The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेमासाठी तुम्ही काय केलंय..? या राजाने ‘वाईन’चा तलाव केला होता..!

by द पोस्टमन टीम
23 December 2025
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


चीनच्या इतिहासात अनेक चमत्कारिक आणि हुकुमशाही राजे होऊन गेलेत. त्यांच्या’ चमत्कारिक आणि जुलमी हुकुमशाही वर्तनाबद्दल वाचल्यावर अक्षरश: आपल्या अंगावर काटा येईल. कसे काय हे लोकं इतके मूर्ख आणि क्रू*र वागू शकतात?, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

इसपू बाराव्या शतकात चीनमधे होऊन गेलेला शांग वंशाचा राजा झोऊ हा चीनच्या इतिहासात एक क्रू*र आणि जुलमी राजा म्हणून ओळखला जातो. या राजाने आपल्या राज्यात दारूचा म्हणजेच वाईनचा तलाव उभारला होता आणि त्या तलावाच्या मध्यभागी एक बेट निर्माण केले होते.

या बेटावर मटणाचे जंगल वाढवले होते. त्याठिकाणी बीफ, भाजलेलं चिकन, पोर्क इत्यादी मांस पदार्थ झाडांच्या फांद्यावर लटकावलेले असायचे. हे वाचून निश्चितच तुमचे डोळे विस्फारले गेले असतील.

तर झालं असं, इसपू १०४७ मधे राजा झोऊने ‘यो सु या राज्या’वर ह*ल्ला केला आणि ते राज्य जिंकून घेतले. या राज्याची राजकुमारी डाजीला त्याने आपल्या उपपत्नीचा दर्जा दिला. डाजीच्या प्रेमात हा राजा इतका वेडा झाला होता की तिच्या आनंदासाठी तो काहीही करायला तयार होता. राजा झोऊच्या आयुष्यात डाजी आली आणि सगळा इतिहासच बदलून गेला.

खरे तर राजा झोऊच्या काळातील चीन हा अतिशय समृद्ध आणि संपन्न होता. पण, विनाशकाले विपरीत बुद्धी. राज्यात वाईनचा तलाव बांधण्याची मूळ कल्पना डाजीचीच.



डाजीला छानछोकीचे आणि चैनीचे जीवन हवे होते. हा तलाव बांधल्यावर डाजी आणि राजा झोऊ बराच वेळ या तलावावरच घालवत असत. वाईनच्या तलावात डुंबणे, मधल्या बेटावरील जंगलात जाऊन झाडावर लाटकलेले मटणाचे वेगवेगळे प्रकार तोडणे आणि खाणे. उरलेला सगळा वेळ संभोगात घालवणे हीच तिची दिनचर्या.

डाजीला पार्ट्या करण्याचाही भरपूर नाद होता. राजाच्या दरबारातील मंत्री, कारभारी, वकील, सल्लागार अशा सगळ्या लोकांना या पार्टीचं आमंत्रण दिलं जाई. खरं तर राजाच्या आणि डाजीच्या पार्टीला जायचं म्हणजे चैन कमी डोक्याला तापच जास्त असा दरबाऱ्यांना अनुभव होताच. पण, राजासमोर बोलण्याची कुणाची काय बिशाद! कारण राजाचे डोके फिरले तर तो काय शिक्षा देईल याचा नेम नाही.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

या पार्टीत सहभागी लोकांची नग्न होऊन पळण्याची शर्यत लावली जाई, त्यांना एकमेकांशी संभोग करण्याची सक्ती केली जाई, तेही उघड्यावर, त्यांना एकमेकांशी उंदीर-मांजरीसारखे वर्तन करावे लागे, एकमेकांशी अश्लील संभाषण करावे लागे आणि डाजी याचा विकृत आनंद घेत असे.

एखाद्याने राजाच्या या आज्ञा पाळण्यास नकार दिलाच तर त्याला तिथेच त्या वाईनच्या तलावात बुडवून मारले जाई. त्यामुळे राजाची सगळीकडे द*ह*शत पसरली होती.

डाजीच्या नादी लागून राजाचे राज्यकारभारातील लक्षही कमी होत चालले होते. झोऊ तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. तिच्या हट्टाखातर त्याने राजवाड्याशेजारी एक प्राणीसंग्रहालयही बांधला होता. या संग्रहालयात दूरदूरून प्राणी आणि पक्षी आणून ठेवले होते. तिला संगीत आणि नृत्य आवडते म्हणून खास तिच्यासाठी महालात त्याने एक कलाकारांचा ताफा ठेवला होता, जे तिला आवडणारं संगीत वाजवतील.

वाईनचा हा तलाव बांधण्यात राज्याचा पुष्कळ पैसा खर्च झाला होता. या तलावाच्या मध्यभागी मटणाचे जंगल होते. जिथे तिन्ही त्रिकाळ मटण शिजवून ते झाडांच्या फांद्यांवर लटकवून ठेवलेले असे. डाजीला मैफल भरवण्याची हुक्की आलीच तर राजा पाहुण्यांना आमंत्रण देई आणि डाजीची करमणूक करण्यासाठी त्यांना डाजीच्या आज्ञा पाळाव्याच लागत. डाजीच्या इशाऱ्यावर नाचून नाचून हे पाहुणे अक्षरश: बेशुद्ध पडत असत. डाजी त्यांच्याकडून तशीच कामे करवून घेत असे. अगदी त्यांना पूर्ण थकवा येईपर्यंत संभोग करण्याची आज्ञा दिली जाई. तरीही डाजी विरोधात बोलण्याचे धाडस मात्र कुणीही करू शकत नव्हते.

खुद्द झोऊच्या काकांनीच डाजीच्या प्राणिसंग्रहालयातील विचित्र वर्तनाबद्दल त्याच्याकडे तक्रार केली. तर राजाने त्याचे बारीक तूकडे करून मारण्याची आज्ञा दिली. सैनिकांनी राजाने दिलेल्या आज्ञेचे पालन करत हळूहळू त्याचे तुकडे करून मारून टाकले. तर राजाने आपल्या काकाच्या छिन्नविछिन्न झालेल्या शरीरातील हृदय उचलले आणि त्याला सात कप्पे आहेत का याची खात्री करून घेतली होती.

कारण, चीनमधे अशी एक म्हण आहे की, धाडसी पुरुषाच्या हृदयाला सात कप्पे असतात. झोऊच्या मते त्याचा काका धाडसी होता म्हणून त्याने ही खात्री केली.

डाजीसुद्धा क्रू*रतेच्या बाबतीत राजाच्या एक पाऊल पुढेच होती. तिने तर लोकांना त्रास देण्यासाठी पाओलाओ म्हणून एक मशीन बनवून घेतले होते. ते सिलिंडरच्या आकाराचे तांब्याचे मशीन होते. एखाद्या भट्टीसारखेच. ज्यात तप्त कोळसा भरला जाई आणि हे मशीन गरम झाल्यावर ते एखाद्या व्यक्तीच्या पाठीला बांधले जाई. ती व्यक्ती आक्रोश करून जीव सोडत नाही तोपर्यंत हे मशीन त्याच्या पाठीवरून उतरवले जात नसे. ती व्यक्ती होरपळून निघत असे, व्यक्तीच्या जीवघेण्या आक्रोशातही डाजीला आनंद मिळत असे.

मेई बो नावाच्या एका सल्लागाराला या मशीनला बांधले होते आणि त्याचा जीव घेतला होता. मेई बोचा हा क्रू*र अंत पाहून जनतेमध्ये राजा झोऊ आणि डाजी विरोधात रोष पसरला. हळूहळू या रोषाचे रुपांतर बंडात झाले. त्यातच शांग वंशातील झोऊ या बंडखोर राज्याशी राजा झोऊचे यु*द्ध सुरूच होते. झोऊच्या राज्यातील अंतर्गत बंडाळीचा फायदा घेत आणि बंडखोर नागरिकांना हाताशी घेऊन या झोऊ स्टेटने झोऊच्या राजधानीचा पाडाव केला.

पराभव पाहताच राजा झोऊ आपल्या महालात गेला आणि बंडखोराच्या हाती लागण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्याने अख्खा महाल पेटवून दिला. यातच त्याचा अंत झाला. बंडखोरांनी पुढे राजाच्या इतर नातेवाईकांसह डाजीला देखील मारून टाकले.

राजा कितीही शक्तिशाली आणि क्रू*र असला तरी जनतेच्या बंडासमोर त्याचे काहीच चालत नाही. प्रजेने अशा उन्मत्त राजांना धडा शिकवल्याची उदाहरणे प्रत्येक देशात आढळतातच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

यातला तुमचा फेव्हरेट क्रिकेट अंपायर कुठला..?

Next Post

ज्या देशासाठी अंतराळात गेला, परत आला तेव्हा तो देशच अस्तित्वात नव्हता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

ज्या देशासाठी अंतराळात गेला, परत आला तेव्हा तो देशच अस्तित्वात नव्हता

जगात कितीही राडे झाले तरी स्वित्झर्लंड त्यात का पडत नाही..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.