The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंगाली लोकांनी सुरु केलेली सत्यनारायणाची पूजा महाराष्ट्रात लोकप्रिय कशी झाली ?

by द पोस्टमन टीम
4 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


हिंदू धर्मात बरीच व्रत-वैकल्ये केली जातात. घरात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे म्हणून पूजा करणारे जसे आहेत तसेच कर्मकांड वगैरे पाळणाराही मोठा वर्ग भारतात आहे. महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये सत्यनारायणाची पूजा विशेष लोकप्रिय आहे. कोणतेही शुभकार्य असले की लोक आवर्जून ही पूजा करताना दिसतात.

सत्यनारायणाच्या पूजेचा इतिहास काय आहे? त्या पूजेची सुरुवात कुठे झाली? सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेऊया..

सत्यनारायणाची पूजा ही हिंदू धर्मातील एक विधी आहे. सत्यनारायण पूजेचे माध्यमातून या भगवान नारायणाची आराधना केली जाते. सत्यनारायण या शब्दातच या पूजेचा हेतू आणि अर्थ दडलेला असावा.

सत्यनारायण या शब्दाची फोड करून पाहिल्यास असे लक्षात येते की, या विश्वातील अंतिम सत्य जर काही असेल तर तो म्हणजे नारायण. आणि सत्यावरती निष्ठा ठेवून या नारायणाची आराधना करणे म्हणजेच सत्यनारायणाची पूजा करणे होय.

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात भरभराट व्हावी यासाठी ही पूजा केली जाते. लग्नसमारंभ, गृहप्रवेश असे कोणतेही चांगले निमित्त शोधून भाविक या पूजेचे आयोजन करतात. तसे तर ही पूजा कोणत्याही दिवशी व कोणत्याही निमित्ताशिवाय करता येते.



सत्यनारायणाचा पहिला उल्लेख स्कंद पुराणात आढळतो. ही पूजा शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी केली जाते. याशिवाय महिन्यातल्या कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. शुभकार्य झाले असेल, यशप्राप्ती झाली असेल त्यावेळी भगवान विष्णूचे आभार मानण्यासाठी सत्यनारायण पूजा केली जाते. तर, विवाहित जोडपे संततीप्राप्तीसाठी ही पूजा करतात.

भारतात बऱ्याच ठिकाणी सत्यनारायण पूजा मनोभावे केली जाते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर, बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमध्येसुद्धा ही पूजा केली जाते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

असे मानले आते की या पूजेचा उगम उगम बंगालमध्ये झाला. हा विधी सुरुवातीला बंगालमध्ये सत्यपिर म्हणून ओळखला जायचा. त्याचेच रूपांतर पुढे सत्यनारायण पूजेत झाले. बंगाली लोक नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी सत्यनारायणाची पूजा करीत असत. या पूजेच्या विधीत राज्यानुसारसुद्धा फरक आढळतो. महाराष्ट्रात एकादशीच्या दिवशी पूजा केली जात नाही. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतात.

महाराष्ट्रातील चित्पावन समाजात सत्यनारायण पूजेचे खास महत्त्व आहे. आंध्र प्रदेशातील जवळपास सगळ्याच हिंदूंचा सत्यनारायणाच्या पूजेवर अतूट विश्वास आहे. तेथील लोक भक्तिभावाने ही पुजा पार पडतात आणि भगवान विष्णूप्रति आपली भक्ती अर्पण करतात.

आंध्र प्रदेशात गोदावरीच्या पूर्व किनाऱ्यावरील अण्णावरम येथे सत्यनारायण देवाचे फार सुंदर मंदिर आहे. ही जागा विशाखापट्टणम जवळच आहे. या मंदिरात दररोज सत्यनारायण पूजेचे व्रत केले जाते. या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांचा ओघ सतत असतो. लोक त्यांच्या कुटुंबीयांसोबत येऊन या ठिकाणी हे व्रत पूर्ण करतात.

सत्यनारायण पूजेची बरीच वैशिष्ट्ये आहेत. भगवान विष्णूला समर्पित असलेली ही पूजा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा विधी मानला जातो. सत्यनारायण हा शब्द दोन वेगळ्या शब्दांपासून बनवलेला आहे. ते म्हणजे सत्य आणि नारायण. सत्य या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीतच आहे आणि नारायण म्हणजेच सर्वोच्च आणि अढळ असे स्थान. म्हणजेच भगवान विष्णू हा सर्वोच्च असून तो म्हणजेच सत्याचा अविष्कार आहे,असा त्याचा मतितार्थ आहे.

सत्यनारायणाच्या पूजेद्वारे भगवान विष्णूला सत्याचे मूर्त स्वरूप म्हणून मान्यता मिळते. कुटुंबाची भरभराट, आर्थिक विपुलता आणि एकंदरीतच आनंदी जीवनासाठी हे व्रत मोठ्या प्रमाणात केले जाते. कुटुंबीयांच्या दीर्घायुष्यासाठीसुद्धा ही पूजा मनोभावे केली जाते.

ही प्रथा जुनी असली तरी, आधुनिक काळातही तिला बरीच लोकप्रियता मिळालेली दिसते. मनोभावे, भक्तीभावाने आणि प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्याला त्याचे फळ नक्की मिळते असे भाविक मानतात. मोठेमोठे राजे-महाराजेसुद्धा आपल्या राज्यावर भगवान विष्णूची कृपादृष्टी रहावी यासाठी मोठ्या मंडपांत सत्यनारायणाची पूजा आयोजित करीत असत.

सत्यनारायण म्हणजे सत्याची देवता. भगवान नारायणाने ही सृष्टी निर्माण केली असल्याचे मानण्यात येते. त्यामुळे सृष्टी बनवणाऱ्या शक्तीला पुजणारा विधी म्हणून ही पूजा जास्त विशेष आणि प्रभावी ठरते. कार्तिक, वैशाख आणि श्रावण या महिन्यांमध्ये ही पूजा करणे शुभ मानले जाते. चंद्रोदय किंवा संक्रांतीच्या मुहूर्तावरसुद्धा सत्यनारायणाचा विधी केला जातो.

पुणे शहराच्या मध्यभागी, रविवार पेठेत श्री सत्यनारायणाचे मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन १६७० साली निळोपंत मुजुमदार यांनी बांधले होते. पूर्वी हा भाग मलकापूर म्हणून ओळखला जात असे. सध्या तिथे मोठ्या प्रमाणात सराफा बाजार आहे. एकेकाळी ही पेठ पुण्यातली सर्वांत श्रीमंत पेठ होती.

असं सगळं असलं तरी सत्यनारायण प्रथेची एक काळी बाजूसुद्धा आहे. पूजा न केल्यास आपल्यावर देवाचा कोप होईल या भीतीपोटीसुद्धा परवडत नसतानाही पूजेचा उपद्व्याप केला जातो. या गोष्टीमुळे कर्मकांडाला प्रोत्साहन मिळते. आणि भोंदू पुरोहितांचे आणखी फावते. काही ढोंगी साधू अडाणी माणसांना चांगलेच लुटतात. आणि भीतीपोटी ही माणसे प्रत्येक गोष्टीला स्वाहा म्हणण्याचे काम करत बसतात.

बाकी आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होत असेल तर त्यांनी ही पूजा नक्कीच करायला हरकत नाही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दुसऱ्या महायु*द्धात सैनिकांना मोफत वाटप करून झिप्पो लायटरने आपला ब्रँड जगभर पोहचवला होता !

Next Post

८०० विमानांनी एकत्रितपणे बॉ*म्बह*ल्ला करून जर्मनीचं एक अख्ख शहर बेचिराख केलं होतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

८०० विमानांनी एकत्रितपणे बॉ*म्बह*ल्ला करून जर्मनीचं एक अख्ख शहर बेचिराख केलं होतं

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.