The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘कॅप्टन मॉर्गन’चा हा इतिहास अट्टल बेवड्यांनासुद्धा माहिती नसेल !

by द पोस्टमन टीम
13 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


स्पाइस गोल्ड रमच्या बॉटलवरील कॅप्टन मॉर्गनचे चित्र तुम्ही पहिलेच असेल. पण, हा कॅप्टन मोर्गन कोण होता आणि त्याचा रमशी काय संबंध होता हे तुम्हाला माहिती आहे का?

कॅप्टन मॉर्गन हा सतराव्या शतकातील एक खलाशी आणि गुप्तहेर होता. तो समुद्रात गस्त घालत घालत इतर देशाच्या समुद्री हालचालींवर नजर ठेवी. तसेच इतर देशाच्या जहाजापासून त्याच्या जहाजाला काही धोका आहे असे वाटल्यास त्या जहाजांवरील सैनिकांशी यु*द्ध करून ते जहाज आपल्या ताब्यात घेण्याचा अधिकारही त्याला होता. त्याचे पूर्ण नाव हेन्री मॉर्गन. फक्त एका रमच्या बॉटलवर त्याचे चित्र झळकावे इतका काही तो अगदीच कोणीतरी नव्हता. त्याचे कर्तृत्व त्याहून खूप मोठे आहे.

वेल्समधील मॉंमॉथशायर येथे १६३५ साली त्याचा जन्म झाला. मॉर्गनच्या बालपणीविषयी फारशी माहिती मिळत नाही. इतकेच काय त्याच्या आईवडिलांचे नाव काय हेही माहित नाही. फक्त त्याला दोन काका की मामा होते एवढीच माहिती मिळते आणि त्याचे हे मामा लष्करात खूप मोठ्या पदावर होते.

मॉर्गनने लहानपणीच शाळा सोडली. त्याला पुस्तकापेक्षा खं*जीर, चा*कू अशा धारधार, तीक्ष्ण ह*त्यारांत खूप रस होता. हा मॉर्गन कॅरिबियनला कसा पोहोचला त्याबद्दलही कुणाला निश्चित माहिती नाही.



अँग्लो-स्पॅनिश यु*द्धाचा भाग म्हणून कदाचित ऑलिव्हर क्रॉमवेलने त्याला रोबर्ट वेनाबेल्सच्या सैन्य तुकडीत समाविष्ट होण्याचे आदेश दिले असावे किंवा त्याचे अपहरण करण्यात आले असावे. 

कॅप्टन मॉर्गनच्या जीवन चरित्रातही याबद्दल लिहिले आहे. परंतु त्याचे हे चरित्र आलेक्झांड्रे एक्सक्वेमेलीन नावाच्या एका सर्जनने लिहिले आहे. आलेक्झांड्रे एक्सक्वेमेलीन हा मॉर्गनच्या जहाजावरच सर्जन होता. म्हणून मॉर्गनबद्दल त्याने लिहिलेली माहिती अधिकृत आहे असा दावा करता येतो. पण, आलेक्झांड्रे मॉर्गनचा द्वेषही करत असे असं म्हणतात. त्यामुळे त्याने लिहिलेले मॉर्गनचे चरित्र काहीसे एकांगी वाटते. त्याने मॉर्गनला एक अत्यंत क्रू*र खालाश्याच्या रुपात रंगवले आहे. अर्थात, यात फार आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण एक्सक्वेमेलीनला नेहमी असे वाटत असे मॉर्गन त्याच्यावर अन्याय करतो आहे किंवा त्याला फसवतो आहे, म्हणूनच त्याच्यावर एका प्रकारे सूड उगवण्यासाठीच त्याने पुस्तक लिहिले की काय असे वाटते.

१६५५ साली हेन्री मॉर्गन बार्बाडोसमध्ये आला. तिथे त्याने अगदी शिपायापासून आपल्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर त्याने बढती मिळवली आणि एका साध्या शिपायापासून तो पारंगत खलाशी झाला. १६६० साली मॉर्गन सर ख्रिस्तोफर मिंगीस याच्या खलाशी समूहाचा भाग होता. ख्रिस्तोफर मिंगीससोबत त्याने समुद्री प्रवास सुरु केला. या प्रवासात त्याने जहाजे कशी हाकावीत याबद्दलचे सगळे ज्ञान घेतले. १६६२ साली तो एका छोट्या जहाजाचा कप्तान बनला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सतराव्या शतकात खलाशी हे गुप्तहेराचेही काम करत असत म्हणून त्यांना प्रायव्हेटीअर म्हटले जात असे. परंतु यांच्यावर विरोधी देशाचा जहाजे नष्ट करण्याचीही जबाबदारी सोपवलेली असे. कॅरिबियन आणि मध्य अमेरिकेच्या समुद्रात ते गस्त घालत. स्पानिश जहाजापासून कॅरिबियन समुद्र किनाऱ्यालागतच्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी ब्रिटनने मॉर्गनची नेमणूक केली होती. स्पॅनिश आणि ब्रिटन जहाजामध्ये त्याकाळी खूप स्पर्धा चालत असे.

 मॉर्गन स्पॅनिश जहाजांवर आणि त्यांच्या शहरावर ह*ल्ला करून त्यांना लुटत असे.

१६६६ साली त्याने एडवर्डची मुलगी मेरी एलिझाबेथ मॉर्गनशी लग्न केले. १९६५ पर्यंत तो स्पॅनिश शहरांवर ह*ल्ला करत होता. १६६० ते १६७० पर्यंत त्याने अनेक स्पॅनिश जहाजांवर ह*ल्ला केला आणि त्यांची लूट केली. तो स्पॅनिश शहरेही लुटत होता. याचवेळी तो जमैकाचे गव्हर्नर थॉमस मोडीफोर्ड यांच्या संपर्कात आला. थॉमस मोडीफोर्ड यांनी त्याला स्पॅनिश जहाजे आणि शहरे लुटण्याचा परवानाच दिला. प्युरटो प्रिन्सिपायवर ह*ल्ला केल्यानंतर मॉर्गनची प्रसिद्धी खूपच वाढली.

१६६८ साली त्याने ३००० स्पॅनिश सैनिकांचा पराभव केला. या सगळ्या सैनिकांना त्याने कैद केले आणि त्याच्या सुटकेसाठी एक लाख युरोजची मागणी केली.

१६७१ साली मॉर्गनने जुन्या पनामा शहरावर ह*ल्ला केला. हे अमेरिकच्या राजधानीचे शहर होते. या ह*ल्ल्यात स्पॅनिशचे ४०० ते ५०० सैनिक मारले गेले. तर मॉर्गनचे फक्त १५ सैनिक मारले गेले. पनामा शहरात तो पोहोचण्याआधीच त्याची कीर्ती पोहोचली होती. त्यामुळे या सैनिकांनी शहरातील सगळे दागदागिने आणि सोने दूरवर कुठेतरी लपवून ठेवले होते. त्यामुळे हा ह*ल्ला करूनही त्याच्या हाताला फारसे काही लागले नाही. शिवाय याचवेळी स्पेन आणि इंग्लंड दरम्यान शांततेचा करार झाला होता, त्यामुळे स्पेनच्या समाधानासाठी जमैकाच्या गव्हर्नरनी मॉर्गनला अटक करण्याचा फतवा काढला.

खरंतर, गव्हर्नरला देखील मॉर्गनला अटक करायची इच्छा नव्हती. १६६२ साली त्याला लंडनमध्ये सुनावणीसाठी बोलावण्यात आले. परंतु इथे त्याच्यावर खटला चालवण्याऐवजी खलाशी गुप्तहेर मॉर्गनचा सत्कार करण्यात आला. त्याला सरदाराचा दर्जा देण्यात आला. १६७४ मध्ये त्याला पुन्हा जमैकाचा लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्त करण्यात आले. यानंतर मॉर्गन इंग्लंडला परत गेलाच नाही.

मॉर्गनला दारूचे खूप व्यसन होते आणि जुगाराचा छंदही. त्यामुळे तो सरदार उमरावांच्या वर्तुळात कधी शोभलाच नाही. १६७७ साली तो लेफ्टनंट गव्हर्नर पदावरून पायउतार झाला. त्यानंतर तो पुन्हा खलाशी आणि गुप्तहेरांसोबतच काम करू लागला. पण, मॉर्गनचे दारूचे व्यसन मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. हे व्यसन इतके वाढले की, त्याच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला.

२५ ऑगस्ट १६८८ रोजी त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्युनंतर शाही इतमामात त्याला अखेरची मानवंदना देण्यात आली. त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीच्या नावावर त्याने जमैकामधील शेती आणि १३१ गुलाम ठेवले होते. त्यांना मुलबाळ नसल्याने जर त्याच्या पुतण्याने मॉर्गन आडनाव लावले तर ही सर्व संपत्ती त्यांच्या नावावर होईल अशीही तरतूद त्याने केली होती.

१९४४ साली जेंव्हा सीगरम कंपनीला त्यांच्या ब्रँडेड रमसाठी लोगो हवा होता तेंव्हा अचानक त्याच्यासमोर हे नाव आले. कारण मॉर्गन म्हटले की, एक खोडकर, खट्याळ आणि पिऊन आउट होणारा खलाशी एवढीच प्रतिमा त्या कलाकारासमोर उभी राहिली असेल. जी रमच्या बॉटलवर शोभूनही दिसते.

एकेकाळचा हा धाडसी खलासी आज फक्त रमच्या बॉटलवरील त्याच्या चित्राच्या रुपात जिवंत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हे दशक मानवी इतिहासातील सर्वात वाईट दशक मानलं जातं !

Next Post

एकाचवेळी हा माणूस अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनचा गुप्तहेर म्हणून काम करत होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एकाचवेळी हा माणूस अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनचा गुप्तहेर म्हणून काम करत होता

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.