The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डेथ व्हिसल म्हणून फेमस झालेली ॲझटेक व्हिसल काय आहे हे संशोधकांना अजून कोडंच आहे

by द पोस्टमन टीम
5 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पुरातन काळातील कित्येक गोष्टी आजही आपल्यासाठी एक गुढच आहेत. त्या काळातील प्रगत तंत्रज्ञान आजही आपल्याला मंत्रमुग्ध करुन सोडण्यास पुरेसं आहे. अर्थात सगळ्याच गोष्टी मंत्रमुग्ध करतात असे नाही. काही गोष्टी गुढ आणि भितीदायक अशाही आहेत. यातलीच एक आहे मेक्सिकोच्या ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासातील एक शिट्टी. मंत्रमुग्ध तर नाहीच पण कान दाबण्यास परावृत्त करणारी ही शिट्टी अतिशय कर्कश आवाज निर्माण करते. आज आपण याच अनोख्या शिट्टीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१९९० च्या दशकात मेक्सिको शहरातील उत्खननात एक पुरातन मानवी हाडांचा सापळा सापडला. हा सापळा ॲझटेक या ५०० वर्षांपूर्वी मेक्सिकोत राज्य करणाऱ्या प्रजातीतील एका व्यक्तीचा होता. पुरातन ॲझटेक मंदीर असलेल्या ठिकाणी सापडलेला हा सापळा एका कारणामुळे वेगळा होता. ते कारण होते त्याच्या दोन्ही हातात असलेल्या दोन शिट्ट्या. यातील एकीचा आकार तर मानवी मेंदूच्या कवटीचा होता.

हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी एका संशोधकाने ती शिट्टी वाजवली आणि एक भयानक आवाज त्या शिट्टीतून बाहेर पडला. हा बाहेर पडलेला आवाज आजही जगातील सगळ्यात जास्त भितीदायक आवाज म्हणून ओळखला जातो.

म्हणूनच या आवाजाला “मृत्यूची शिट्टी” असे म्हटले जाते.

हा आवाज माणसाच्या ओरडण्याचाच आवाज आहे, परंतु त्याची तीव्रता अतिशय जास्त आहे. या वाद्यात वेगवेगळे हवेचे प्रवाह एकमेकांबरोबर आदळून असा भेदरून सोडणारा कर्णभेदी आवाज निर्माण करतात.



पण ही शिट्टी वापरण्यामागचे मुख्य कारण काय होते..?

शिट्टीचा वापर नेमका कशासाठी केला जात होता यामागचे नेमके उत्तर अजूनही स्पष्टपणे कोणाला सापडलेले नाही. काहींच्या मते हे वाद्य यु*द्धाच्या वेळी शत्रूंना घाबरवण्यासाठी वापरले जात असावे. एकाच वेळी २००, ३०० किंवा ५००० सैनिक जर ही शिट्टी वाजवत असतील तर त्या आवाजाने शत्रुची तारांबळ उडत असेल एवढं नक्की!

आणखी एक सिद्धांत असे सांगतो की या शिट्टीचा वापर त्रासदायक नाही तर लाभदायक म्हणून केला जात असावा. शिट्टीच्या आवाजातून निर्माण होणारे काही आवाज मानवी कानांपर्यंत पोहचत नाहीत, परंतु या आवाजाने हृदयाचे काम अधिक सुरळीत चालवण्यास मदत होते असे संशोधक सांगतात.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सर्वांत जास्त योग्य वाटणारा एखादा सिद्धांत असेल तर तो आहे मानवी बळींच्या प्रथेबद्दलचा. बळी दिल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी दिशा दाखवण्याचे काम या शिट्ट्या करत असाव्यात असा हा सिध्दांत आहे.

या शिट्टीवर भरपूर अभ्यास आतापर्यंत करण्यात आला आहे. २ शिट्ट्या एकाच वेळेस वाजवल्या तरी भितीचे वादळ उठेल एवढा मोठा आवाज निर्माण होतो. आवाजाची रेंज आणि तीव्रता दोन्ही वाढते असे निदर्शनास आले.

आता ही शिट्टी अगदी जगभर प्रसिद्ध झाली आहे. अनेक जण या शिट्टीच्या हुबेहुब प्रती बनवत आहेत. रॉबर्टो वेलाज्कूज या मेक्सिकन मेकॅनिकने वर्षानुवर्ष प्रयत्न करुन हे वाद्य जाणून घेतले आहे. त्याने या वाद्याच्या बऱ्याचशा प्रती तयार केल्या आहेत. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने यात आता ही शिट्टी मोठ्या प्रमाणात सापडते.

ही शिट्टी आता जगाच्या कुतुहलाचा विषय बनली आहे. तिची अंतर्गत रचना जगभर पसरली असल्याने ती आता सहज उपलब्ध होते. परंतु तिचा वापर नेमका कशासाठी केला जात होता यामागचे गुढ आजही अज्ञातच आहे. या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असले तरीही ॲझटेक जमात ध्वनी तंत्रज्ञानात भरपुर प्रगत होती हे या छोट्याशा वाद्यावरुन लक्षात येते एवढं नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नादिया मुराद : ही महिला आयसिस विरोधात खंबीरपणे उभी राहिलीये

Next Post

ही महिला जगातली पहिली साहित्यिक मानली जाते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

ही महिला जगातली पहिली साहित्यिक मानली जाते

या खानसाम्याने चंपारणमधे गांधीजींचा जीव वाचवला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.