The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जवाहरलाल नेहरूंनी का दडवून ठेवले होते सुभाषबाबूंच्या मृत्यूचे रहस्य ?

by द पोस्टमन टीम
17 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आजकल फार चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुभाषबाबुंचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता आणि त्यांचा मृत्यू रशियातील सायबेरियाच्या एका बंदिगृहात झाला असून नेहरूंना याची पूर्वकल्पना होती असे मत व्यक्त केले आहे. नेताजींच्या परिवाराने देखील त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर नेहरूंनी पाळत ठेवल्याचा आरोप केला होता.

नेहरू आणि बोस यांचं नातं सदैव चर्चेत राहिले आहे. या दोघांच्या नात्याने आजवर अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. नेहरू आणि बोस सुरुवातीच्या काळात चांगले मित्र होते. सुभाषबाबू नेहरूंना आपला बंधुतुल्य मित्र मानायचे. पण कालांतराने दोघांच्या नात्यात इतकी मोठी दरी निर्माण झाली की नेहरूंबद्दल लिहिताना बोस म्हणाले, त्यांना नेहरूं इतके नुकसान आजवर कोणीच पोहचवले नाही.

१९३६ साली नेहरू आणि बोस दोघेही युरोपात होते. बोस तिथे निर्वासित म्हणून राहत होते तर नेहरू त्यांची पत्नी कमला यांची आजारपणात जिनेव्हा येथे सेवा करत होते. पुढे कमला यांचे निधन झाले आणि सुभाषबाबू तत्काळ जिनीव्हाला नेहरूंकडे गेले.

सुभाषबाबूंनी नेहरूंच्या पत्नीच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली, नेहरूंच्या पाठीमागे एक भक्कम आधार म्हणून सुभाषबाबू उभे राहिले. यानंतर दोघांमधील मैत्री वृद्धिंगत होत गेली.

नेहरू आणि बोस दोघेही साम्यवादी विचारांचे होते. पण भविष्यात नेहरू गांधीजींच्या अधिक जवळ गेले तर सुभाषबाबूंनी एकदम विपरीत मार्गाचा अवलंब केला. पुढे दोघांमध्ये संपर्क नाहीसा झाला.



एके दिवशी बातमी आली की सुभाषबाबूंच्या विमानाचा अपघात झाला. अनेक लोक मानतात की हा अपघात घडलाच नव्हता. नेहरूंना सुभाषबाबू जिवंत असण्याची पूर्ण कल्पना होती. ३१ डिसेंबर, १९६१ रोजी खोसला आयोगासमोर श्याम जैन यांनी याची पुष्टी केली होती.

नेहरूंना सुभाषबाबूंबद्दल बरीच रहस्ये माहिती होती, फक्त त्यांनी कधीच त्याची जाहीर वाच्यता केली नव्हती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अनुज धर आणि इतर अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकात असा दावा केला आहे की विजयालक्ष्मी पंडित सोव्हिएत संघाचा दौरा करून आल्यावर १९४८ मध्ये भारतवासियांसाठी एक आनंदाची वार्ता आहे, अशी घोषणा केली होती. पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दबावाखाली त्यांनी त्याबद्दल कुठेच वाच्यता केली नाही. विजयालक्ष्मी पंडित रशियात सुभाषबाबूंना भेटल्या होत्या असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे.

सुभाषबाबूंच्या विमान अपघातानंतर ते जिवंत असल्याचा अनेक कथा प्रचलित आहेत. अनेक लोकांनी त्यांना पाहिले असल्याचे नमूद केले आहे. काही जण म्हणतात की ते रशियात बंदिवासात होते. काही म्हणतात की, तिबेटच्या एका आश्रमात एकनाथलाला म्हणून निवास करत होते.

काही जण म्हणतात की, १९६० ते ७० च्या काळात ते पश्चिम बंगालमधील शारदानंद यांच्या आश्रमात वास्तव्यात होते. काही लोक म्हणतात की सुभाषबाबू हेच स्वामी शारदानंद होते. अनेकांनी त्यांना १९६४ मध्ये नेहरूंच्या अंत्ययात्रेत देखील बघितले असे म्हणतात.

अनेक जण असं मानतात की १९८५ पर्यंत ते फैजाबाद येथे गुमनामी बाबा किंवा भगवन बाबा म्हणून वास्तव्यास होते. याबद्दल आज अनेक पुरावे देखील उपलब्ध आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी १३ मे, १९६२ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बंधू सुरेशचंद्र बोस यांना पत्र लिहिले होते. या पत्रात नेहरू सुरेशचंद्र बोस यांना म्हणाले होते की, त्यांच्याकडे सुभाषबाबू यांच्या अस्तित्वाबद्दल कुठलाच ठोस पुरावा नाही. पण नेहरूंनी असंख्य गोष्टी लपवल्या आहेत.

नेहरू-बोस दोघेही चांगले मित्र होते. दोघांमधील संबंध जरी बिघडले होते तरी त्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रचंड आदराची भावना होती. महात्मा गांधी यांच्या मनात देखील बोस यांच्याबद्दल आदर होता पण बोस यांच्या कडव्या भूमिका त्यांना मंजूर झाल्या नव्हत्या. बोस यांनी आझाद हिंद सेनेत गांधी-नेहरूंच्या सन्मानार्थ बटालियन देखील सुरु केली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: netaji subhashchandra bosepandit neharu
ShareTweet
Previous Post

दोन देशांच्या बॉर्डरवर असलेल्या या हॉटेलमुळे फ्रेंच सैनिकांचा जीव वाचला होता

Next Post

कोरोनाच्या ११० वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या एका रोगाने शेकडो लोकांचा जीव घेतला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कोरोनाच्या ११० वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या एका रोगाने शेकडो लोकांचा जीव घेतला होता

भारतीय संघाच्या पहिल्या ओपनरला पुण्याच्या साखर कारखान्यात वॉचमनचे काम करावे लागले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.