The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या इमामाच्या आठवणीत मुस्लिम बांधव काढतात मोहरमला ताजियांचा जुलूस

by द पोस्टमन टीम
6 February 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मोहरम या इस्लामी कॅलेंडरच्या महिन्याची प्रत्येक दहावी तारीख ही ‘यौम ए आशुरा’ म्हणून ओळखली जाते. याच दिवशी कारबालाच्या यु*द्धात इमाम हुसेन आणि त्यांचे साथीदार शहिद झाले होते. हुसेन यांना न्याय आणि मानवतेचे प्रतीक मानले जाते. इ.स. सन ६८० मध्ये हे यु*द्ध झाले होते. दरवर्षी मोहरमच्या दिवशी मोहम्मद पैगंबरांचे नातू इमाम हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येते. ताजियांसमवेत मोठा जुलूस काढला जातो व या यु*द्धातील शहिदांच्या स्मृतींना वंदन करण्यात येते.

इस्लामचा उगम ज्या मदिना शहरातून झाला, तिथून काही अंतरावरच मुआविया नावाचा हुकूमशहा राज्य करत होता. मुआवियाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा याजिद सिंहसनावर येऊन बसला. याने स्वतःला खलिफा घोषित केले. त्या काळात बादशहा याजिद यांचा इतका दरारा होता की लोक त्यांच्या नावानेच थरथर कापायचे. त्याच्या शहरातील जनतेत मात्र हुसेनच्या नावाचा बोलबाला होता.

याजिद इस्लामला स्वतःचा तत्वांवर चालवू इच्छित होता. याजिदने इमाम हुसेनला आपल्या अस्तित्वाला मान्यता देण्याची आज्ञा दिली. यासाठी त्याने प्रचंड जोर-जबरदस्ती देखील केली. परंतु इमाम हुसेन कुठल्याच दबावाला बळी पडले नाही.

ज्यावेळी हुसेन यांनी याजिदच्या अस्तित्वाला व प्रभुत्वाला मान्यता देण्यास नकार दिला, त्यावेळी हुसेन यांना रोखण्यासाठी याजिदने योजना आखायला सुरुवात केली. इ.स.६८० मध्ये हा घटनाक्रम घडत होता. इमाम हुसेन आपले घरदार सोडून मक्का शहरात पोहचले. त्यांना जेव्हा शत्रू त्यांना मारणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा ते शहर कुफेच्या दिशेने निघाले, त्यावेळी त्यांच्या समवेत लष्कर देखील होते. यात बायका मुलांसह एकूण ७२ लोक सहभागी होते.

याजिदच्या सैन्याने हुसेनवर ह*ल्ला चढवला. मोहरमच्या दिवशी १० तारखेला सकाळच्या नमाजाच्या वेळी यु*द्धाला सुरुवात झाली. एकीकडे याजिदचे सैन्य होते, तर दुसरीकडे हुसेन यांच्या समवेत ७२ परिवार होते. याजिद शक्तिशाली होता, त्याच्या सैन्याकडे ह*त्यारं, खंजीर आणि तलवार यांच्यासारखी शस्त्रे होती, मोठी फौज होती.



महिला व बालकांसह ७२ लोकांचे सैन्य घेऊन इमाम हुसेन याजिदचा सामना करणार होते. यु*द्ध सुरू झाले याजिदच्या सैन्याशी इमाम हुसेन व त्यांचा ७२ साथीदारांनी निकराचा लढा दिला.

अखेरीस इमाम हुसेन यांच्यासह त्यांचे ७२ साथीदार शहीद झाले. त्यांच्या शौर्यामुळेच आज ‘इस्लाम जिंदा होता है हर कर्बला के बाद’ असे म्हटले जाते.

शत्रूंनी इमाम हुसेन यांच्या सहा महिन्यांच्या अली अजगर नावाच्या बाळाचा शि*रच्छे*द केला. १८ वर्षांच्या अली अकबरची निर्ममपणे ह*त्या केली. १३ वर्षांच्या कासिम या मुलाला वेगाने पळणाऱ्या घोड्यांच्या टाचेखाली फेकले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. सात-आठ वर्षांच्या मोहम्मदाचा शि*रच्छे*द केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

याजिद यांच्या सैन्याने इमाम हुसेन व इतर ७२ लोकांची मोहरमच्या १० व्या तारखेला ह*त्या केली म्हणून हा दिवस पवित्र मानला जातो. याजिदने केवळ ह*त्याच केल्या नाहीत तर हुसेन समर्थकांच्या घरं दारं संपत्तीला जाळून खाक केले.

मोहमरच्या दहाव्या दिवशी इमाम हुसेन शहीद झाले म्हणून हा दिवस आशुरा म्हणून ओळखला जातो. आशुराच्या दिवशी आपले दुःख प्रकट करण्यासाठी मुस्लिम समाज ताजिया यात्रा काढतो. काही वेळा या सणात ‘गैर मुसलमान’ देखील सहभागी होतात. लोक या यात्रेत एक स्वरात ‘या हुसेन’ म्हणून इमाम हुसेन यांना श्रद्धांजली वाहतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

विद्यापीठासाठी वर्गणी देत नाही म्हणून मालवीय यांनी निजामाची भरचौकात इज्जत काढली होती !

Next Post

केरळच्या या डॉक्टरने आयडिया करून ड्रायव्हिंग कॉस्ट शून्य रुपयांवर आणली आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

केरळच्या या डॉक्टरने आयडिया करून ड्रायव्हिंग कॉस्ट शून्य रुपयांवर आणली आहे

जगज्जेत्या अलेक्झांडरच्या प्रेयसीने पुरु राजाला राखी बांधून त्याची इज्जत वाचवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.