The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा लक्षात घेऊन सरदार पटेलांनी नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना केली होती

by द पोस्टमन टीम
15 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


राष्ट्रीय सुरक्षेत भारतात सैन्यदलानंतर सर्वांत महत्त्वपूर्ण भूमिका पोलीस दल बजावत असते. जवान सीमेवर राष्ट्राच्या शत्रूंचा बिमोड करतात तर पोलीस देशांतर्गत शत्रूचा बिमोड करतात आणि सामान्य लोकांचे संरक्षण करतात. देशाला जेवढा धोका अन्य देशातील शत्रूपासून असतो तितकाच धोका हा देशांतर्गत गुन्हेगारी कृत्य तसेच राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या लोकांपासून असतो. अशाच लोकांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस दल कायम सक्रिय असते.

परंतु तुम्हाला माहिती आहे का पोलीस दलातील या जबरदस्त अधिकाऱ्यांना ट्रेनिंग कुठे देण्यात येते? जर तुम्हाला याचं उत्तर माहिती नसेल तर त्याचे उत्तर सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी आहे. चला, या नॅशनल पोलीस अकॅडमीची अधिक माहिती जाणून घेऊ …

स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू प्रगतीपथावर पुढे सरकत होता. सरकार देशांतर्गत सुरक्षाव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होते. याच काळात भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे नवीन संस्थेच्या निर्मीतीसाठी प्रयत्न करत होते.

देशात एखाद्या अखिल भारतीय स्तरावरील संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून चांगले अधिकारी घडवण्याचा सरदार पटेलांचा मानस होता. याच प्रयत्नांतून १९४८साली त्यांनी नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना केली.

राजस्थानच्या माउंट अबू शहरात नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना करण्यात आली. यानंतर हैद्राबादमध्ये या संस्थेची पुनर्स्थापना करण्यात आली. पुढे या संस्थेला सरदार पटेलांचे नाव देण्यात आले.

या संस्थेत प्रवेश मिळवणे हे इतके सोप्पे कधीच नव्हते. यासाठी भारतातील सर्वांत कठीण अशा यूपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. यानंतरच या संस्थेचे दरवाजे युवकांसाठी उघडले जातात. यूपीएससी परीक्षेत सिव्हिल रँकच्या आधारावर संस्थेत प्रवेश देण्यात येतो. जे उमेदवार आयपीएस होऊ इच्छितात त्यांच्यासाठी याठिकाणी ट्रेनिंग घेणे गरजेचे असते. इथे ट्रेनिंग घेतलेल्या अधिकाऱ्याला देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवले जाते. अर्थात, हे वाटते तितके सोपे नाही.

असे म्हणतात की, येथे दाखल होणाऱ्या उमेदवाराला बाह्य जगताशी असलेले संबंध तोडावे लागतात. एक वर्ष कठोर ट्रेनिंग घ्यावी लागते. यात उमेदवारांना प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार करण्यात येते. असे ट्रेनिंग देण्याच्या मागील एक महत्त्वपूर्ण कारण असे आहे की, आयपीएस अधिकाऱ्यांना यानंतर देशाच्या विविध भागांतील पोलीस फोर्सचे नेतृत्व करायचे असते. त्यामुळे त्यांना ट्रेनिंग पास होणे गरजेचे असते. बऱ्याचदा स्पेशल ट्रेनिंगसाठी या अधिकाऱ्यांना परदेशात देखील पाठवण्यात येते.

प्रत्येक संस्थेचे एक ब्रीदवाक्य असते. हे ब्रीदवाक्य संस्थेची सर्वात मोठी ओळख असतो. भारतीय सैन्य दलाच्या प्रत्येक रेजिमेंटचे एक वेगळे ब्रीदवाक्य आहे. भारतीय सैन्यदलातील प्रत्येक ब्रीदवाक्य सैनिकांचे मनोबल उंचावत असते.

नॅशनल पोलीस ॲकॅडमीचे देखील ‘सत्य, सेवा आणि सुरक्षा’ हे ब्रीदवाक्य आहे.

यात प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याला समाजात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सत्याच्या मार्गावर चालण्याचा, गुन्हेगारांना प्रामाणिकपणे तुरुंगात डांबून आपल्या कर्तव्याचे पालन करत समाजाची सेवा करण्याचा व नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याचा संदेश देण्यात आला आहे. ॲकॅडमीच्या ब्रीदवाक्यावरून आयपीएस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर समाजाची किती कोठी जबाबदारी असते, याची जाणीव होते.

नॅशनल पोलीस अकॅडमीचे स्वतःचे एक गीत देखील आहे. “लोहे जैसी हिम्मत है, लोहे सा जज़्बा अपना
आंखों में लिए चलते हैं हम लौहपुरूष का सपना…” असे या गीताचे बोल आहेत. पासिंग आउट परेडमध्ये उमेदवार हे गीत गातात.

देशात सदैव स्त्री-पुरुष समानतेवर चर्चा सुरू असतात, पण प्रत्यक्ष मात्र वेगळीच परिस्थिती असते. काही वर्षांपूर्वी मानले जात होते की, महिलांसाठी पोलीस दलातील नोकरी योग्य नसते, हे काम फक्त पुरुषांनी करावे. परंतु नॅशनल पोलीस अकॅडमीने हे समीकरण देखील मोडले आहे.

आज नॅशनल पोलीस अकॅडमीत अनेक महिला अधिकारी ट्रेनिंग घेतात. यापैकी अनेक महिला आज उच्चपदावर कार्यरत आहेत. सरदार वल्लभभाई पटेलांनी या संस्थेचा मजबूत पाया रचल्यामुळे अनेक महिलांना या संस्थेत काम करण्याची योग्य संधी मिळाली. १९७९ सालच्या आयपीएस बॅचच्या अधिकारी अरुणा बहुगुणा या संस्थेच्या पहिल्या महिला डायरेक्टर बनल्या होत्या.

सध्या १९९३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमित गर्ग या संस्थेचे डायरेक्टर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. देशभरातून अनेक मुलींची निवड आयपीएस अधिकारी म्हणून करण्यात येत आहे, ही देशासाठी फार गौरवास्पद गोष्ट असून नॅशनल पोलीस अकॅडमीतून दरवर्षी अनेक धुरंधर पोलीस अधिकारी तयार होतात, जे देशाच्या कानाकोपऱ्यात देशांतर्गत सुरक्षेत आपले अमूल्य योगदान देतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 


ShareTweet
Previous Post

टोमॅटो हे फळ आहे की भाजी हा वाद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालायात गेला होता

Next Post

एका रात्रीत आयुष्य पालटले आणि अट्टल गुन्हेगार बनला वर्ल्ड फेमस मॉडेल !

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

एका रात्रीत आयुष्य पालटले आणि अट्टल गुन्हेगार बनला वर्ल्ड फेमस मॉडेल !

थोर शास्त्रज्ञ एडिसनला बालपणी लोक मंदबुद्धी म्हणून हाक मारायचे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.