The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजाला टक्कल पडलं आणि इंग्लंडमधे विगची फॅशनच आली!

by द पोस्टमन टीम
30 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात त्याच्या केसामुळे अधिकच भर पडते. कितीही वय झाले तरी काळ्याभोर दाट केसांचा मोह कुणालाच सुटत नाही. ‘बाला’ चित्रपटामधील आयुष्मान खुराना तुम्हाला आठवत असेल. केसांसाठी किती कायकाय करतो. शेवटी त्याला या सगळ्यांपेक्षाही आपली खरी ओळखच कायम टिकते हे कळते आणि मग तो स्वतःला आहे त्या परिस्थितीत स्वीकारतो.

पण, केसांचे आकर्षण ही काही आजकालची गोष्ट नाही. केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी कितीतरी पद्धती अगदी पूर्वापार चालत आल्या आहेत. अगदीच केस नसतीलच तर मग आहेच केसांच्या टोपचा आधार. विशेषत: १७ व्या शतकात युरोपमधे तर केसांचा टोप वापरण्याची ही फॅशन इतकी रूढ झाली होती की, राजे महाराजे देखील हा टोप वापरत आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे, स्टाईलचे वेगवगळे टोप असत. हे टोपसुद्धा एक स्टाईल आयकॉन होता. कारण, हे टोप वापरणे सर्वांनाच परवडणारे नव्हते. फक्त उच्चभ्रू वर्तुळातच याचा वापर केला जात असे.

पण, या केसांच्या टोपाचा म्हणजेच विगचा शोध कसा लागला तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेण्यासाठी हा लेख आवर्जून वाचा.

सतराव्या शतकात युरोपमध्ये लांब केस ठेवण्याची फॅशन रूढ झाली होती. पण, जर लवकरच केस गळू लागले किंवा टक्कल पडू लागले तर काय करणार?



फ्रांसचा राजा चौदावा लुई याला स्वतःची वाहवा करून घेण्याची खूप हौस होती. आपल्या संपूर्ण राज्यात आपले स्मारके उभारली जावीत अशी त्याची इच्छा होती.

त्यासाठी त्याने वेगवेगळ्या चित्रकारांकडून स्वतःची भरपूर चित्र काढून घेतली होती. पण त्याला यापैकी कुठलेच चित्र त्याच्या मनाप्रमाणे झाल्यासारखे वाटत नव्हते. आपल्या चित्रातून आपण एक शूर आणि बलशाली राजे आहोत असे वाटले पाहिजे, अशी त्याची इच्छा होती.

सतराव्या वर्षापासूनच त्याचे केस गळायला सुरुवात झाली होती. राजाला टक्कल पडलेली असणे बरे दिसत नाही, म्हणून त्याने केसापासून टोप बनवणाऱ्या कामगारांना भरती करून घेतले. असे तब्बल ४८ कारागीर त्याने आपल्या पदरी ठेवले होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्याच्यासाठी उत्तमोत्तम टोप त्यांनी तयार करायचे एवढेच त्यांचे काम. यातील प्रत्येक विग अगदी पाठीवर रुळणारे आणि प्रत्येकालाच लाटांप्रमाणे डिझाईन होती. असे कितीतरी टोप त्याने स्वतःसाठी बनवले. या खोट्या केसांमुळे आपल्या सौदर्यात आणि व्यक्तिमत्त्वात आकर्षक भर पडते अशी त्याची समजूत होती. राजाच केसांचा टोप वापरतो हे पाहून इतर लोकांनीही त्याचे अनुकरण करायला सुरुवात केली आणि हळूहळू फ्रांसच्या उच्चभ्रू वर्तुळात ही टोप वापरण्याची फॅशनच रूढ झाली.

इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स हा देखील त्यावेळी फ्रांसमध्येच होता. इंग्लडच्या गादीवर ऑलिव्हर क्रॉमवेल याने कब्जा मिळवला होता आणि चार्ल्सला राज्याबाहेर काढले होते. राजा चार्ल्स आश्रयासाठी फ्रांसमधे आला होता. त्याला फ्रांसमधील हे फॅशनेबल टोप खूपच आवडले. त्याचे केस अकालीक पांढरे व्हायला सुरुवात झाली होती. म्हणून त्यानेही असेच टोप वापरायला सुरुवात केली.

तो इंग्लंडला परतला तेंव्हा त्याच्यासोबतच केसांची ही स्टाईलही इंग्लंडला आली.

राजघराण्यात तर ही फॅशन रूढच झाली. पण त्यांच्यानंतर इतर दरबारी मंत्री आणि सरदारांनी देखील ही फॅशन उचलली. हळूहळू ही फॅशन खालच्या वर्गाकडेही झिरपू लागली. अनेक व्यापारी देखील अशा प्रकारचे टोप वापरू लागले.

तसे तर या कृत्रिम केसांच्या टोपांची किंमत अव्वाच्या सव्वा होती. एका सामान्य नागरिकाचा आठवड्याभराचा पगार एका टोपावर खर्च होईल, इतक्या त्याच्या किंमती होत्या. म्हणूनच ही फॅशन फक्त श्रीमंत वर्गापुर्तीच मर्यादित राहिली. तिथेही टोपांचा आकार, त्यांची लांबी त्यासाठी वापरण्यात आलेले केस, त्यांचा रंग यावरून स्पर्धा सुरु होती. कारण, यावरून एखाद्याचे स्टेटस दिसत असे.

याच काळात बिग-विग ही कल्पना अस्तित्वात आली. ब्रिटीश सरदार एकावेळी एका विगसाठी ८०० शिलिंग एवढी रक्कम मोजायला तयार असत. हे विग फारच मोठे असत. अगदी फारच श्रीमंत असणाऱ्या लोकांनाच हे बिग-विग वापरणे परवडत असे. त्यांच्या विगवरून त्यांच्या श्रीमंतीचे दर्शन होते असे त्यांना वाटत होते.

त्याकाळी हे टोप बनवण्यासाठी घोडे, शेळी किंवा माणसाच्या केसांचा वापर केला जाई. केस कमी असतील, पांढरे झाले असतील, विरळ झाले असतील किंवा टक्कल पडले असेल तर अशा केसांच्या समस्या लपवण्यासाठी हे लोक टोपचा वापर करत असत. टोपांच्या केसांची लांबी जितकी जास्त त्यावरून त्या केसांची किंमत ठरत असे.

त्याचवेळी युरोपमधे सिफिलिस या त्वचारोगाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. या रोगावर अजूनही औषध निघाले नव्हते. त्वचेवर लालसर चट्टा उठणे, पुरळ उठणे आणि केस गळणे ही याची काही प्रमुख लक्षणे होती.

कुणालाही नैसर्गिकपणे जरी टक्कल पडले तरी ते सिफिलीससारख्या रोगाशी जोडले जात असल्या कारणाने खूपच लज्जास्पद वाटत असे. त्यामुळे तर हे केसांचे टोप वापरण्याची फॅशन जोरातच फोफावली.

केसांचा हा टोप महाग तर होताच पण त्याची देखभाल करण्यासाठीही अधिकचे पैसे खर्च करावे लागत. हे केस खोटे असल्याने यात उवा वगैरेचा प्रादुर्भाव लवकर आणि मोठ्या प्रमाणावर होत असे. शिवाय, दिवसभर हा टोप वापरल्याने डोक्याला भरपूर घाम येत असे. या खोट्या केसात उवा होऊ नये म्हणून त्यावर एक विशिष्ट प्रकारची पावडर टाकली जात असे. आठवड्यातून एकदा तरी या केसांवर पावडर टाकावी लागत.

केसांचा वास येऊ नये म्हणूनही काळजी घेतली जाऊ लागली. वास कमी करण्यासाठीही त्याला सुगंधी पावडरी वापरल्या जात. घरच्या घरी यांची काळजी घेणे शक्यच नव्हते. त्यामुळे नियमित दिवसांच्या अंतराने ते विग-मेकरकडे पाठवावेच लागत.

पुढेपुढे याची ही काळजी घेण्याच्या कटकटीमुळे ही फॅशन मागे पडली. शिवाय, टोप हे ब्रिटीश राजेशाही आणि घराणेशाहीचे प्रतिक होते. ज्यांना ज्यांना स्वतःला यापासून दूर ठेवायचे होते त्यांनी पुन्हा आपले नैसर्गिक छोटे केस ठेवण्यास सुरुवात केली.

फ्रांसमधे १७८९ साली झालेल्या क्रांतीनंतर राजेशाही आणि घराणेशाहीशी निगडीत सर्वच गोष्टी इतिहास जमा झाल्या. ब्रिटनमध्ये तर तत्कालीन पंतप्रधान विल्यम पिट यांनी टोपांची देखभाल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विग पावडरीवरच कर लादला, त्यामुळे आधीच महाग असलेला हा विग आणखी महाग झाला.

आणि हळूहळू ही विगची फॅशन कायमची मोडीत निघाली!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या माणसाने बॅटिंग केली म्हणून आज महिला क्रिकेट खेळतायत..!

Next Post

कोर्ट – न्याय मिळण्यासाठी सामान्यांना करावी लागणारी कसरत दाखवणारा चित्रपट

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

कोर्ट - न्याय मिळण्यासाठी सामान्यांना करावी लागणारी कसरत दाखवणारा चित्रपट

कलारीपायत्तू - भारताने जगाला दिलेली सगळ्यात जुनी मार्शल आर्ट

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.