The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय संघाच्या पहिल्या ओपनरला पुण्याच्या साखर कारखान्यात वॉचमनचे काम करावे लागले होते

by द पोस्टमन टीम
5 February 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज भारत हा क्रिकेटमध्ये जगात एक तुल्यबळ संघ ओळखला जातो. परंतु ८५ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. भारताने ज्यावेळी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा देश पारतंत्र्यात होता. आज आपण भारतीय संघाच्या त्या पहिल्या सामन्याच्या इतिहासावर प्रकाश टाकूया..

२५ जून १९३२, भारतीय संघ पहिल्यांदा इंग्लंडच्या विरोधात क्रिकेट सामना खेळायला, इंग्लंडला रवाना झाला. हा सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळण्यात आला होता. जनार्दन नवले यांनी या सामन्यात भारताकडून ओपनिंग केली होती. त्यांनी भारताकडून या सामन्यात पहिला चेंडु खेळला होता. फक्त या एकाच गोष्टीमुळे त्यांचे नाव इतिहासात कायमचे नोंदवले गेले.

त्या सामन्याच्या पहिल्या फेरीत जनार्दन नवले यांनी १२ रन बनवले होते. दुसऱ्या फेरीत त्यांनी १३ रन काढले. हा सामना भारतीय संघाने १५८ धावांनी गमावला होता. खरंतर ही काही फार समाधानकारक कामगिरी नव्हती. पण यामुळे त्या सामन्याचे आणि त्या सामन्यात खेळलेल्या खेळाडूंचे योगदान कमी होत नाही. आज भारतीय क्रिकेटचे मोठे साम्राज्य यावरच उभे राहिले आहे.

जनार्दन ज्ञानोबा नवले, या भारतीय क्रिकेटपटूचा जन्म आपल्या महाराष्ट्रातील फुलगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातील भावे स्कुलमध्ये झाले. ज्यावेळी त्यांनी सर्वप्रथम भारतासाठी क्रिकेट मॅच खेळली त्यावेळी त्यांचे वय हे फक्त ३० वर्षे इतके होते. त्यांनी त्या सामन्यात सलामीला फलंदाजी तर केलीच याशिवाय यष्टीरक्षणसुद्धा केले. ते एक उत्तम व वेगवान यष्टीरक्षक होते. विसडेन यांनी देखील त्यांच्या यष्टीरक्षणाचे कौतुक केले होते.

पण, नवले यांचे टेस्ट क्रिकेटर म्हणून करियर अधिक काळ चालु शकले नाही. पहिल्या मालिकेनंतर जेव्हा पुढच्या वर्षी इंग्लंडचा संघ पुन्हा भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा त्यांनी एक सामना खेळला होता. या सामान्यानंतर तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यांना पुन्हा कधीच संघात निवडले गेले नाही.



फक्त दोन कसोटी सामने खेळल्यानंतर ते कायमचेच बाद झाले. त्यांना क्रिकेट सोडल्यानंतर पुण्याजवळच्या एका साखर कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम मिळाले. त्यांचे यानंतरचे आयुष्य प्रचंड गरिबी आणि हालाखीच्या परिस्थितीत गेले.

आजकल आयपीएलमध्ये खेळणारे क्रिकेटपटू कोट्यवधी कमवतात, पण एकेकाळी हा खेळ ज्या माणसाने या मातीत रुजवला त्याला मात्र प्रचंड हालआपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या याचे वाईट वाटते.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Indian Cricket
ShareTweet
Previous Post

कोरोनाच्या ११० वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या एका रोगाने शेकडो लोकांचा जीव घेतला होता

Next Post

भटकंती : शिवकालीन संघर्षाच्या आठवणी जपत आपल्याला प्रेरित करणारा ‘राजगड’

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

भटकंती : शिवकालीन संघर्षाच्या आठवणी जपत आपल्याला प्रेरित करणारा 'राजगड'

गांधी ह*त्येवरील या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकांनी पुस्तकासाठी तब्बल ३ लाख डॉलर खर्च केले होते !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.