The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या कारणांमुळे या तीन देशांमध्ये आढळत नाहीत साप !

by द पोस्टमन टीम
16 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पावसाळ्यात भारताच्या ग्रामीण भागात साप निघतात. पूर आणि जलव्याप्त भागाजवळ सर्पदंशाने मृत्यूच्या असंख्य बातम्या आपण वाचत असतो. साप हा आपल्याकडे सर्वत्र आढळून येत असला तरी जगात असे काही देश आहेत जिथे एकही साप आढळत नाही. न्युझीलंड, आईसलँड आणि आयर्लंड या देशांमध्ये एकही साप आढळून येत नाही.

या देशात साप का नाही हे आपण जाणून घेऊ!

आयर्लंड, आईसलँड, ग्रीनलंड

युरोपच्या वायव्य भागात असलेल्या आयर्लंड, आईसलँड आणि ग्रीनलँड या देशात साप नाहीत. इथे साप का नाहीत, यासाठी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. लोक म्हणतात की इथे आधी साप होते पण त्यांनी तिथल्या लोकांना इतका त्रास दिला की सेंट पॅट्रिक यांनी त्यांना समुद्रापर्यंत नेऊन सोडले व त्यांना समुद्रात राहण्याची आज्ञा केली. यानंतर साप कधीच या भूमीवर परतले नाहीत. अशी आख्यायिका आहे की या संताने सापांना पळवण्यासाठी ४० दिवस उपास केला होता यामुळे आयर्लंडमध्ये या संताला पुजले जाते.

वैज्ञानिक मात्र अशा विचारांना नाकारतात. नॅशनल जियोग्राफीच्या एका रिपोर्टनुसार, नॅशनल म्युझियम ऑफ आयर्लंडचे संशोधक नायजल मोगानन यांनी आयर्लंडमध्ये साप होते, याला कुठलाच ऐतिहासिक पुरावा नसल्याचे म्हटले आहे. जगभरात सर्वत्र साप असताना फक्त इकडे ते नसण्याला काही विशेष कारणं आहेत.



आयर्लंडचा भाग हा बऱ्याच काळापासून हिमाच्छादित होता. पुढे जेव्हा बर्फ वितळला त्यावेळी देखील तापमान फारच कमी होते, इतक्या कमी तापमानात कुठलाही साप अथवा रेप्टाईल जिवंत राहू शकत नाही, यामुळेच आयर्लंडच्या भूमीवर कधीच साप आढळून येत नाही.

 १० हजार वर्षांपासून आयर्लंडमध्ये एकच रेप्टाईल आला आहे, तो म्हणजे ‘पाल’.

साप आढळत नसले तरी इथल्या नागरिकांना साप पाळण्याची हौस आहे. बऱ्याच लोकांनी आपल्या घरात विशालकाय अजगर पाळून ठेवल्याचे रिपोर्ट्स अधून मधून येत असतात.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

न्यूझीलंड

आयर्लंडप्रमाणे न्युझीलंडमध्ये देखील साप नाहीत. द्वीपांचा समूह असलेल्या या देशात अनेक प्राणी आढळतात पण आश्चर्याची बाब म्हणजे इथे कधीच साप आढळत नाही. इथे पालीची फक्त एक प्रजाती आढळून येते.

न्युझीलंडच्या आसपासच्या समुद्री भागात पिवळ्या रंगाचे साप, समुद्री क्रेट या प्रजातीचे साप आढळतात. पण, हे साप पाणी सोडून जमिनीवर फार क्वचित येतात. जर चुकून एखादा साप जमीनीवर कुठल्याही मार्गाने आला तर त्याला परत समुद्रात सोडण्यात येते. न्युझीलंडचा सरकारने या सापांसंदर्भात फार कडक धोरण अवलंबले आहे. जर चुकून कुठला साप भूमीवर आला तर तो इथे अधिवास प्रस्थापित करणार नाही, याची काळजी घेण्यात येते.

न्युझीलंडमध्ये अँटी स्नेक कायदे फार कडक आहेत. न्युझीलंडच्या द्वीपावर १००० वर्षांपूर्वी मनुष्याने या बेटावर पाऊल टाकले यानंतर इथले बहुतांश प्राणी पक्षी व वनस्पती प्रजाती नष्ट झाल्या आहेत. जर याठिकाणी सापांनी अधिवास केला तर उरलेल्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. त्यामुळेच न्युझीलंडमध्ये सापांच्या विरोधात एवढे सक्त धोरण आखण्यात आले आहे.

ग्रीनलँड व अंटार्क्टिकामध्ये साप आढळत नाहीत याच प्रमुख कारण म्हणजे तो प्रदेश हिमाच्छादित आहे. साप ज्या रेपटाईल प्रजातीचे आहेत त्यांना कोल्ड ब्लडेड प्राणी म्हणून ओळखले जाते. हे प्राणी वातावरणातील उष्णतेवर अवलंबून असतात. त्यांच्यात माणसांप्रमाणे उष्णता निर्माण होत नाही. यामुळेच या अतिशीतल हिमाच्छादित प्रदेशात रेप्टाइल्स जगू शकत नाही, त्यामुळे या भागात साप आढळत नाहीत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एकेकाळी लंडनच्या रस्त्यावर मांजर दारु विकायचे !

Next Post

हे दशक मानवी इतिहासातील सर्वात वाईट दशक मानलं जातं !

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हे दशक मानवी इतिहासातील सर्वात वाईट दशक मानलं जातं !

'कॅप्टन मॉर्गन'चा हा इतिहास अट्टल बेवड्यांनासुद्धा माहिती नसेल !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.