The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा शास्त्रज्ञ हात धुवायला विसरला म्हणून आपल्याला साखरेला पर्याय मिळाला

by द पोस्टमन टीम
6 February 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


अपघाताने लागणारे शोध किंवा ज्याला सेरेंडीपिटी म्हटलं जातं असे शोध हे नेहमी अनपेक्षित मार्गांनी किंवा अनपेक्षित घटनांमुळे लागलेले असतात.

आज आपण तीन वेगवेगळ्या कृत्रिम गोड पदार्थांच्या अपघाती किंवा अनपेक्षित शोधबद्दल माहिती बघणार आहोत त्यांच्या मुळाशी एकच घटक आहे. ‘एखादा शास्त्रज्ञ जेव्हा त्याचं बोट सहजपणे तोंडात घालतो आणि त्याला गोड चव लागते’! बस! एवढ्या एकाच निरीक्षणातून हे तिन्ही शोध लागले आहेत.

१. ‛सॅकरिन’ किंवा साखर (१८९७,जॉन हॉपकिन्स विद्यापीठ)

एके रात्री, कॉन्स्टँटाईन फेलबर्ग त्याच्या प्रयोगशाळेतून घरी आला आणि भूक लागली म्हणून त्याने समोर दिसला म्हणून एक पावाचा तुकडा घेऊन एक घास खाल्ला. त्याला तो गोड लागला, अगदी साखरेपेक्षाही गोड! तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो जो पाव खात होता त्यावर कोणतं तरी रसायन लागलं होतं ज्यामुळे त्याची चव गोड लागत होती. हे तेच रसायन आहे ज्यावर तो रोज त्याच्या प्रयोगशाळेत प्रयोग करत होता.

आता आपल्या प्रयोगशाळेतल्या अगणित रसायनांमधलं नक्की हे ‘गोड’ रसायन कोणतं याचा शोध घ्यायचा एकच उपाय होता, सगळ्या रसायनांची चव बघणं.

त्याने तसं केलं आणि एकदाचं त्याला ‘बेंझोईक सल्फीमाईड’ हे गोड रसायन मिळालं. त्याचं ‘सॅकरिन’ असं नामकरण त्याने केलं. इतकंच नाही तर, ते खाण्यायोग्य आणि सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने १० ग्रॅम सॅकरिन घेतलं, ते तसंच गिळलं आणि २४ तास थांबून काय होतंय का याची वाट बघितली. शरीराने त्यावर थेट कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता ते पचवलं होतं.



त्याला लक्षात आलं की हे नक्कीच सुरक्षित आहे. त्यानंतर सर्व ठिकाणी याचा उपयोग होऊ लागला. मुख्यत्वेकरून जेव्हा दुसऱ्या महायु*द्धात साखरेचा पुरवठा कमी होता त्यावेळी सॅकरिनचा वापर केला गेला. आज आपणही कधीही एखाद्या पुडीतून आणलेली सॅकरिन सहज तोंडात टाकून गोड खाल्ल्याचा आनंद घेतो.

२. ‛सायक्लामेट’ (१९३७, इलिनोईस विद्यापीठ)

मायकेल स्वेदा त्याच्या डॉक्टरेट प्रबंधाची तयारी करत होता आणि नुकतंच त्याने सिगारेट ओढणंही सुरू केलं होतं. एक दिवस आपल्या प्रयोगशाळेत असताना सहज आपली तंबाखू मळून त्याने तोंडात टाकलं आणि त्याला तंबाखू गोड आहे असं चवीवरून जाणवलं.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

फेलबर्गप्रमाणेच यानेही हे नक्की काय झालं याचा शोध घ्यायचं ठरवलं. जोपर्यंत ती गोड गोष्ट मिळत नाही तोवर तो ज्या ज्या गोष्टींवर किंवा रसायनांवर संशोधन करत होता त्या सगळ्याची चव घ्यायला त्याने सुरवात केली.

शेवटी एकदाचं ते रसायन सापडलं. ते होतं सायक्लामेट.

पण सॅकरिनसारखं तुम्ही सायक्लामेट सहज तोंडात टाकू शकत नाही, कारण उंदरांवर केलेल्या प्रयोगांनंतर समोर आलं आहे की सायक्लामेट हे कर्करोगाचं कारण ठरू शकतं.

३. ‘ऍस्पारटेम’ (१९६५, G.D Searle and Co.)

जेम्स स्क्लॅटर.

एकदा प्रयोगशाळेत एका रासायनिक संयुगावर प्रयोग करत होता. जेम्स म्हणतो की, “कागदाच्या गठ्ठ्यातून एक कागद काढावा म्हणून मी जिभेला बोट लावून मग कागद काढला पण तेवढ्यात मला उग्र अशी पण गोड चव जिभेला लागली. सुरवातीला मला वाटलं की सकाळी आल्यापासून काहीतरी खाताना माझ्या हाताला साखर लागली असेल त्यामुळे गोड चव लागली, पण तसं नव्हतं.

मी हात धुतले तेव्हा मला लक्षात आलं माझ्या हाताला एका डब्यातली पूड लागली होती ज्यात मी एस्पार्टिल-फेनिलॅलानिन मेथिल एस्टरचे स्फटीक ठेवले होते.”

त्याला ते विषारी वगैरे असेल असं वाटलं नाही आणि त्याने एकदा ते थोडं चाखून बघितलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की या आधी बोट जिभेला लावल्यावर त्याला जी गोड चव जाणवली होती तीच चव त्याला हे रसायन चाखल्यावर जाणवली. तेच हे ऍस्पारटेम होतं.

सॅकरिनप्रमाणे ऍस्पारटेमसुद्धा बऱ्याच ठिकाणी पदार्थांना गोड चव यावी म्हणून वापरलं जातं. आपण ते पाण्यात किंवा कशातही ढवळून पिऊ शकतो, नुसतं खाऊ शकतो. विविध शितपेयांना गोड चव यावी म्हणूनही यांचा वापर होतो. FDA(Food and Drug Administration) द्वारे याला सुरक्षित पदार्थ अशी मान्यताही मिळाली आहे.

प्रयोगशाळेतलं कोणतंही रसायन चाखून बघण्यापेक्षा तरी नक्कीच हे सुरक्षित आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जनतेला न कळू देता अमेरिकेने कॅनडाच्या विमानतळावरून ब्रिटनला शस्त्र पुरवले होते !

Next Post

विद्यापीठासाठी वर्गणी देत नाही म्हणून मालवीय यांनी निजामाची भरचौकात इज्जत काढली होती !

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

विद्यापीठासाठी वर्गणी देत नाही म्हणून मालवीय यांनी निजामाची भरचौकात इज्जत काढली होती !

या इमामाच्या आठवणीत मुस्लिम बांधव काढतात मोहरमला ताजियांचा जुलूस

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.