The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजस्थानमधील या गावात आहे चक्क ‘बुलेट’चे मंदिर!

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतात लोक अक्षरशः कोणाचंही मंदिर बांधून त्याची पूजा करू शकतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, आपल्याकडे एक असे देखील दुकान आहे जिथे देवतांच्या मूर्त्यांची पूजा न करता चक्क बाईकची पूजा करण्यात येते.

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील ओम बन्ना मंदिरात देवाच्या मूर्तीच्या जागी बुलेट मोटरसायकलची पूजा करतात. त्या मोटारसायकलवर हार फुल चढवले जातात. भारतात अनेक मंदीरं आहेत पण हे बाईकचे मंदिर मात्र विशिष्ट आहे. या मंदिरामागचा किस्सा काय आहे, जाणून घेऊ..

ठाकूर ओम सिंह राठोडचा पालीच्या चोटीला गावात ५ मार्च १९६५ मध्ये ठाकूर जोग सिंह राठोड यांच्या घरी जन्म झाला. राजस्थानमध्ये राजपुतांना “बन्ना सा” म्हणून हाक मारण्याची परंपरा आहे. यामुळे ओम सिंह राठोड यांना देखील ओम बन्नाच म्हणायचे. ओम बन्ना त्याच्या वडिलांचा एकुलते एक पुत्र होते. लहानपणापासूनच तो मोठ्या लाडाकोडात वाढला होता. त्याला तो मागेल प्रत्येक गोष्ट दिली जायची, ज्याच्यासाठी ते हट्ट करायचे. त्याला बाईक चालवण्याचा मोठी आवड होती. मोठा झाल्यावर ओमने स्वतःसाठी रॉयल एनफिल्ड गाडी विकत घेतली, त्याचे आयुष्य या गाडीच्या अवतीभोवती फिरत होते. तो प्रत्येक वेळी या बाईकवरच दिसायचा.

बाईक घेतल्यावर काही काळातच ओम बन्नाचा विवाह झाला. त्याची सासुरवाडी जास्त लांब अंतरावर नसल्यामुळे तो आपल्या बायकोला घेऊन नेहमी गाडीवरच तिच्या माहेरी जायचा.



२ डिसेंबर १९८८ रोजी, नेहमीप्रमाणे आपल्या बाईकवर बसून ओम बन्ना आपल्या पत्नीच्या गावी गेला. त्याची पत्नी गर्भवती असल्यामुळे ती माहेरी गेली होती. त्यावेळी तिला भेटून तो आपल्या गाडीवर बसून पुन्हा आपल्या घराच्या दिशेने निघाला. त्याला तिथून निघायला चांगलाच उशीर झाला, शिवाय तो ज्या रस्त्यावरून  जात होता त्या रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. रस्ता मोकळा आहे हे बघून त्याने गाडीचा वेग वाढवला, त्याची गाडी वाऱ्याच्या वेगाने पळू लागली.

ओम बन्ना आपल्या गाडीला वेगाने पळवत होता, इतक्यात समोर एक वळण आले. त्याने बाईकवर नियंत्रण मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला अपयश आले. गाडी पडली आणि ओम बन्ना लांब फेकला गेला. त्याचा त्या अपघातात दुर्दैवी अंत झाला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पडताळणीकरुन अपघाताचे प्रकरण म्हणून या घटनेला इतक्या गांभीर्याने घेतले नाही. प्रेत पोस्ट मोर्टमला पाठवून पोलीस गाडीला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनच्या बाहेर ओम बन्नाची बाईक लावण्यात आली. दुसऱ्या दिवशी पोलीस जेव्हा परतले त्यावेळी त्यांनी पाहिले की गाडी त्याठिकाणी नव्हती. अचानक गाडी गायब झाली. पोलिसांना वाटले की कुठल्या चोराने मोठी हिंमत करून पोलीस स्टेशनमधूनच बाईक चोरली असावी. पोलिसांनी इतर पोलीस स्टेशनला बाईक चोरीला गेल्याची सूचना दिली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

काही वेळाने चोटीला गावाजवळ दुर्घटनास्थळी पुन्हा ती गाडी आढळून आली. कुठल्या चोराने ही गाडी येथे आणून सोडली असेल, असा पोलीसांचा समज होता. पोलीस पुन्हा त्या बाईकला स्टेशनमध्ये घेऊन आले. दुसऱ्या दिवशी पोलीस आले तेव्हा गाडी पुन्हा तिथून गायब होती आणि शोधल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी मिळाली जिथे ओम बन्नाचा अपघात झाला होता. पोलीस गाडी पुन्हा स्टेशनवर घेऊन गेले आणि त्यावर पहारा देण्यासाठी पहारेकरी नेमले. पण तरीदेखील त्या दोघांना एकाएकी झोप लागली आणि गाडी पुन्हा गायब होऊन त्याठिकाणी पोहचली. पोलीसांनी अनेक उपाययोजना करून त्या बाईकला रात्री गायब होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा पुन्हा गाडी गायब होत होती. बांधून ठेवली तरी गाडी गायब होत होती.

जेंव्हा ही घटना आसपासच्या गावकऱ्यांना समजली तेव्हा त्यांनी याला चमत्कार मानायला सुरुवात केली. गावकरी ओम बन्ना यांच्या वडिलांना व परिवाराला घटनास्थळी घेऊन गेले.

ओमचे वडील म्हणाले की याठिकाणी ओमचे स्मृतिस्थळ उभारल्यास हा प्रकार पुन्हा होणार नाही. गावकऱ्यांनी लगेचच तसे केले व त्याठिकाणी स्मारक बांधून त्यावरच बाईक नेऊन ठेवली. आज त्या रस्त्याच्या जागी जोधपूर हायवे असून येणारे जाणारे लोक व ग्रामस्थ या स्मृतिस्थळावर या बाईकची पूजा करत असतात. हे एक स्मृतिस्थळ नाहीतर मंदिर बनले आहे. लोक देवी देवतांच्या जागी ओम बन्नाच्या बाईकचे पूजन करतात.

जोधपुर महामार्गावरून जाणारे प्रवासी या मंदिरात माथा टेकवत असतात. अनेक लोक ह्या मंदिरात दारूचा प्रसाद ठेवतात. प्रवासी लोकांची अशी मान्यता आहे की याठिकाणी मंदिराला दारू चढवली नाहीतर पुढे महामार्गावर अपघात होऊ शकतो, यामुळेच या मंदिरावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची गर्दी असते.

ओम बन्नाची बाईक आणि तिच्याशी निगडित रहस्य ही अंधश्रद्धा आहे की श्रद्धा याचे उत्तर अजूनही कोणाला देता आलेले नाही. पण या बाईकचे पूजन अजूनही लोक उत्साहात करतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

इंटरनॅशनल चॅम्पियन बनायला घर सोडून गेलेला विक्की गौंडर पंजाबचा मोस्ट वॉन्टेड गुंड बनला होता

Next Post

या माणसाने भारतात अर्थसंकल्प म्हणजेच बजेट मांडायची सुरुवात केली

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या माणसाने भारतात अर्थसंकल्प म्हणजेच बजेट मांडायची सुरुवात केली

एका ऑम्लेटमुळे फ्रेंच सैन्याला यु*द्धाला जायलाच उशीर झाला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.