The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मध्ययुगात तब्बल १० वर्षे आकाशात चंद्रच दृष्टीस पडला नव्हता !

by द पोस्टमन टीम
7 April 2025
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अमावस्येच्या रात्री चंद्र दिसत नाही हे जोपर्यंत माहिती नसतं तेव्हा अचानक चंद्र आकाशातून गायब झाल्याबद्दल लहान मुलांना किती आश्चर्य वाटतं नाही? पण, जर चंद्र दहा वर्षे उगवलाच नाही तर? कल्पना करू शकता का अशा दिवसांची एक नव्हे दोन नव्हे तब्बल दहा वर्षे. नाही ना करू शकत? पण, इतिहासात अशाही काही अत्यंत विचित्र गोष्टी घडून गेल्या आहेत. ज्या खरच घडल्या असतील यावर आपल्याला विश्वास बसणार नाही.

इतिहासात १११० साली चंद्र आकाशातून गायब झाला होता. एक दिवस किंवा दोन दिवस नव्हे तर तब्बल दहा वर्षे पृथ्वीवरून चंद्र दिसलाच नव्हता.

याच्या अनेक ऐतिहासिक नोंदी सापडतात. अनेक इतिहासतज्ञ आणि अवकाश अभ्यासकांनी पृथ्वीच्या कोणत्या तरी भागातून चंद्र दिसतो का हे पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण, कुठूनच चंद्र दिसत नव्हता.

मध्ययुगीन काळाच्या मध्यात घडलेली ही घटना आज फारशी कुणाला माहिती नाही. शिवाय, त्याकाळी विज्ञानाचा इतका प्रसार झाला नव्हता, त्यामुळे या घटनेमागची वैज्ञानिक करणे शोधण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्याकाळात यामागे कोणत्यातरी दुष्ट शक्तींचा हात असावा असे उत्तर दिले जात होते. एखाद्या घटनेचे तार्किक उत्तर मिळत नसले की, त्यावर अशी उत्तरे देणे सोपे असते. त्याकाळी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पूर्णतः अभाव असल्याने आजपर्यंत या घटनेमागे नेमके वैज्ञानिक कारण काय असेल याचा उलगडा आजतागायत झालेला नाही.



पण ज्यांचा दुष्ट शक्ती किंवा वाईट शक्ती अशा गोष्टीवर विश्वास नव्हता त्यांच्या मते, त्यावेळी हेकला ज्वालामुखीचा स्फो*ट झाला होता आणि त्या ज्वालामुखीतून उत्सर्जित झालेल्या धुलीकणांनी अवकाशात दाट थर निर्माण केल्याने चंद्र पृथ्वीवरून दिसत नव्हता. 

या ज्वालामुखीचा स्फो*ट खूपच शक्तिशाली होता. ज्वालामुखीच्या स्फो*टातून राख, धूळ बाहेर उडत असली तरी संपूर्ण चंद्रच झाकळून जाईल इतकी शक्ती त्यामध्ये असण्याची शक्यता फार कमी आहे. शिवाय, इथे एक दोन दिवस नव्हे तर तब्बल दहा वर्षे चंद्र गायब झाला होता. ज्वालामुखीतून निघालेले धुलीकण किंवा राखेचे प्रमाण खरेच इतके असेल का की आकाशातील खगोलीय वस्तू पूर्णतः झाकोळून जातील?

हेकला ज्वालामुखीचा उद्रेक ११०४ मध्ये झाला होता. आणि १११० मध्ये चंद्र गायब झाला होता. जर चंद्र हेकला ज्वालामुखीच्या उद्रेकानेच चंद्र झाकोळून गेला असता तर तो ११०४ मध्येच गायब झाला असता, त्यासाठी आणखी सहा वर्षांचा कालवधी का जावा लागला? असे अनेक प्रश्न निर्माण होतात, पण याचे काहीच उत्तर देता येत नाही.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

प्रसिद्ध संशोधक सेबस्टीन गुलेट यांनी दाखवून दिले की, हेकला ज्वालामुखीतून बाहेर पडलेले धुलीकण आणि राख यांचे प्रमाण इतके जास्त नव्हते सोळा की, ज्यामुळे दहा वर्षे चंद्र झाकोळून जाईल. तसेही १११० पासून ११२० पर्यंत चंद्र दिसलाच नव्हता. १११० मध्ये गायब झालेला चंद्र ११२० मध्ये पुन्हा उगवला होता.

परंतु प्राध्यापक सेबास्टीन यांनी एक दुसरी थिअरी मांडली आहे. त्यामध्ये त्यांनी माउंट आसमा ज्वालामुखीचा संदर्भ दिला आहे. या ज्वालामुखीचा स्फो*ट ११०८ मध्ये झाला. आणि हा ज्वालामुखी प्रचंड शक्तिशाली होता. यात चंद्र झाकोळून टाकण्याची क्षमता निश्चितच होती. या ज्वालामुखीतून उडणारे धुलीकण आणि राख यांचे प्रमाण खरेच इतके मोठे होते की दहा वर्षे चंद्र आणि अवकाश व्यापून राहील.

परंतु सेबास्टीन यांच्या मते याकाळात जगभरात अशा प्रचंड ताकदीचे अनेक ज्वालामुखीचे उद्रेक होत होते. अशा अनेक ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे कदाचित चंद्र गायब झाला असण्याची शक्यता आहे. त्यांची ही थेअरी मध्ययुगीन हवामानाच्या अभ्यासावर अवलंबून आहे. या कळात एका मागून एक मोठ मोठ्या ज्वालामुखींचा स्फोट झाल्याने त्याकाळी जागतिक तापमानातही वाढ झाली होती.

११०८ मध्ये झालेल्या आसमा ज्वालामुखी विषयी माहिती देणारीही फरसे दस्तावेज नाहीत. त्यामुळे या ज्वालामुखीतून नेमकी किती धूळ, धूर आणि राख उत्सर्जित झाली आणि ती किती वेगाने बाहेर पडत होती याचा अंदाज सांगणारे कुठलीच आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. तरीही फक्त ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अशा प्रकारे दहा वर्षे चंद्र गयाब झाला असेल हा तर्क किंवा युक्तिवादही पटत नाही.

आसमा ज्वालामुखी हा त्याकाळातील सर्वांत मोठा ज्वालामुखी होता असे म्हटले जाते. पुढे आसमा डोंगरावर १७८३ मध्येच ज्वालामुखीचा स्फो*ट घडला होता. जवळपास ७०० वर्षानंतर. पहिला ज्वालामुखी या ज्वालामुखीच्या तुलनेत तीनपट अधिक शक्तिशाली होता असे म्हटले जाते. तेव्हापासून इथे वारंवार उद्रेक होत असतो पण दरवेळी त्याची तीव्रता मात्र कमी कमी होत चालली आहे. त्यानंतर असे कितीतरी उद्रेक झाले असतील पण पहिल्या उद्रेकामध्ये जी ताकद होती, ती ताकद त्यानंतरच्या कुठल्याच ज्वालामुखीच्या उद्रेकात पाहायला मिळाली नाही.

गेल्या १००० वर्षांच्या काळात माउंट आसमावर जवळपास ८० वेळा उद्रेक झाला आहे. तरीही इथे ११०८ च्या आधी जे उद्रेक झाले असतील त्यांची कुठलीच नोंद सापडत नाही. येथे झालेला शेवटचा उद्रेक २०१९ साली झाला होता आणि याची व्याप्ती चार किमीच्या परिसरापुरती मर्यादित होती. याच्याशी तुलना केल्यास ११०८ मधील उद्रेक हा फारफार तर १४५ किमी परिसरात परिणाम घडवून आणणारा ठरला असता.

११२० मध्ये आकाशात दाटलेले काळे धग हळूहळू मागे होऊ लागले आणि मग चंद्र दिसू लागला. खरे तर यामागे अजूनही काही वेगळी करणे असू शकतात, इथे फक्त ही घटना घडण्यामागे कोणकोणते घटक कारणीभूत ठरले असतील त्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जसजसे संशोधन होत जाईल तसतसे याबाबतची खरी माहिती पुढे येईलच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सुलतान तुघलकच्या एक से एक आयडियापुढे एलोन मस्क पण फेल झाला असता

Next Post

प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्याबद्दल या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्याबद्दल या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.

ही आहे मानवी इतिहासातील सर्वात जुन्या खेळांची यादी..! यातला तुम्हाला आवडलेला खेळ कुठला..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.