The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या दोन मित्रांमध्ये लागली आहे सर्वाधिक ‘क्रेडिट कार्ड’ जमवण्याची शर्यत !

by द पोस्टमन टीम
12 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतोच. त्या छंदामुळे कधी कधी त्या व्यक्तीच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. कित्येक व्यक्ती तर त्यांनी जोपासलेल्या विचित्र प्रकारच्या छंदामुळेच आजवर ओळखले गेले आहेत. कुणाला पोस्ट कार्ड जमा करण्याचा छंद असतो, कुणाला जुनी नाणी, जुनी घड्याळे, वेगवेगळ्या आणि हटके अशा वस्तू जमा करण्याचा छंद अनेकांना असतो.

चीनच्या एका तरुणाला असाच एक छंद लागला ज्यामुळे त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली. इतकेच काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही २०१९ मध्ये त्याच्या या छंदाची दखल घेतली होती.

चीनच्या गंगडॉंग प्रांतातील शिंचीन शहरातील या तरुणाचे नाव आहे शेंग शियांगचेन. या तरुणाला छंद आहे क्रेडीट कार्ड जमा करण्याचा. अमेरिकेच्या वॉल्टर कॅवानॅगलाही हा छंद आहे आणि शेंग शियांगचेनच्या आधी गिनीज रेकॉर्डमध्ये याचेच नाव नोंदवलेले होते. शेंगने त्याच्याकडूनच क्रेडीट कार्ड गोळा करण्याची प्रेरणा घेतली.

वॉल्टर कॅवनॅगला “मिस्टर प्लास्टिक फांटास्टिक” म्हणूनही ओळखले जाते. त्याच्याकडे एकूण किती क्रेडीट कार्ड असतील याची तुम्ही कल्पना करू शकता का?



वॉल्टर कॅवानॅगकडे एक दोन नव्हे तर एक हजार चारशे सत्याण्णव ऍक्टिव्ह क्रेडीट कार्ड होते. विशेष म्हणजे यातील एकही क्रेडीट कार्डवर कर्ज नव्हते. या प्रत्येक क्रेडीट कार्डची एकूण शिल्लक होती, १७ लाख डॉलर.

तुमचे आर्थिक व्यवहार पुरेसे स्पष्ट असतील तर तुम्हाला क्रेडीट कार्ड मिळण्यात फारशी अडचण येत नाही. पण, एकापेक्षा अधिक क्रेडीट कार्ड्स जमा करणे इतके सोपे नसते. शेंग शियांगचेनकडे तर एक हजार पाचशे बासष्ट क्रेडीट कार्ड्स आहेत. तुमचा क्रेडीट स्कोर जर चांगला असेल तर कंपन्या तुमच्याकडे किती क्रेडीट कार्ड्स आहेत याचा फारसा विचार करत नाहीत.

पण, एकापेक्षा जास्त क्रेडीट कार्ड्स असण्याचे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. एकापेक्षा जास्त क्रेडीट कार्ड्स असतील तर पेमेंट करताना काही चुका होण्याची शक्यता असते, दंड होऊ शकतो आणि इतरही बऱ्याच समस्या असतात. दुसरे म्हणजे तुमच्या प्रत्येक क्रेडीट कार्डसाठी काही वार्षिक फी भरावी लागते. यासाठी तुम्हाला अगदी ०$ ते १००$ पर्यंत कितीही रक्कम मोजावी लागू शकते. कार्ड्सची लिमिट वाढवण्यासाठीही जास्तीत जास्त रक्कम मोजावी लागते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

परंतु एकापेक्षा अधिक कार्ड्स असल्याने तुम्हाला अधिकाधिक कार्ड्स लिमिटचा फायदा करून घेता येऊ शकतो. विशेष म्हणजे, अडचणीच्या वेळी हे तुम्हाला अधिक फायदेशीर ठरू शकते.

कॅवनॅगला १९७० ते २०१९ पर्यंत क्रेडीट कार्ड किंग म्हणून संबोधले जात होते. पण शेंग शियांगचेनने त्याला आता मागे टाकले आहे. कॅवानॅग आणि त्याच्या मित्राची जास्तीत जास्त क्रेडीट कार्ड्स जमा करण्यावरून पैज लागली. आपला मित्र आपल्याला हरवेल या भीतीने कॅवनॉगने क्रेडीट कार्ड जमा करायला सुरुवात केली.

त्या एका वर्षांत कॅवनॉगने १४३ क्रेडीट कार्ड्स जमा केले होते.

अर्थातच मित्राशी लावलेल्या पैजेत तो जिंकला होता. कारण, त्याच्या मित्राला फक्त १३८ क्रेडीट कार्ड्स जमा करणे शक्य झाले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी कॅवनॉगने एक हजार तीनशे सत्याण्णव क्रेडीट कार्ड्स जमा केले. १९७० मध्येच अधिकाधिक क्रेडीट कार्ड जमा केल्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला होता.

कॅवनॉगने पैज जिंकल्यानंतरही क्रेडीट कार्ड जमा करण्याचे सोडले नाही. अगदी गिनीज बुकने त्याची नोंद घेतल्यानंतरही नाही. त्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन शेंग शियांगचेननेही क्रेडीट कार्ड जमा करण्याचा ध्यास घेतला. क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो. हे तर आपण जाणतोच. पण, प्रत्येक वेळेला शेंग शियांगचेनने ही किचकट प्रक्रिया पूर्ण केली आणि ज्याच्याकडून प्रेरणा घेतली त्यालाच मागे टाकले.

अमेरिकेत सामान्यत: एका व्यक्तीला चार क्रेडीट कार्ड्स वापरता येतात. एकट्या अमेरिकेतच सुमारे १० लाख क्रेडीट कार्ड्स वापरले जातात.

क्रेडीट कार्ड्स वापरणे आणि नवनवे क्रेडीट कार्ड्स काढणे वाटते तितके सोपे नाही. पण, छंदच जडला तर त्यासाठी माणूस काहीही करू शकतो हेच कॅवनॉग आणि शेंग यांच्या उदाहरणावरून पटते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांची संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे

Next Post

या मराठी प्राध्यापकाला समलैंगिक असल्यामुळे अलीगड मुस्लिम विद्यापीठामधून हाकलण्यात आलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या मराठी प्राध्यापकाला समलैंगिक असल्यामुळे अलीगड मुस्लिम विद्यापीठामधून हाकलण्यात आलं होतं

एका चोराच्या साक्षीमुळे तब्बल २८ वर्षांनी सिस्टर अभयाच्या खु*नाचा खुलासा झाला!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.