The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोज एका पेगच्या बदल्यात हे वानर तब्बल ९ वर्षे रेल्वेगाड्यांना सिग्नल देत होतं !

by द पोस्टमन टीम
14 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एकोणिसाव्या शतकात सुमारे १८७७ च्या आसपास दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन येथील एका रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा रक्षकाचा अपघात झाला. पण, त्याला नोकरी टिकवायची असल्याने त्याने आपली इतर बारीक सारीक कामे करण्यासाठी एका बबून वानराची मदत घेतली. याच बबून वानराने पुढील नऊ वर्षे त्याच रेल्वे स्टेशनवर सुरक्षा रक्षक म्हणून काम केले.

पण, त्याला हे सगळे कसे जमले, त्याला काही अडचणी आल्या का? रेल्वेने एका वानरावर इतका विश्वास का ठेवला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचावाच लागेल.

दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन या शहरातील रेल्वे स्टेशनवर जेम्स विड नावाचा एक सुरक्षा रक्षक होता. हा सुरक्षा रक्षक चालू ट्रेन समोरूनही उड्या मारत असे. या कामात तो इतका तरबेज होता की, त्याला ‘द जंपर’ ही बिरुदावलीच मिळाली होती. सुमारे दहावर्षे तरी तो हे काम करत होता.

पण एक दिवस विडच्या हातून काही तरी चूक झाली. असाच रेल्वे वरून तो उडी मारून जात असताना त्याचा अंदाज चुकला आणि तो खाली पडला. त्याचे दोन्ही पाय रेल्वे रुळावर होते. त्याच वेळी एक ट्रेन त्या रुळावरून जात होती.



एवढी मोठी ट्रेन पायावरून गेल्यावर त्याच्या पायाचे काय झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. विडच्या पायाचे ऑपरेशन करावे लागले. त्याचे दोन्ही पाय पूर्णतः निकामी झाल्याने ते काढून टाकण्यात आले.

पण पायाशिवाय तो काम तरी कसा करणार म्हणून त्याने लाकडाचे खोटे पाय बसवून घेतले. त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर घेण्याची विनवणी केली. जेम्सची कष्ट करण्याची तयारी, त्याचे पूर्वीचे काम आणि त्याची एकंदर परिस्थिती पाहून त्याच्या वरिष्ठांना त्याची दया आली आणि त्याला पुन्हा एकदा कामावर रुजू करून घेण्यात आले. त्याला सिग्नलरची नोकरी देण्यात आली. रेल्वेच्या कंडक्टरला रूळावरील वेगवेगळ्या सिग्नलची माहिती देण्याचे हे काम होते.

हे काम तो एका ठिकाणी बसूनही करू शकत होता. या कामासाठी जास्त शारीरिक मेहनत घ्यावी लागत नसे. परंतु तरीही जेम्सला वाटले की आपल्या हाताखाली छोटीछोटी कामे करण्यासाठी कोणी तरी मदतनीस हवे आहे. शिवाय, त्याला घरातून कामावर आणि कामावरून घरी ये-जा करण्यासाठीही कोणाच्या तरी मदतीची गरज होतीच.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पायांशिवाय, तो घर ते स्टेशन हे अंतर कसे पार करणार होता? हा त्याच्या समोरचा मोठा प्रश्न होता. यासाठी त्याने एक ट्रॉली बनवून घेतली. या ट्रॉलीला ढकलत ढकलत तो स्वतः स्टेशनपर्यंत येई. पण, यात त्याची खूपच दमछाक होत असे. कामाच्या ठिकाणीही एका जाग्यावरून दुसऱ्या जागी जाणे त्याला खूपच त्रासाचे होई. जेम्स या समस्येवर आणखी काही मार्ग सापडतो का या विचारात होता.

जेम्स एक दिवस इनहेगच्या बाजारात गेला. तिथे त्याला एक भेट मिळाली ज्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. त्याच्या समस्येवर त्याला एक खूप चांगला उपाय सापडला होता. त्या बाजारात त्याने एक बबून वानर पहिला. या वानर एक वॅगन म्हणजेच चार चाकी मालगाडी चालवत होता. जेम्सने या वानराच्या मालकाची भेट घेतली.

त्याने त्या मालकाची आपली परिस्थिती सांगितली आणि हा वानर त्याच्यासाठी उपयोगी ठरेल का विचारले. वानराच्या मालकाने सांगितले,

“याला जर योग्य सूचना दिल्या, त्याच्याकडून थोडासा सराव करवून घेतला तर तो सर्व प्रकारची कामे करू शकतो.” 

जेम्सने त्या मालाकाकडून तो वानर घेतला. कदाचित त्या वानराच्या मालकालाही जेम्सची स्थिती पाहून दया आली असावी म्हणून किमतीत थोडीफार सवलत देऊन त्याने तो वानर जेम्सला दिला असावा. ते काही असेल पण, आता जेम्सला आपल्या सर्व समस्यांवर उपाय सापडला होता, अगदी जालीम उपाय. पण, त्या मालकाने एक सूचनाही दिली होती.

या वानराला दररोज संध्याकाळी एक ग्लास केप ब्रँडी पाजावी लागते. नाहीतर दुसऱ्या दिवशी तो कुठलेच काम ऐकणार नाही. जेम्सने अत्यंत आनंदाने त्या वानराला घरी आणले.

त्याने वानराला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा वानर फक्त जेम्सला घरापासून स्टेशनपर्यंत सोडी आणि पुन्हा स्टेशनपासून घरापर्यंत परत नेत असे. काही दिवसांनी जेम्सला असे वाटले की, हा वानर यापेक्षाही खूप काम करू शकतो. त्याच्यातील संपूर्ण शारीरिक क्षमतेचा वापर करवून घेतला तर हा वानर कितीतरी मोठमोठी कामे करू शकतो. शिवाय, तो बुद्धिमान आहे. अवघडातील अवघड सूचनाही तो सहज समजून घेऊ शकतो. जेम्सने या वानराचे नाव ठेवले होते जॅक.

ट्रेनच्या ड्रायव्हरने चारवेळा शिट्टी वाजवली की एका बंद लॉकरमधील किल्ल्या त्याच्याकडे नेऊन द्यायच्या हे जेम्सच्या अनेक कामांपैकी एक काम होते. पुढे पुढे जॅकही स्वतःहून हे काम करू लागला. कारण त्याने जेम्सला नेहमी हे काम करताना पहिले होते. त्याच्यासाठी हे काम शिकणे खूप मोठी गोष्ट नव्हती.

पुढे ट्रॅकला नियंत्रणात ठेवणारी सिग्नल बॉक्समधील लीव्हर कसे चालवायचे हेही जॅकने शिकून घेतले. आवाजाद्वारे दिल्या जाणाऱ्या सिग्नलवर ही सगळी यंत्रणा काम करते हेही पुढे जॅकच्या लक्षात आले. तो आता बारकाईने सर्व कामे करत होता.

ड्रायव्हरने किती शिट्ट्या वाजवल्यावर कोणता बॉक्स हलवायचा आहे, त्याची रचना कशी असली पाहिजे जेणेकरून पुढच्या ट्रकवरील सिग्नल अचूकरीत्या मिळतील हेही जॅकला कळू लागले. तो अगदी अचूकपणे ही कामे करू लागला. जॅक एक प्राणी असूनही इतकी अवघड कामे करू शकत होता.

केप टाऊनच्या स्टेशनवर जेंव्हा प्रवासी एका वानराला काम करताना पाहत तेंव्हा त्यांना आश्चर्यही वाटे आणि भीतीही. आश्चर्यापेक्षा त्यांना भीतीच जास्त वाटे. कारण, शेवटी त्यांच्या जीवाचा प्रश्न होता. या वानराकडून जर एखादीही छोटी चूक झाली तर शेवटी त्यांना आपले प्राण गमवावे लागले असते. रेल्वेला सिग्नल देणे हे काही खायचे काम नाही. कित्येकांचा जीव जाऊ शकला असता.

एका प्रवाशाने शेवटी, इतक्या जोखमीच्या कामासाठी अशा प्रकारे तुम्ही एखादा वानर कसा काय नेमू शकता अशी तक्रार रेल्वे अधिकाऱ्यांकडे केलीच. या इसमाने जॅकवर गुन्हाच नोंदवला. त्यामुळे जॅक आणि जेम्स दोघांनाही कामावरून काढून टाकण्यात आले.

जेम्सने आपल्या वरिष्ठांना पुन्हा एकदा विनवणी केली. त्याच्या इतर सहकाऱ्यांनीही त्याच्या या विनंतीला पाठींबा दर्शवला. जॅकने अनेकदा एकही चूक न करता केलेल्या कामांची यादीच त्यांनी अधिकाऱ्यांसमोर ठेवली. ते पाहून अधिकाऱ्यांनी जॅकची परीक्षा घेण्याचे ठरवले. या परीक्षेत जर तो पास झाला तर त्याला कामावर कायम ठेऊन घेणार असे ठरले.

या परीक्षेसाठी जॅकसमोर कठीणातील कठीण परिस्थिती निर्माण करायची आणि तो हे सगळे कसे हाताळतो ते पहायचे असे ठरले.

सिग्नल बूथवर असतात त्याचप्रमाणे त्याच्यासमोर वेगवेगळे लीव्हर्स ठेवण्यात आले. एकाचवेळी सलग वेगवेगळ्या ड्रायव्हरनी वेगवेगळ्या शिट्ट्या वाजवल्या. पण, जॅक या परीक्षेत अगदी सहजपणे उत्तीर्ण झाला.

केप टाऊनच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याला कामावर तर घेतलाच शिवाय त्याला दरदिवशी २० सेंट इतका पगारही निश्चित करण्यात आला आणि वर बक्षीस म्हणून दर शनिवारी कप ब्रँडी आणि त्यासोबत खाऊही दिला जाईल असे ठरले.

जॅकला कामावर घेतल्याने रेल्वेच्या महसुलातही फरक पडला. कारण, लवकरच हे स्टेशन एक पर्यटन स्थळ झाले. फक्त जॅकला पाहण्यासाठी लोक दुरुदुरून या स्टेशनला भेट देत. पुढे नऊ वर्षे जॅकने इथेच स्टेशनगार्ड म्हणून काम केले. त्याच्यामुळे दरोडेखोर आणि इतर लुटारू लोकांचा त्रासही कमी झाला.

१८९० मध्ये जॅकला टीबीचा संसर्ग झाला आणि यातच तो गेला. विशेष म्हणजे नऊ वर्षात त्याच्याहातून एकही चूक झाली नाही.

सर्कशीतील प्राणी दिलेल्या सूचना किती तंतोतंत पाळतात, म्हणून आपल्याला आश्चर्य वाटते. पण, प्राण्यांना जर योग्य सूचना आणि सराव दिला तर तेही माणसाप्रमाणेच किंबहुना माणसापेक्षा जास्त प्रभावीपणे आणि परीणामकतेने काम करू शकतात हेच जॅकच्या गोष्टीवरून लक्षात येते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेचा हरवलेला अ*णुबॉ*म्ब अजूनही सापडलेला नाही !

Next Post

बेंजामिन फ्रँकलिनने एवढे शोध लावले पण कधी स्वतःच्या नावावर पेटंट नाही केलं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

बेंजामिन फ्रँकलिनने एवढे शोध लावले पण कधी स्वतःच्या नावावर पेटंट नाही केलं

बेस्ट बॅट्समन, बॉलर सगळ्यांना माहित आहेत, ही आहे बेस्ट कमेंटेटर्सची यादी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.