The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काश्मीरमधील ‘बॅड’ द*हश*तवाद्यांना या ‘गुड’ द*हश*तवादी संघटनेने संपवले होते

by द पोस्टमन टीम
14 March 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“गुड बॅक्टेरिया” आणि “बॅड बॅक्टेरिया”बद्दल आपण ऐकले असेलच. नावाप्रमाणेच गुड बॅक्टेरिया हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो तर, बॅड बॅक्टेरिया हा शरीरासाठी घातक असतो. बॅक्टेरियाप्रमाणे द*हश*तवाद्यांमध्ये देखील काही द*हश*तवादी हे चांगले असतात, तर काही द*हश*तवादी वाईट असतात.

आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की एखादा द*हश*तवादी चांगला कसा असू शकतो, कुठल्याही प्रकारचा द*हश*तवादी हा वाईटच असतो. मग हा ‘गुड द*हश*तवादी’ नेमका काय प्रकार आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच..

जगभरात अनेक द*हश*तवादी संघटना आहेत, त्यातील बहुतांश या हिं*सक आणि क्रू*र आहेत. एकीकडे इसिस, अल कायदा, बोको हराम, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तय्यबा अशा क्रू*र दहशतवादी संघटना आहेत, ज्या सामान्य माणसांचा नर*संहार करतात. तर, दुसऱ्या बाजूला इखवान-उल-मुस्लिमूनसारख्या संघटना आहेत, ज्या द*हश*तवाद्यांचा नर*संहार करतात. या इखवान-उल-मुस्लिमून संघटनेला ‘गुड द*हश*तवादी’ संघटना म्हटले जाते.

द*हश*तीच्या मार्गानेच हे लोक दुसऱ्या द*हश*तवाद्यांचा नाश करून सामान्य नागरिकांचे रक्षण करतात.

९०चे दशक काश्मिरातील आतंक*वाद्यांसाठी अजिबात चांगले नव्हते, या दशकात काश्मिरातील द*हश*तवाद्यांना चांगलाच धडा शिकवण्यात आला होता. आजवर कोणी तशी कामगिरी करू शकले नाही. या सर्व कामगिरीचे श्रेय जाते काश्मीरी डोगरी गीत म्हणणाऱ्या मोहम्मद युसुफ पारे या गायकाला!



त्याने आपल्या गायन कलेला बाजूला ठेवून बंदुक हातात घेत काश्मीरच्या खोऱ्यातील आतं*कवाद संपुष्टात आणण्याची शपथ घेतली होती. लोक त्याला ‘कुका प्यारे’ म्हणून देखील ओळखत होते. लोकांना वाटायचे की हा भारतीय सैन्याचा माणूस आहे पण सैन्याने कधीच त्याला आपले म्हटले नाही. भारत सरकारने देखील त्याला मदत केली नाही. भारत सरकार त्याची मदत करणे शक्य देखील नव्हते कारण इखवान-उल-मुस्लिमूनसारख्या द*हश*तवादी संघटनेचा प्रमुख होता. जरी तो एक चांगला द*हश*तवादी होता तरी, त्याचा मार्ग हिं*सेचाच होता. त्याने सीमेपल्याड जाऊन पाकिस्तानात आपले प्रशिक्षण पूर्ण केले. तिथे तो आ*तंक*वादी झाला मग त्याने भारतीय सैन्याकडे शरणागती पत्करली. यानंतर तो भारताच्या बाजूने त्याच लोकांच्या बाजूने लढू लागला ज्यांच्याकडे त्याने एकेकाळी प्रशिक्षण घेतले होते.

त्याला द*हश*तवादी संघटनांची दुखरी बाजू माहिती होती. यामुळेच भारतीय सैन्य, काश्मीरी पोलीस आणि गुप्तहेर संस्था त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायचा. छत्तीसगडच्या जंगलात नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या सलवा जुडूमसारख्या संघटनेशी इखवानची तुलना केली जात होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१९९६ साली काश्मीर खोऱ्यात शांततेत निवडणूका पार पाडण्यासाठी या इखवानी द*हश*तवाद्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. काश्मीरला द*हश*तवाद्यांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्यात या इखवानी लोकांनी मोलाची भूमिका बजावली होती. ते प्रत्यक्ष जमिनीवर उतरून द*हश*तवाद्यांचा सामना करायचे.

१९९६ साली काश्मीरमध्ये सामान्य पद्धतीने निवडणुका होतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जो नेता निवडणुकीला उभं राहण्याची गोष्ट करायचा, तो आतंक*वाद्यांच्या हिटलिस्टवर यायचा.

काश्मीरमधील १९८९साली झालेल्या हिं*साचारानंतर तेथील जनतेला असणारा नेत्यांचा आधारच संपुष्टात आला होता. काश्मिरी घाटीत निवडणुका घेणे भारत सरकारसाठी अवघड होऊन बसले होते. दीर्घकाळापासून लागू करण्यात आलेल्या राष्ट्रपती शासनाला संपुष्टात आणण्याची वेळ आली होती. अशावेळी स्थानिक प्रशासनाने व सैन्याने कुका पारेची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

त्याने जम्मू अँड काश्मीर आवामी लीग या पक्षाची स्थापना केली. सरकारची देखील इच्छा होती की निवडणुका लढवून त्याने आपली प्रतिमा सुधारावी. सरकारने निवडणुका घेतल्या, यात कुका पारेच्या पक्षाचे सर्व उमेदवार पराभूत झाले. पुढे विधानसभा निवडणुकीत त्याने स्वतः निवडणूक लढवली व तो त्यात विजयी झाला पण त्याच्या पक्षाचे इतर उमेदवार मात्र पराभूत झाले. कुका आमदार झाला व फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष बहुमताने निवडून आला होता.

कुका पारे आमदार झाल्यावर त्याचे साथीदार सनदशीर मार्गाला न लागता अधिकच उग्र झाले. ते कोणाचेच ऐकत नव्हते.  ते कोणाच्याही हत्या करत फिरत होते. भारतीय सैन्याचा त्यांच्यावरील ताबा सुटत चालला होता अखेरीस अब्दुल्ला सरकारने सक्तीने इखवानांच्या विरोधात मोहीम उघडली. दोन वर्षात शेकडो इखवान जेरबंद करण्यात आले. १९९८ पर्यंत ‘इखवान-उल-मुस्लिमून’चे अस्तित्व संपुष्टात आले होते.

सरकारने इखवानांवर कारवाई सुरू केल्याने “बॅड आतं*कवादी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संघटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले. इखवान पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्यावर २००३ साली जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेच्या अति*रेक्यांनी एके ४७ रायफल घेऊन कुका पारेवर गोळीबार केला आणि यामध्ये कुका पारेचा मृत्यू झाला.

जैशच्या गाझी बाबा या कमांडरच्या ह*त्येचा बदला त्यांनी कुका पारेला मारून घेतला होता.

कुका पारेच्या निधनानंतर त्याच्या साथीदार इखवानांचा देखील मोठ्या प्रमाणात संहार करण्यात आला. २०१८ मध्ये अब्दुल गफार बट, मंजूर बट, महंमद याकूब व त्याच्या परिवाराची ह*त्या द*हशत*वाद्यांनी केली होती. अब्दुल गफार बट व त्याचा मुलगा मंजूर यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. तर महंमद याकूबच्या घरात घुसून त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रमाणे इखवानमध्ये असलेल्या ६ लोकांच्या कुटुंबांचे ह*त्याकांड करण्यात आले होते. २०१७ मध्ये देखील अहमद शेख आणि अहमद पार्रेची हत्या करण्यात आली होती. २००३ साली सर्वाधिक १५० इखवानांचा बळी देण्यात आला होता.

हाजिन हा इखवानांचा ठिकाणा होता, पण आज तिथे कोणीच राहत नाही. अनेक परिवारांनी घर सोडून पलायन केले आहे. ज्यावेळी भारत सरकारला इखवानांची गरज होती त्यावेळी त्यांचा वापर केला, पण गरज संपल्यावर त्यांना मरायला सोडून दिले. अनेक इखवान मृत्यूच्या भयाने द*हश*तवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत. यामुळे गुप्तचर संघटनांचे अधिक नुकसान झाले आहे. इखवान ही भारत सरकारच्या आशीर्वादाने चालायची, आजही सरकार त्यांना मदत करते.

इखवानांची भारतीय सैन्याला मदतच होत होती, पण सैन्याला तिसऱ्या कोणाला याठिकाणी मोठे होऊ द्यायचे नव्हते, असे म्हणतात. आज इखवान संपूर्णपणे नष्ट झाले आहेत, आजही कोणा मुलाचा बाप इखवान असेल तर त्याची देखील ह*त्या करण्यात येते. भारताच्या शत्रूच्या विरोधात शस्त्र उचलून देखील इखवानांच्या वाट्याला काहीच आले नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘गुगल प्लस’ची निर्मिती या मुंबईकर तंत्रज्ञाने केली होती..!

Next Post

रजनी पंडित : भारताची लेडी जेम्स बॉंड

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

रजनी पंडित : भारताची लेडी जेम्स बॉंड

आईस्क्रीममुळे एकेकाळी युरोपात टीबी आणि कॉलराची साथ पसरली होती !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.