळावर अेके-४७ची निर्मिती केली होती. १९४१ मध्ये इस्पितळात असून देखील त्याने या बंदुकीचे मॉडेल तयार केले होते. पण त्याच्या वरिष्ठांना त्यावेळी ही बंदूक पसंत पडली नव्हती. १९४६ मध्ये एके-४६ या बंदुकीची चाचणी रशियाने केली होती. यानंतर १९४७ साली अेके-४७ ची निर्मिती करण्यात आली. तिचा वापर काही सैन्य तुकड्यांनी करण्यास सुरुवात केली.

पुढे मिखाईलने १९४९ मध्ये ६०० राउंड्स पर मिनिट या वेगाने फायरिंग करू शकेल या क्षमतेची बंदूक तयार केली. याचा वापर सोव्हिएत संघाने त्यांच्या ऑपरेशनमध्ये केला होता आणि फक्त २ वर्षाच्या कालावधीत ही बंदूक जगभरात प्रसिद्ध झाली. तेव्हापासून अेके-४७ ला इतर देशात निर्यात करण्यास सुरुवात करण्यात आली. यातून सोव्हिएतने मोठी कमाई केली.

मिखाईलची बंदूक फक्त सोव्हिएत बॉर्डर्सपर्यंत मर्यादित राहिली नाही. तिचा जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या बंदुकीच्या सूचीत समावेश करण्यात आला होता. जगभरातील ५० हुन अधिक देशात या बंदुकीचा वापर केला जात होता. अेके-४७ च्या लोकप्रियतेचे कारण तिचा सरळ वापर, विश्वसनीयता आणि उपयोगीता होती.

अेके-४७ ला जगातील पहिली आधुनिक बंदूक मानले जाते. १९४९ पासून आजतागायत या बंदुकीचा वापर करण्यात येतो आहे.

काळाबरोबर ही बंदुक आधुनिक झाली आहे पण मूळ सूत्र तसेच आहे. मिखाईलने बंदूक तयार करताना ती वापरण्यास सोपी असेल आणि तिला लवकर तयार करता येऊ शकेल या हिशोबाने तयार केले होते. ही बंदूक वॉटर प्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट होती, हे देखील या बंदुकीचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य होते.

या बंदुकीची लोकप्रियता इतकी होती की १९६० मध्ये अेके-४७ च्या निर्मितीचे असंख्य प्रकल्प विविध देशांमध्ये उभे राहिले. १९८० मध्ये चीनने या बंदुकीची निर्यात करण्यास सुरवात केली. मोझाम्बिक या देशात तर ही बंदूक इतकी प्रसिद्ध झाली की त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावर या बंदुकीचे चिन्ह लावले.

ईस्ट तिमोर आणि बुर्किनो फासो याचा वापर आपल्या कोटमध्ये करत होते. अनेक देशांमध्ये या बंदुकीचा वापर करण्यात येत आहे, याने मिखाईल आनंदी होता. इतर देशातील लोक ही बंदूक वापरून आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत, हे बघून त्याला समाधान वाटत होते.

या बंदुकीमुळे मिखाईलचे नाव सर्वदूर पसरले होते. त्याच्या नावाने आफ्रिकेच्या जंगलात एक बटालियन देखील होती. अेके-४७ चा वापर बऱ्याचदा तर नुकसान भरपाई देण्यासाठी करण्यात येत होता. अमेरिकन ड्रोनने येमेनमधील नागरिकांना बॉ*म्बस्फोटानंतर अेके-४७ दिली होती. आज अनेक जि*हा*दींना अेके-४७ देतात.

मिखाईलच्या या बंदुकीवर गाणे आणि साहित्याची निर्मिती देखील करण्यात आली आहे. अमेरिकन रॅपर लील वेन यांनी अेके-४७वर रॅप गाणे तयार केले होते. २०११ मध्ये लंडनच्या म्युझियमने जगातील प्रसिद्ध डिझाईनमध्ये मिखाईलच्या अेके-४७ बंदुकीचा समावेश केला होता. २००६ मध्ये कोलंबियन संगीतकार सीझर लोपेझने अेके-४७च्या रूपाची एक गिटार तयार केली होती. त्याने या माध्यमातून शांततेचा संदेश दिला होता. काही काळाने लोपेझनी ही गिटार १७००० डॉलर्सला विकली.

तसं पाहायला गेलं तर, मिखाईलला या बंदुकीपासून काहीच लाभ मिळाला नव्हता. या बंदुकीच्या निर्मितीसाठी त्याला स्टॅलिन मेडलने सन्मानित केले होते. १० नोव्हेंबर २००९ मध्ये त्याला रशियन राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेद्वेदेव यांनी हिरो ऑफ रशिया हा पुरस्कार प्रदान केला होता.

२३ डिसेंबर २०१३ रोजी त्याचे दुःखद निधन झाले. त्याने आपल्या मृत्यूपूर्वी एका भाषणात म्हटले होते की त्याची बंदूक आज ओसामा बिन लादेनसारखे लोक वापरत आहेत, याचेच त्याला भयंकर दुःख  आहे, पण यात तो काहीच करू शकत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एटीएम मशीन तयार करण्याची कल्पना एका चॉकलेट व्हेंडिंग मशीनवरून सुचली होती

Next Post

सगळ्यांना फुकट आहे, जाहिराती पण दाखवत नाही तर मग व्हॉट्सॲप पैसे कसं कमावतं?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

सगळ्यांना फुकट आहे, जाहिराती पण दाखवत नाही तर मग व्हॉट्सॲप पैसे कसं कमावतं?

चार्ल्स शोभराज तिहार जेलच्या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.