The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शास्त्रज्ञांनी माणसावरच केलेले हे प्रयोग वाचून कोणाच्याही अंगावर काटा येईल !

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मानवी संस्कृतीचा इतिहास हा प्रयोगांनी व्यापलेला आहे. अनेक वैज्ञानिक प्रयोगांनी माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परंतु काही प्रयोग असे देखील होते ज्यातून कल्याण कमी अपायच जास्त झाले आहेत. हे प्रयोग यशस्वी ठरले, त्यांनी विज्ञानात योगदान दिले पण ज्याप्रकारे हे प्रयोग करण्यात आले होते तो एकूणच प्रकार फार घृणास्पद होता.

आज आपण इतिहासातील काही अशा प्रयोगांची माहिती घेणार आहोत जे सफल झाले परंतु ते प्रयोग अत्यंत भयंकर होते. या प्रयोगांना त्यांच्या संशोधकांनी लोकांच्या आयुष्यापेक्षा जास्त किंमत दिली होती.

मानवी गर्भातून चिंपांझीला जन्म देणे

१९ व्या शतकातील रशियन वैज्ञानिक एलिया इवानोविच इवांनोव हे फार प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. १९०१ मध्ये त्यांनी झुलॉजिकल स्टेशनची स्थापना केली होती. याठिकाणी ते विविध जीवजंतूंचा अभ्यास करायचे. त्यांनी याकाळात अनेक हायब्रिड जीवांची निर्मिती केली होती. कृत्रिम गर्भधारणेच्या मदतीने त्यांनी जेव्हा एका हायब्रिड तयार केले तेव्हा जगभरात त्यांचा गाजावाजा करण्यात आला होता. यानंतर त्यांना निरनिराळे प्रयोग करण्याचे वेडच लागले.

एकदा चिंपांझीच्या शरीरातून मनुष्याला जन्म देण्याचे खुळ त्यांच्या डोक्यात शिरले. १९१० मध्ये झुलॉजिस्टच्या एका बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव ठेवला.

१९१०-२० या काळात यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले.

एकदा एका मादा चिंपांझीच्या योनीत यांनी मानवी शुक्राणू इंजेक्ट केले. पण हा प्रयोग अयशस्वी ठरला होता. यानंतर त्यांनी मानवी शरीरातून चिंपांझिला जन्म देण्याचा प्रयोग करण्यास सुरुवात केली, यासाठी त्यांनी पाच महिला स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की यासाठी ते त्या महिलांना उत्तम पैसे देतील. पण त्यांच्या या सनकी प्रयोगावर कुठल्याही महिलेचा विश्वास बसला नाही त्यामुळे हा प्रयोग कायमचाच अडगळीत पडला.

पावलोव यांचा “शास्त्रीय अनुबंधन” सिद्धांत

मनोविज्ञानाच्या जगात पावलोव व त्यांचा ‘शास्त्रीय अनुबंधन’ सिद्धांताशी सर्वच जण परिचित आहेत. हा सिद्धांत मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या स्वाभाविक प्रकृतीचे वर्णन करतो. या सिद्धांतानुसार एका विशिष्ट प्रकारच्या व्यवस्थेची सवय जर प्राण्यांना लावण्यात आली तर याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्यांच्या शारीरिक प्रक्रिया त्या व्यवस्थेशी एकरूप होऊ लागतात. त्यांनी आपला हा सिद्धांत समजावून सांगण्यासाठी एक खास प्रयोग केला होता.

त्यांनी अनुबंधित क्रियेला समजावून सांगण्यासाठी एका कुत्र्यावर प्रयोग केला. कुत्र्याच्या समोर जर अन्न ठेवले तर त्याच्या तोंडातून लाळ गळते. पावलोव यांनी आपल्या प्रयोगादरम्यान एका घंटीचा वापर केला. ते आधी घंटी वाजवायचे आणि मग कुत्र्याला खायला अन्न द्यायचे. घंटी वाजल्यावर कुत्रा पळत यायचा आणि त्याच्या समोर ठेवलेले अन्न बघून लाळ गाळायचा.

काही दिवस असे केल्यानंतर पावलोव यांनी पुढे काही दिवस फक्त घंटा वाजवली आणि कुत्र्याला जेवायला दिले नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आधी अन्न बघितल्यावर ज्या कुत्र्याची लाळ गळत होती, पण आता तोच कुत्रा घंटीच्या आवाजाने देखील लाळ गाळत होती.

हाच त्यांचा प्रसिद्ध शारिरीक अनुबंधनाचा सिद्धांत होता. या सिद्धांताला मनोविज्ञानात अनन्य साधारण महत्त्व आहे. कृत्रिम परिस्थिती देखील शारीरिक क्रियेवर परिणाम करू शकते हे या प्रयोगामुळे सिद्ध झाले.

असं म्हणतात की पावलोव यांनी हा प्रयोग करताना कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. त्यांच्या या प्रयोगाची त्यावेळी लोकांनी गंभीर आलोचना केली होती.

डोकं धडावेगळं करणारे गिलोटिन !

१८ व्या शतकापर्यंत मृत्युदंडाच्या शिक्षेची पद्धत फार क्रूर होती. बऱ्याचदा तलवार अथवा कुऱ्हाडीच्या मदतीने डोके धडावेगळे करण्यात येत होते. हा खूपच हिंसक आणि वेदनादायी प्रकार होता. हा प्रकार समोर घडताना पाहणे आणि त्याहून अधिक याला भोगणे प्रचंड वेदनादायी होते. तेव्हा फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीमध्ये डॉ. जे. गिलोटिन यांनी एका अशा यंत्राचा प्रस्ताव ठेवला ज्यामुळे झटपट मृत्युदंड देता येईल. खरंतर अशी यंत्रे आधी इतर देशात वापरली जात होती. पण गिलोटिन यात थोडे बदल केले.

त्यांनी मूळ स्वरूपात बदल करत चाकू अथवा कुऱ्हाडीच्या ऐवजी धारदार ब्लेडचा वापर करण्यास सुरुवात केली. हे यंत्र वापरून झटपट मृत्यू देता येतो असा दावा डॉ. गिलोटिन यांनी केला होता. सरकारने लगेचच काही गुन्हेगारांवर याचा प्रयोग करून त्यांना मृत्यूदंड दिला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने डॉ. गिलोटिन यांचे नाव यंत्राला देण्यात आले. भविष्यात असंख्य लोकांना हे यंत्र वापरून शिक्षा देण्यात आली होती.

युनिट ७३१ चे भयानक ऑपरेशन

दुसऱ्या महायु*द्धाची ज्यावेळी चर्चा करण्यात येते, त्यावेळी सर्वांच्या मनात जर्मनीने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचाराची आठवण आपल्याला होते. पण फक्त जर्मनीनेच कैद्यांवर अत्याचार केले होते असे नाही. असेच किंबहुना यापेक्षाही भयंकर अत्या*चार जापानने युनिट ७३१ प्रयोगान्वये आपल्या कैद्यांवर केले होते.

दुसऱ्या महायु*द्धाच्या वेळी युद्धकैदी आणि गुन्हेगारांच्या एका युनिटची निर्मिती करण्यात आली. या युनिटवर जापानी सैन्याने अमानवी प्रयोग केले. १९३६ मध्ये क्वांटगु आर्मीचे सर्जन जनरल शिरो इशी यांनी एका महामारीला थांबविण्यासाठी अनेक औषधे व इंजेक्शनची निर्मिती केली होती. त्यांनी याचा सरळ प्रयोग यु*द्धकैद्यांवर करण्यास सुरुवात केली.

शिरो इशी यांनी दुर्गम भागात आपल्या प्रयोगशाळा स्थापन करून तिथे माणसांवर हे अमानवी प्रयोग केले होते. ते प्रयोगाच्या वेळी कैद्यांना बेशुद्ध करण्याचे देखील कष्ट घेत नव्हते. त्यांनी शारीरिक अवयवांचे प्रत्यारोपण यावेळी केले होते. त्यांना स्वतःला याचा कैद्यांवर काय परिणाम होईल याची कल्पना नव्हती, तरीदेखील त्यांनी यु*द्ध संपेपर्यंत हा प्रयोग सुरूच ठेवला होता. बऱ्याचदा प्रयोगामुळे कैदी मृत्युमुखी पडायचे, पण जापानी सैनिकांवर याचा काहीच परिणाम झाला नाही.

स्वतःवर प्राणघातक प्रयोग करणारा संशोधक

ऑस्ट्रेलियाचे चिकित्सक बेरी मार्शल यांना साल २००५मधे नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.  त्यांनी तर्क लावला होता की हेलिकॉबॅक्टर पाईलोरी बॅक्टेरियामुळे मनुष्याला पेपटीक अल्सरचा धोका निर्माण होतो. त्यांना यासाठी प्रयोग करायचा होता. पण उंदीर वगळता इतर कुठल्याही प्राण्यावर प्रयोग करता येणार नव्हता. आता गिनी पिग नसल्यामुळे त्यांना हा प्रयोग करता येत नव्हता.

अखेरीस त्यांनी हा प्रयोग स्वतःवर करायचे ठरवले. हा प्रयोग त्यांच्या जीवाशी येणार होता, याची कल्पना असूनदेखील त्यांनी हा प्रयोग केला. त्यांनी जिवाणूंच्या नमुन्यांना शरीरात एकत्र केले.  पाच ते आठ दिवसांत त्यांच्या शरीरात अल्सरची लक्षणे दिसू लागली. त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला होता. त्यांनी एंडोस्कोपी करून हे सुनिश्चित केले की पोटात अल्सरची वाढ होते. यानंतर बराच काळ ते अल्सर ग्रस्त होते.

‘लिटिल अल्बर्ट’

लहान मुलांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित ‘लिटिल अल्बर्ट’या प्रयोगाला मनोविज्ञानाच्या जगात फार महत्व आहे. पावलोव यांच्या शास्त्रीय अनुबंधनाच्या सिद्धांतानंतर जॉन बी वॉटसन या बालमनोरोगतज्ञाला बालकांच्या मनोविज्ञानाचा अभ्यास करायचा होता. त्यांना पहायचे होते की जास्त आवाज असल्यावर लहान मुलांच्या मनात भयाची उत्पत्ती होते की नाही.

हे परीक्षण करण्यासाठी त्यांनी अल्बर्ट नावाच्या लहान मुलाची निवड केली. त्यांनी त्याला खेळायला खेळणी दिली, यानंतर त्याच खेळण्याच्या मागून आवाज करण्यात आला. त्या तीव्र आवाजामुळे अल्बर्ट बिथरला होता. यावरून वॉटसन यांचा मोठया आवाजाला मुलं घाबरतात हा सिद्धांत सिद्ध झाला होता.

वॉटसन यांचे सर्वत्र कौतुक केले जात होते परंतु ज्या अल्बर्ट नावाच्या मुलावर हा प्रयोग केला गेला होता तो इतका घाबरला की त्याच्या मनात मोठया आवाजाची भीती कायमचीच बसली होती.

हे जगभरात करण्यात आलेले काही विचित्र आणि अमानवी प्रयोग होते, यापासून विज्ञानात किती भर पडली हा मुद्दा वादाचा असला तरी यामुळे माणुसकीवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.


ShareTweet
Previous Post

एका ऑम्लेटमुळे फ्रेंच सैन्याला यु*द्धाला जायलाच उशीर झाला होता..!

Next Post

एकेकाळी ऑस्कर मिळवणाऱ्या अभिनेत्यावर कंगाल होण्याची वेळ आली होती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

एकेकाळी ऑस्कर मिळवणाऱ्या अभिनेत्यावर कंगाल होण्याची वेळ आली होती

टोमॅटो हे फळ आहे की भाजी हा वाद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालायात गेला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.