The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओशोंसाठी विनोद खन्ना यांनी बॉलिवूडच्या स्टारडमचा संन्यास घेतला होता

by द पोस्टमन टीम
6 October 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


विनोद खन्ना यांनी १९८२ साली मुंबईच्या एका हॉटेलात पत्रकार परिषद बोलावली होती. कोणताही बॉलिवूड सेलिब्रेटी त्याकाळी क्वचितच पत्रकार परिषद बोलवत असे. विनोद खन्ना यांनी या पत्रकार परिषदेला भगवी वस्त्रे आणि ओशोचा फोटो असलेली माळ घालून प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पहिली पत्नी गीतांजली व दोन्ही मुलं अक्षय आणि राहुल देखील होते.

लोकांना अंदाज आला होता की विनोद खन्ना काय करणार आहेत. त्यावेळी विनोद खन्ना यांनी नवीन चित्रपट घेणे बंद केले होते. त्यांनी अनेक चित्रपट निर्मात्यांना साइनिंग अमाऊंट परत करायला सुरुवात केली होती. त्या अगोदर त्यांचे “द बर्निंग ट्रेन” आणि “कुर्बानी” हे दोन चित्रपट फार यशस्वी ठरले होते.

त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीचे लोक म्हणायचे की जर विनोद खन्ना आपल्या करियरच्या बाबतीत सिरीयस झाले तर अमिताभ बच्चनच्या स्टारडमला चॅलेंज करू शकतात. विनोद मात्र त्यावेळी वेगळ्याच जगात रमत होते. चित्रपट सृष्टीतील त्यांचा रस कमी होत चालला होता.

७० च्या दशकांत आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचा विनोद खन्नांवर प्रचंड प्रभाव होता. १९७५ च्या शेवटच्या दिवशी त्यांनी रजनीश आश्रमात संन्यास घेतला होता. त्याच्या अगोदर अनेक तास त्यांनी ओशोंचे व्हिडीओ बघण्यात घालवले होते. ७० च्या दशकात, सोमवार ते शुक्रवार बॉलिवूडमध्ये काम आटोपलं की मग त्यांची मर्सिडीज घेऊन ते पुण्याला ओशोंच्या आश्रमात यायचे. याठिकाणी आठवड्यातील दोन दिवस ते रहायचे. आधी हॉटेलात रहायचे मग तिथून आश्रमात जायचे.

आश्रमात प्रवेश केल्यावर त्यांच्यातील सुपरस्टार मागे हटायचा आणि त्यांच्यातील ओशोसेवक जागृत व्हायचा. ते दोन दिवस आश्रमातील इतर शिष्यांप्रमाणे प्रार्थना म्हणायचे. ओशो आश्रमात ते माळी म्हणून काम करायचे, ते आश्रमातील बगीचा साफ करायचे. बऱ्याचदा आश्रमाच्या गेटवर उभा असलेला ड्रायव्हर त्यांना कचरा उचलून साफ सफाई करताना बघायचा.



आश्रमात विनोद खन्ना स्वामी विनोद भारती म्हणून काम करायचे. 

बॉलिवूडमध्ये काम करणारे जुने फिल्म पत्रकार म्हणतात की शूटिंग संपवून ते जसे बाहेर यायचे आणि लोकांची भेट घ्यायचे त्यावेळी ते नेहमी म्हणायचे की स्वामी रजनीश हे पृथ्वीवर असलेले एकमेव जिवंत ईश्वर आहेत. ८० च्या दशकांत पुण्यातील आश्रमात काही अडचणी येऊ लागल्यामुळे ओशो यांनी सरळ अमेरिकेची वाट धरली आणि तिथं रजनीशपुरम नामक आश्रम स्थापन केला. त्यांनी आपल्या शिष्यांना त्यांच्याजवळ बोलावून घेतले. विनोद खन्ना यांना देखील तिथे जायचे होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९८२ च्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना ज्याचा अंदाज होता, तेच घडले.

विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमधील आपल्या करियरला तिलांजली देऊन स्वामी रजनीश यांच्या ओरेगॉन येथील आश्रमात स्थयिक होण्याची घोषणा केली. ओरेगॉनच्या आश्रमात ते स्वामी विनोद भारती म्हणून राहू लागले. त्यावेळी त्यांच्याकडे बागकामाची जबाबदारी सोपविण्यात आली. 

तिथे वास्तव्य करत असतांना त्यांनी अत्यंत प्रसन्नपणे काम करायला सुरुवात केली. ते कचरा साफ करण्याचे काम उत्तम प्रकारे पार पाडत. जो कोणी त्या आश्रमाला भेट देत असे तो अत्यंत प्रसन्न मुद्रेने तिथे वास्तव्य करणाऱ्या विनोद खन्नांना बघूनच आनंदी व्हायचा.  त्यावेळी विनोद खन्ना यांच्या बातम्या येणे देखील बंद झाले होते. चार बाय सहाच्या खोलीत विनोद तिथे वास्तव्य करत होते.

२-३ वर्ष असे चालले, पण १९८५ मध्ये एके दिवशी विनोद खन्ना अचानक भारतात परतले. वाढलेल्या पांढऱ्या दाढीमुळे लोकांना त्यांची ओळख पटत नव्हती. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक पत्रकारांनी त्यांच्यावर अनेक बातम्या केल्या. काही म्हणाले त्यांच्याकडे पैसे संपले आहेत तर काही म्हणाले त्यांचे स्वामी रजनीशबरोबर भांडण झाले आहे.

पण १९८५ साली बरंच काही घडलं होतं. त्यांची बालपणीची मैत्रीण गीतांजली जिच्याशी ते विवाहबद्ध झाले होते, तिने त्यांच्या[पासून घटस्फोट घेतला होता. स्वामी रजनीश यांची देखील अमेरिकन सरकारने या काळात हकालपट्टी केल्याने ते भारतात १९८७ साली ओशो हे नवीन नाव धारण करून परतले.

विनोद खन्ना आयुष्यभर ओशो यांच्याशी जोडलेले होते. ते नेहमी पुण्याच्या आश्रमात यायचे. त्यांनी पुन्हा फिल्ममध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्याकडे रांगा लावल्या होत्या. असं म्हणतात की त्यावेळी विनोद खन्ना यांच्याकडे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त पैसे होते.

काही काळाने विनोद खन्ना राजकारणात गेले. १९९७ साली ते गुरुदासपूर मतदारसंघातून आमदार म्हणून  निवडून आले होते. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांना पर्यटन राज्यमंत्री करण्यात आले होते.

२७ एप्रिल २०१७ रोजी विनोद खन्ना यांचे निधन झाले. पुण्याच्या ओशो आश्रमाच्या वेबसाईटवर त्यावेळी आश्रमात त्यांच्या परमपूज्य संत स्वामी विनोद भारती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती मिळते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

रेल्वेचं रूप पालटलं पण तिकीट मात्र ९० च्या दशकातील प्रिंटरवरच प्रिंट होतं

Next Post

भारतातून का चोरी होताय कोट्यवधी रुपयांच्या प्राचीन मुर्त्या ?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

भारतातून का चोरी होताय कोट्यवधी रुपयांच्या प्राचीन मुर्त्या ?

कोर्टाच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरंगात पाठवणाऱ्या या कायद्यामुळे देशभर वातावरण तापले आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.