The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी ह*त्येवरील या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकांनी पुस्तकासाठी तब्बल ३ लाख डॉलर खर्च केले होते !

by द पोस्टमन टीम
5 February 2025
in राजकीय, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘फ्रीडम ॲट  मिडनाईट‘ हे पुस्तक मध्यंतरी खूप गाजले होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गेल्या वर्षी ‘शिदोरी’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या विशेषांकात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांवर टिप्पणी करणारे लेखन करण्यात आले होते. या सावरकर आणि गोडसे यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा फार गंभीर स्वरूपाचा आरोप होता आणि त्यासाठी संदर्भ म्हणून ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला होता.

डोमेनिक लिपियर आणि लॅरी कॉलिन्स या दोन लेखकांनी या पुस्तकाचे लेखन केले होते.

‘इज पॅरिस इज बर्निंग?’ या पुस्तकावर आधारीत चित्रपटाची निर्मिती फ्रेंच दिग्दर्शक रेन क्लेमेंट यांनी केली होती. हे पुस्तक त्याकाळी प्रचंड गाजले होते. मास्टरपिस म्हणून हे पुस्तक गणले गेले होते. पॅरिस नष्ट होण्याच्या किती जवळ येऊन ठेपले होते, याचे उत्तम वर्णन या पुस्तकात करण्यात आले होते.

रामचंद्र गुहा यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाच्या अगोदर स्वातंत्र्याच्या वेळी घडलेल्या घडामोडींचा लेखाजोखा हिंदुस्थानी हिस्टोरीकल फिक्शन जॉनरमधील या पुस्तकाचा अभ्यासक संदर्भ म्हणून वापर करायचे. फाळणी व त्या दरम्यानच्या घटनांचा क्रम या पुस्तकात उलगडण्यात आला होता. लॅरी कॉलिन्स आणि डोमेनिक लिपियर या लेखकद्वयीने आतापर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.



लॅरी कॉलिन्स हे अमेरिकन लेखक होते. १४ सप्टेंबर १९२९ रोजी लॅरी यांचा जन्म झाला. ‘इज पॅरिस इज बर्निंग?‘ या आपल्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन १९६५ मध्ये त्यांनी केले. हे पुस्तक त्यावेळी प्रचंड गाजले होते. लॅरी यांनी आपली सर्वच पुस्तके त्यांचे फ्रेंच मित्र डोमेनिक लिपियर यांच्या साथीने लिहिली होती.

या पुस्तकात जर्मन सैन्याने पॅरिसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन करण्यात आले होते. १९४४ साली हि*टल*रने दिलेल्या एका आदेशावर हे पुस्तक बेतले आहे. दुसऱ्या महायु*द्धाच्या वेळी मित्रराष्ट्रांचे सैन्य पॅरिसला येऊन धडकण्यापूर्वी पॅरिसला जाळून खाक करून टाकण्याचे आदेश हिटलरने दिले होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

‘इज पॅरिस इज बर्निंग?’ या पुस्तकावर आधारीत चित्रपटाची निर्मिती फ्रेंच दिग्दर्शक रेन क्लेमेंट यांनी केली होती. हे पुस्तक त्याकाळी प्रचंड गाजले होते. मास्टरपिस म्हणून हे पुस्तक गणले गेले होते. पॅरिस नष्ट होण्याच्या किती जवळ येऊन ठेपले होते, याचे उत्तम वर्णन या पुस्तकात करण्यात आले होते.

लॅरी कॉलिन्स आणि डोमेनिक लिपीयर ही जोडगोळी पुस्तक लिहायला घेण्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात रिसर्च करायची. या रिसर्चसाठी ते मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करायचे. १९४८ च्या गांधीह*त्येवर आधारित ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ या १९७५ सालातील पुस्तकाच्या लेखनासाठी या लेखकांनी त्यावेळी गांधी ह*त्येच्या कटात सामील असलेल्या ‘विष्णु करकरे’ची मदत घेतली होती. त्यांनी त्याला आपल्या घरात ठेऊन घेतले होते.

दोन्ही लेखकांनी या पुस्तकाच्या रिसर्चवर तब्बल ३ लाख डॉलर खर्च केले होते. हे पुस्तक जेव्हा बाजारात आले त्यावेळी या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. रिसर्चसाठी खर्च केलेल्या पैशाचे चीज झाले. या पुस्तकामुळे लेखकद्वयी मालामाल झाली होती.

कॉलिन्स यांनी आपल्या करियरची सुरुवात जाहिरात क्षेत्रातून केली. कॉलिन्स यांना त्याकाळी प्रसिद्धीचा हव्यास होता. १९५१ साली त्यांनी आपले बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व P&G जाहिरात कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. सैन्याने त्यांची मित्र राष्ट्रांच्या पब्लिक अफेयर्ससाठी आवश्यक असलेल्या SHAPE या कार्यालयात नियुक्ती केली. या ठिकाणीच त्यांची डोमेनिक लिपियर यांच्याशी गाठ पडली.

तिथून कॉलिन्स पुन्हा P&G मध्ये कामाला परतले व प्रॉडक्ट मॅनेजर पदाची जबाबदारी सांभाळू लागले. जाहिरात आणि पी.आर.च्या क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना या व्यवसायाला भविष्य नसल्याची जाणीव झाली व त्यांनी आपला मोर्चा पत्रकारितेकडे वळवण्याचा निर्णय घेतला. तसं बघायला गेलं तर हा फारच आत्मघातकी निर्णय होता, कारण कॉलिन्स यांचे अनुमानच चुकले होते. पत्रकारितेपेक्षा जाहिरात क्षेत्राचा विकास हा अधिक गतीने होत होता.

जाहिरात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तीपेक्षा तिप्पट पगार मिळायचा. कॉलिन्स यांनी त्यावेळी पत्रकारितेच्या दिशेने वळण्याचा निर्णय घेऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती.

१९५७ मध्ये कॉलिन्स पॅरिसच्या युनायटेड प्रेस इंटरनॅशनल ब्युरोचे न्यूज एडिटर बनले. पुढच्याच वर्षी ते रोमला गेले. १ वर्ष मध्यपूर्वेतील घटनाक्रमांचे वार्तांकन करण्याचे काम केले, त्यासाठी ते बैरुत शहरात राहत होते. १९६१ मध्ये त्यांनी न्यूजविक जॉईन केले. इथे ते चार वर्षे पॅरिस ब्युरोचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. इथे राहत असतांना कॉलिन्स यांच्या मनात पुस्तक लिहिण्याचा विचार आला. याच ठिकाणी लिपियर हे त्यांचे जुने सहकारी व मित्र पॅरिस मॅच या वृत्तसंस्थेत पत्रकार म्हणून काम करत होते. दोघांनी एकत्र येऊन मग पुस्तकांचे लेखन केले.

लॅरी आणि डोमेनिक यांनी एकत्रितपणे पुस्तकांचे लेखनच केले नाहीतर बहुतांश संदर्भ ग्रंथांचे व कागदपत्रांचे संशोधन केले. दोघांनी एकत्र येऊन लिहिलेल्या पुस्तकांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

कॉलिन्स आणि डोमेनिक यांनी ज्या पुस्तकांचे लेखन केले ते काही विशिष्ट ऐतिहासिक घटनांशी निगडित होते, अशा घटना ज्या काळाच्या ओघात समोर येऊ शकल्या नव्हत्या.

‘पॅरिस इज बर्निंग’, ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’प्रमाणे  ‘आई विल ड्रेस यू इन मॉर्निंग’ (१९६८) व इस्त्राईलच्या इतिहासावर आधारित ‘ओ जेरुसलेम’ ( १९७२) या पुस्तकांचे देखील लेखन केले होते. फॉल ऑफ ग्रेस’ (१९६८), ‘मेज़’ (१९८९), ‘ब्लैक ईगल्स’ (१९९३), ‘ले जूर दू मिरेकल : डी-डे पेरिस’ (१९९४), ‘टुमारो बिलॉन्ग्स टू अस’ (१९९४) या पुस्तकांचे एकट्यानेच लेखन करायचे काम लॅरी कॉलिन्स यांनी केले होते. कॉलिन्स यांनी अनेक लघुकथादेखील लिहिल्या होत्या.

कॉलिन्स मृत्यूच्या अगोदर देखील डोमेनिक यांच्यासमवेत मध्यपूर्वेतील राजकारणावर एक पुस्तक लिहण्याची तयारी करत होते, परंतु २० जून, २००५ ला ७५ वर्षाच्या वयात लॅरी यांचे निधन झाले. ‘न्यूयॉर्क इज बर्निंग’ हे त्यांनी डोमेनिक यांच्यासमवेत लिहिलेलं शेवटचं पुस्तक २००४ साली प्रकाशित करण्यात आलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Dominique Lapierrefreedom at midnightLarry Collins
ShareTweet
Previous Post

भटकंती : शिवकालीन संघर्षाच्या आठवणी जपत आपल्याला प्रेरित करणारा ‘राजगड’

Next Post

जनतेला न कळू देता अमेरिकेने कॅनडाच्या विमानतळावरून ब्रिटनला शस्त्र पुरवले होते !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जनतेला न कळू देता अमेरिकेने कॅनडाच्या विमानतळावरून ब्रिटनला शस्त्र पुरवले होते !

हा शास्त्रज्ञ हात धुवायला विसरला म्हणून आपल्याला साखरेला पर्याय मिळाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.