The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतातून का चोरी होताय कोट्यवधी रुपयांच्या प्राचीन मुर्त्या ?

by द पोस्टमन टीम
10 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


राजस्थानमधून १९८८ साली चोरी करण्यात आलेली भगवान शिवाची प्रतिमा ब्रिटन भारताला परत करणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ब्रिटीश सरकारकडून भारतीय दूतावासापर्यंतचा या मूर्तीचा प्रवास पूर्ण झाला आहे. लंडनच्या भारतीय दूतावासातून या मूर्तीला भारतात आणले गेले.

भारतीय मुर्त्यांची चोरी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भारतात प्राचीन मुर्त्यांची चोरी होत असते. आजपर्यंत अनेक मुर्त्या चोरी होऊन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जर्मनीत गेल्या होत्या आणि तेथून त्या परत आणण्यात आल्या आहेत.

एका सर्व्हेनुसार देशात दरवर्षी सरासरी १००० मुर्त्यांची चोरी होते आणि त्या मुर्त्या विदेशात पाठवल्या जातात.

यापैकी काही मुर्त्या तर प्रचंड मौल्यवान असतात. तांबे आणि कांस्यापासून बनवण्यात आलेल्या मुर्त्यांचे वजन हे १५ ते १६ टन इतके असते. न्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या एका रिपोर्टमध्ये यावर भाष्य करण्यात आले आहे. सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या एका व्यापाराने सिंगापूरला भारतातून १० हजार मुर्त्यांची तस्करी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. व्यापारी म्हणतो की गेल्या दशकभरापासून भारतीय मूर्ती चोरी होण्याचे प्रकरण तो पाहतो आहे. द आयडॉल थीफ अर्थात मूर्ती चोर नावाच्या एका पुस्तकाचे लेखन देखील या प्रकारावर करण्यात आले आहे.

बहुतांश मुर्त्यांची तस्करी ही समुद्राच्या मार्गाने केली जाते. या मूर्त्यांना अत्यंत जपून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांपासून लपवत नेण्यात येते, जर चुकून कस्टम ऑफिसरच्या हाती लागली, तरी बनावट अथवा सजावटीची मूर्ती असल्याची बतावणी करत तिला जहाजापर्यंत आणि तिथून परदेशात पोहचवण्यात येते. बऱ्याचदा यासाठी मोठी लाच देखील देण्यात येते.



समुद्रमार्गे दुसऱ्या देशात पोहचल्यावर काळ्या बाजारात या मुर्त्यांची विक्री करण्यात येते. परदेशातील लोक या मूर्त्यांना चांगली किंमत देऊन विकत घेतात. मूर्ती तस्करी करून आणण्यात आल्यामुळे तिचे लीगल डॉक्युमेंट्स नसतात, ती कुठली आहे आणि किती खरी आहे, याची कुठलीच माहिती नसल्याने या मूर्त्यांना त्यांच्या ओरिजिनल किंमतीपेक्षा कमीच भाव मिळतो. चांगला भाव मिळावा यासाठी बऱ्याचदा चोर खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक देखील  करतात.

The Antiquities and Art Treasures Act, 1972 या कायद्यानुसार भारतात प्राचीन मुर्त्या आणि त्यांच्या तस्करीवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. या कायद्यानुसार फक्त प्राचीन मुर्त्याच नाहीत तर आर्ट वर्क, पेंटिंग्स,ज्वेलरी इत्यादी वस्तूंच्या तस्करीवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

ज्याच्याकडे प्राचीन मुर्त्यांचा संग्रह आहे, त्याने स्वतःची आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला कायदेशीर पद्धतीने मूर्तीची विक्री करायची असेल तर त्याला स्वतःजवळ लायसन्स बाळगणे गरजेचे आहे. जर कोणी याचे पालन केले नाहीतर त्याच्या विरोधात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यांच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरल्यामुळे भारतीय मुर्त्या आज परदेशात जात आहेत.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

भारतात प्राचीन वस्तूंचा कुठलाही डेटाबेस तयार करण्यात आलेला नाही. National Mission for Monument and Antiquitiesच्या मते भारतात ७ मिलियन प्राचीन वस्तू आहेत. परंतु यापैकी फक्त १.३ मिलियनचेच डॉक्युमेंटेशन सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळे कमिटी बनवल्यानंतर देखील कडक नियम करण्यात सरकार तस्करी रोखण्यात अपयशी ठरले आहे. सागरी सीमेवर देखील करडी नजर नसल्यामुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

सुभाष कपूर हा भारतीय तस्कर जगातील सर्वात कुख्यात तस्करांपैकी एक आहे, अशी माहिती द डिप्लोमॅट या वृत्तसंस्थेने दिली आहे. भारतात कायदे सौम्य असल्यामुळे या तस्करांचे फावते आहे.

या सुभाष कपूरने मॅनहॅटन शहरात भारतातील बहुमूल्य नटराजची मूर्ती परदेशी श्रीमंत लोकांना विकली होती. ही मूर्ती ९०० वर्ष जुनी होती आणि त्या मूर्तीची किंमत ९०० डॉलर्सपेक्षा जास्त होती.

अशीच एक ११०० वर्ष जुनी भगवान शंकराची मूर्ती त्याने न्यू साऊथ वेल्समध्ये विकली होती. त्याच्याकडे तब्बल १०७ दशलक्ष डॉलर किंमतीच्या प्राचीन मुर्त्या आहेत. यामुळेच त्याला जगातील सर्वात मोठा मूर्ती तस्कर मानले जाते.

दुसऱ्या देशात ज्यावेळी प्राचीन मुर्त्या सापडतात त्यावेळी तो देश त्या मुर्त्या परत करतो. भारत १९७० च्या युनेस्को कराराचा भाग असल्याने भारतात मूर्ती परत आणणे फार सोपे काम आहे. पण ज्यावेळी एखादी मूर्ती चोरी आणि तस्करी होऊन तिच्या एखाद्या खाजगी मालकापर्यंत पोहचते त्यावेळी तिचा शोध घेणे फार अवघड काम असते. सध्या पुरातत्व विभाग आपल्या वस्तू संग्रहालयाला आधुनिक स्वरूप देऊन या मुर्त्यांचे जतन करत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ओशोंसाठी विनोद खन्ना यांनी बॉलिवूडच्या स्टारडमचा संन्यास घेतला होता

Next Post

कोर्टाच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरंगात पाठवणाऱ्या या कायद्यामुळे देशभर वातावरण तापले आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

कोर्टाच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरंगात पाठवणाऱ्या या कायद्यामुळे देशभर वातावरण तापले आहे

भारतरत्न आणि निशाण-ए-पाकिस्तान मिळवणारे मोरारजी हे एकमेव व्यक्ती आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.