The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका रात्रीत आयुष्य पालटले आणि अट्टल गुन्हेगार बनला वर्ल्ड फेमस मॉडेल !

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जर नशिब चांगलं असेल तर रंकाचा राजा होण्यास वेळ लगत नाही. पण प्रत्येकाचंच नशिब हे इतकं चांगलं असेलच असं नसतं. असंच काहीसं घडलं एका अमेरिकन युवकाच्या आयुष्यात, एका रात्रीत त्याच आयुष्य बदललं आणि आज तो एक यशस्वी मॉडेल म्हणून अमेरिकेत ओळखला जातो. त्या युवकाचे नाव जेरेमी मिक्स असून हा एकेकाळी एका गुन्ह्यासाठी तरुंगात शिक्षा भोगत होता. त्याच्या आयुष्यात एकाएकी घडत गेलेल्या बदलांमुळे तो स्वतःदेखील हैराण आहे.

जेरेमी मिक्सचा जन्म ७ फेब्रुवारी १९८४ ला झाला. एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या जेरेमी यांचे आयुष्य २००२ साली संपूर्णपणे पालटले. त्याला पोलिसांनी अवैध पद्धतीने ह*त्यार बाळगल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली. इतर कैद्यांप्रमाणे त्याच देखील मगशॉट फोटो काढण्यात आले. पण इतर कायद्यांप्रमाणे त्याच्या ह्या फोटोंमधून क्रौर्याच्या जागी त्याचे सौंदर्यच दिसत होते.

कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी २०१४ साली जेव्हा जेरेमीचा मगशॉट फोटो फेसबुकवर टाकला, त्यावेळी तो वेगाने व्हायरल झाला होता. त्या फोटोला ७५ हजार लोकांनी लाईक केले होते. २० हजार लोकांनी या फोटोवर कमेंट केली होती. तब्बल १० हजार लोकांनी हा फोटो शेयर केला होता.

एकीकडे लोक त्याचे फोटो शेयर करत होते तर जेरेमीला कोर्टाकडून २ वर्षांची कोठडी सुनावण्यात आली होती. कोर्टाने शिक्षा सुनावल्यामुळे जेरेमी तुरुंगात आपले जीवन कंठत होता. त्याला या गोष्टीचा थांगपत्ता देखील नव्हता की तो त्याच्या व्हायरल फोटोमुळे इंटरनेटवर सेलिब्रिटी झाला आहे.

जेरेमीची आई कॅथरीन एनगियरने आपल्या मुलाला मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा घेतला आणि सोशल मीडियावर कमावलेल्या पैशातूनच त्याचा जामीन केला. जामिनावर बाहेर आल्यानंतर जेरेमीला समजले की त्याच्या आयुष्याने एक वेगळाच टर्न घेतला आहे. जेलमधून बाहेर आल्यावर त्याने आणि त्याच्या आईने नव्याने आयुष्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘गो फंड मी’ नावाचे एक पेज फेसबुकवर तयार केले. जेरेमीला त्याच्या एका फोटोमुळे ७८ हजार पौंडची कमाई करता आली.



जेरेमीचे फोटो हे इतर लोकांमध्ये जितके प्रसिद्ध झाले तितकेच ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये देखील झाले. अनेक फॅशन इंडस्ट्रीच्या लोकांनी त्यांच्याशी मॉडेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट केले. सुंदर निळे डोळे, निमुळती हनुवटी यामुळे जेरेमीचा चेहरा अगदी मॉडेलिंगसाठी परफेक्ट होता.

जेरमीला मॉडेलिंगचा पहिला कॉन्ट्रॅक्ट मिळाला त्यावेळी तो जेलमध्ये होता. याच काळात हॉलिवूडची टॅलेंट हंट एजंट गिना रॉड्रिग्जची जेरेमीवर नजर पडली. त्यांनी जेरेमीला साईन करून घेतले. एकीकडे जेरेमीला यशाचे शिखर गाठता येत होते, पण त्याचे स्वातंत्र्य जेलमध्ये बंद होते. जेरेमीला लोकप्रियता मिळाली असली तरी त्याला अनेक गुन्ह्यात दोषी मानण्यात आले होते. त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली देखील दिली होती, यामुळे जेरेमीला २ वर्षांहून ९ वर्ष शिक्षा देण्यात आली होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

तुरुंगात शिक्षा उपभोगत त्याने आपले मॉडेलिंगचे काम सुरु ठेवले आणि तो लोकांमध्ये प्रसिद्ध झाला. २००८मधे जेरेमीने मेलीसा नावाच्या मुलीशी लग्न केले होते. चलॉय ग्रीनसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

२०१६मधे त्याने सर्वप्रकारच्या न्यायालयीन लढाया लढवून झाल्यानंतर त्याच्या मॉडेलिंग करियरवर लक्ष द्यायला सुरुवात केली. इंस्टाग्रामवर आपले फोटो टाकून त्याने अनेक फॉलोवर्स कमावले.

इतकेच नाही तर, त्याच्या चाहत्यांना जेरेमीने सुरुवातीपासून आतापर्यंतची सर्व कथा सांगितली. आज इंस्टाग्रामवर जेरेमीचे ७,६०,००० फॉलोअर्स आहेत. तुरुंगात बराच काळ घालवल्यानंतर जेरेमीने काही काळ मॉडेलिंग केली आणि आज तो एक मॅनेजर म्हणून काम करतो आहे.

एकेकाळी जास्त पैशासाठी अपराधाचा मार्ग निवडणारा जेरेमी आज १२ हजार डॉलर कमावतो. त्याचे एक आलिशान घर असून त्याच्याकडे अनेक स्पोर्ट्स कार्सचा संग्रह आहे. त्याच्या लुक्ससाठी जेरेमी ओळखला जातो. त्याची गर्लफ्रेंड चेलोय ग्रीनला किस करतानाच फोटो त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला, त्याच्या फॅन्सने हा फोटो शेयर केला होता. काही फॅन्सच्या कमेंट्सनंतर त्याने हा फोटो डिलीट केला होता.

एका जेलमधील मगशॉट फोटोमुळे जेरेमी यांचे आयुष्य पालटले होते. एकेकाळी गुन्हेगार असलेला जेरेमी आज चांगले आयुष्य जगतो आहे. नशिबात असेल तर काहीही शक्य आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा लक्षात घेऊन सरदार पटेलांनी नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना केली होती

Next Post

थोर शास्त्रज्ञ एडिसनला बालपणी लोक मंदबुद्धी म्हणून हाक मारायचे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

थोर शास्त्रज्ञ एडिसनला बालपणी लोक मंदबुद्धी म्हणून हाक मारायचे

गुगलच्या महत्त्वाकांक्षी 'गुगल प्लस'ची निर्मिती या मुंबईकर तंत्रज्ञाने केली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.