The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टोमॅटो हे फळ आहे की भाजी हा वाद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालायात गेला होता

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. कोर्ट-कचेऱ्यांमध्ये वाया जाणारा पैसा आणि वेळ यांची बचत करण्यासाठी म्हणूनही या म्हणीचा जन्म झाला असेल. बहुतांश लोक आपापसातील किरकोळ वाद गावातील पुढारी आणि पंच लोकांच्या मदतीने सोडवतात. पण, अशी मध्यस्थी करूनही जेंव्हा प्रश्न मिटत नाही तेंव्हा मात्र कोर्टाची पायरी चढावीच लागते.

हा किस्सा आहे १८९३ मधील, जेव्हा फक्त टोमॅटोसाठी एका भाजी विक्रेत्याला कोर्टाची पायरी चढावी लागली होती. आता टोमॅटोवरून कसला वाद उद्भवला असेल? तर टोमॅटो हे फळ आहे की भाजी असा हा वाद होता. पण, हा वाद मिटवण्यासाठी या भाजी विक्रेत्याला कोर्टाची पायरी चढणे का आवश्यक वाटले, वाचा या लेखात.

१८९३ सालचा निक्सविरुद्ध हेडेनचा हा खटला अमेरिकेत खूप गाजला होता. टोमॅटो हे फळ आहे की भाजी हा वाद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालायात गेला तेव्हा असाही वाद निर्माण होऊ शकतो याची कुणीही कल्पना केली नसेल.

पण, अमेरिकेत त्याकाळी आयात केलेल्या फळांपेक्षा भाज्यांवर १०% आयात कर द्यावा लागत असे. १८८३ साली अमेरिकेचे अध्यक्ष चेस्टर ए. आर्थर यांनी हा कर कायदा अस्तित्वात आणला होता.

जॉन निक्स हा मॅनहटनमधील एक भाजीपाला विक्रेता होता. त्याची स्वतःची जॉन निक्स अँड कंपनी नावाची कंपनी होती. त्याच्यासोबत त्याची चारही मुले याच कंपनीत काम करत. तो बाहेरून भाजीपाला मागवून ती अमेरिकेत विकत असे.



एकदा त्याने जहाजावरून टोमॅटो मागवले होते आणि न्यूयॉर्क बंदरावरील अधिकाऱ्यांनी त्यावर आयात कर लावला. निक्सचे म्हणणे होते की, टोमॅटो ही काही भाजी नाही ते तर फळ आहे, मग त्यावर आम्ही कर का द्यावा? तांत्रिकदृष्ट्या तरी तो बरोबर बोलत असला तरी, न्यायालयात मात्र त्याचे हे म्हणणे फारसे टिकले नाही. वनस्पतीशास्त्राच्यादृष्टीने विचार केला तर टोमॅटो हे फळच आहे. भाजी नाही. वनस्पतीशास्त्राच्या मते, झाडाचे फळ सोडून कोणताही भाग जो आपण खातो ती भाजी असते. कोणत्याही फळामध्ये बिया असतात.

निक्स याच वनस्पतीशास्त्रीय व्याख्येचा आधार घेऊनच कर द्यायला नकार देत होता. टोमॅटो हे फळ असताना त्यावर कर का आकारावा? असे त्याचे म्हणणे होते. याच कारणावरून त्याने १८८७ साली न्युयॉर्क बंदराचे कलेक्टर एडवर्ड हेडेन यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल केला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्याचे म्हणणे होते की, या आम्ही जो काही कर आधी भरला आहे तो आम्हाला परत मिळावा.

हा खटला १८९३ साली सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. फिर्यादीच्या वकिलांनी कोर्टात फळ आणि भाजी यांच्यातील फरक दर्शवणाऱ्या अनेक व्याख्या सादर केल्या. शिवाय, व्यापाराच्या भाषेत फळ म्हणजे काय आणि भाज्या म्हणजे काय हे सांगणारे दोन साक्षीदारही न्यायालयात उभे केले. यासाठी त्याने वेगवेगळ्या भाषाकोषांचा संदर्भही दिला. भाषाकोषामध्ये फळाची जी व्याख्या दिली आहे त्यानुसार निक्सचा दावा बरोबर असल्याचे मत त्याच्या वकिलाने मांडले.  मग यावर युक्तिवाद करताना प्रतीवाद्यांच्या वकिलानेही भाषाकोषातील काकडी, वाटाणा, काळीमिरी, वांगं या सगळ्याच्या व्याख्या वाचून दाखवल्या. मग पुन्हा फिर्यादीच्या वकिलांनी गजर, पावटा, बटाटा, फ्लॉवर, कोबी, सलगम, ओवा याच्या व्याख्या सादर केल्या.

ही सगळी बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी मात्र निक्सचे म्हणणे खोडून काढले. पुस्तकी व्याख्येवर अवलंबून त्यांनी हा निकाल दिलाच नाही.

न्यायाधीशांना मात्र निक्सच्या वकिलांनी दिलेली टोमॅटोची व्याख्या पटली नाही. त्यांनी सांगितले की टोमॅटोचा वापर भाजीसाठीच केला जातो. त्याची व्याख्या काय आहे यापेक्षा त्याचा वापर कसा होतो यावरूनच त्याची वर्गवारी केली पाहिजे. या खटल्यावर निकाल सुनावताना न्यायाधीश होरॅस ग्रे यांनी म्हटले की, “टोमॅटो हे एक वेलवर्गीय फळ आहे. जसे काकडी, वाटाणा, पावटे या भाजी या वर्गात मोडते तसेच टोमॅटोही भाजी याच वर्गात मोडते. सामान्य ग्राहक असो की विक्रेते सगळ्यांसाठी या भाज्याच आहेत. दैनंदिन व्यवहारात यांना कोणीही फळ म्हणून वापरत नाही.”

फळे आणि भाज्या यांच्यात फरक करताना न्यायालयाचा हा निकाल विचारात घेतला जातो. फळ आणि भाज्या यांच्यावरील कर आकारतानाही याच निर्णयाचा हवाला दिला जातो. आजही अमेरिकेच्या शेती विभागात याच निर्णयानुसार टोमॅटो ही भाजी असल्याचेच गृहीत धरले जाते.

अशा प्रकारच्या खटल्यांचा निवडा करताना १८९३ च्या निवाड्यात केलेला हा न्याय डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय दिले जातात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एकेकाळी ऑस्कर मिळवणाऱ्या अभिनेत्यावर कंगाल होण्याची वेळ आली होती

Next Post

राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा लक्षात घेऊन सरदार पटेलांनी नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना केली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा लक्षात घेऊन सरदार पटेलांनी नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना केली होती

एका रात्रीत आयुष्य पालटले आणि अट्टल गुन्हेगार बनला वर्ल्ड फेमस मॉडेल !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.