The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रभु श्रीरामाचे वंशज म्हणवून घेणाऱ्या थायलंडच्या राजाने वसवली आहे थाई ‘अयोध्या’ नगरी

by द पोस्टमन टीम
8 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अवघ्या काही दिवसांपूर्वीच देशात अतिशय उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात श्री अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर लोकार्पण तसेच प्राणप्रतिष्ठा समारोह पार पडला. संपूर्ण जग या सोहळ्याचे साक्षीदार होते. इतिहासातील एक आदर्श चक्रवर्ती सम्राट असल्या कारणाने जगभरात अनेक ठिकाणी प्रभू श्री रामांचे अनुयायी असल्याचे दिसून येईल, विशेषतः दक्षिण आशियाई देशांमध्ये आजही रामायण आणि श्री राम पूजनीय आहेत.

भारतात जशी अयोध्या आहे, त्याचप्रमाणे एक अयोध्या थायलंडधमध्ये देखील आहे. येथे एक राजवंश आहे, ज्याच्या प्रत्येक राजाला प्रभू श्रीरामाचा वंशज मानले जाते. थायलंडमधील चक्री राजवंश स्वतःला प्रभू श्रीरामाचा वंशज मानतो, इतकेच नाही याचा प्रत्येक राजा स्वतःच्या नावापुढे ‘राम’ लावतो.

गेल्या दहा पिढ्यांपासून चक्री राजवंशाचे राजे स्वतःचे राम असे नामकरण करत आहेत. थायलंडच्या वर्तमान राजाचे नाव ‘राम दशम’ असे आहे. परंतु दहा पिढ्यांपूर्वी हे लोक स्वतःचे राम असे नामकरण करत नव्हते, मग असं काय घडलं ज्यामुळे हे स्वतःचे राम असे नामकरण करू लागले, ते आपण जाणून घेऊया..

या राजवंशाने राम या आद्याक्षरापुढे पंचम, दशम अशी सांख्यक्षरे जोडण्यामागे एक युरोपियन प्रभाव आहे. या राजवंशाचे सहावे राजा वजिरावुध यांनी युरोपात शिक्षण घेत असताना तेथील राजघराण्यातील लोकांची पंचम जॉर्ज, लुईस दुसरा अशी नावे बघितल्यावर त्यांना देखील आपल्या राजघराण्याचे असे नामकरण करण्याचा मोह आवरला नाही.



वजिरावुध यांनी स्वतःला ‘राम सिक्स्थ’ असे नाव दिले, कारण ते या राजवंशाचे सहावे वंशज होते, त्यांच्यानंतर आपल्या राजघराण्यात संख्याक्षरांनी संबोधित करण्याची प्रथाच पडली. नावाच्या अगोदर रामाचे नाव लावण्याचे प्रयोग आधी देखील करण्यात आले होते.

थाई परंपरेत सामान्य लोकांना राजाला नावाने हाक मारण्याची परवानगी नाही, तिथे राजाला प्रचंड आदर देण्यात येतो. चक्री वंशाचे पहिले राजे पुत्थयोत्फा चालुलोक यांनी स्वतःला फान दिन तोन अर्थात आदि शासक अशी उपाधी दिली होती. परंतु पुढच्या राजाला मध्यम आणि अंतिम शासक म्हणावे लागू नये म्हणून ही पद्धत बंद पडली.

ही पद्धत बंद पडल्यावर बुद्ध प्रतीकांच्या नावावर उपाधी देण्यात आली. यानंतर राजसी नामावलीला व्यवस्थित करण्यासाठी अनेक पर्यायांवर विचार करण्यात आला. इतिहासकारांनी राजा नांग क्लाओ यांना शासक तृतीय म्हणायला सुरुवात केली. मग पुढे हीच पद्धत वापरली गेली. लोक राजाचा वंशजांच्या सांख्येवर आणि उपाधीवर त्यांचा उल्लेख करू लागले. ही प्रथा वजिरावुधच्या काळापर्यंत सुरु होती. मग त्याने स्वतःचे ‘राम VI’ असे नामकरण केले. यानंतर सर्वच राजांचे ‘राम VII’, राम VIII, राम IX असे नामकरण करण्यात आले.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज सत्तेत असलेल्या राजाला ‘राम X’ म्हणून ओळखले जाते. ते थायलंडमध्ये ‘फुटबॉल प्रिन्स’ म्हणून ओळखले जातात. वजिरालोंगकॉर्न हा अदुल्याडोजच्या निधनानंतर २०१६ साली सत्तारूढ झाले. त्यांना ‘राम X’ अर्थात राम दहावा म्हणून ओळखले जातात. २०१९ साली त्यांचा मोठा भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. २०२० मध्ये त्यांच्याकडे ४३ अब्ज डॉलरची संपत्ती होती. ते जगातील सर्वांत श्रीमंत शासकांपैकी एक आहेत.

थायलंडमध्ये अयुत्थया नावाची एक प्रसिद्ध नगरी आहे. इथल्या राजांना रामतिथीबोध ही उपाधी आहे. रामायणातील अयोध्या हीच आहे, अशी अनेक थाई लोकांची श्रद्धा आहे. 

१३५१ पासून येथे स्याम राजवंशाचे आयुत्थयावर राज्य होते. १७६७ मध्ये ब्रम्हदेशाच्या सैन्याने याठिकाणी लुट केली.  थायलंडचा सर्वात प्रसिद्ध धार्मिक ग्रंथाचे नाव रामकिन असे आहे. याला थाई रामायण म्हणून देखील ओळखले जाते. ३०० रामायण नावाचा ग्रंथ लिहणाऱ्या रामानुजन यांनी याची तुलना वाल्मिकी रामायणाशी केली होती. १८ व्या शतकात राजा ‘राम I’ यांनी हा ग्रंथ पुनर्लिखित करुन घेतला होता. या ग्रंथाचा प्रमुख खलनायक थोत्सकान ह्याची व्यक्तिरेखा देखील रावणाशी मिळती जुळती आहे. या ग्रंथाचा नायक फ्रान राम हा प्रभू श्रीरामाप्रमाणे एक पराक्रमी राजा आहे.

आजही थायलंडमधील अयोध्येचे अवशेष व्यवस्थित असून त्यांच्या संरक्षणासाठी युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा त्याला बहाल केला आहे.

१८ व्या शतकात ब्रम्हदेशातील आक्र*मकांनी या नगरीची बरीच तोडफोड केली होती. भारतातील अनेक पर्यटक रामकीन आणि आयुत्थ्ययाच्या भागाला भेट देऊन इंडोनेशियन रामायणाचा इतिहास समजून घेतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गिलोटीनचं नाव ऐकून माणूस शिक्षा देण्यापूर्वीच जीव सोडून द्यायचा

Next Post

फक्त पुरुषांसाठी असलेल्या कॉलेजात, एकट्या जाणाऱ्या या भारतीय महिलेने इतिहास घडवला होता

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

फक्त पुरुषांसाठी असलेल्या कॉलेजात, एकट्या जाणाऱ्या या भारतीय महिलेने इतिहास घडवला होता

रेल्वेचं रूप पालटलं पण तिकीट मात्र ९० च्या दशकातील प्रिंटरवरच प्रिंट होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.