The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इब्राहिम लोदी – लोदी वंशाचा शेवटचा सुलतान

by द पोस्टमन टीम
20 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


भारतावर आजवर अनेक राजवंशांची सत्ता होती, त्यापैकीच एक होता लोदी राजवंश!

इब्राहिम लोदी हा या वंशाचा शेवटचा राजा. तो प्रचंड शूर होता पण चुकीच्या निर्णयांमुळे तो व त्याची सत्ता मातीत मिळाली होती. १५२६ साली पानिपतावर बाबरशी झालेल्या यु*द्धात इब्राहिम लोदी पराभूत झाला व लोदी वंशाचा अस्त होऊन, मोगलाईची सुरुवात झाली.

इब्राहिम लोदीचा जन्म १५व्या शतकात झाला. तो सिकंदर लोदीचा सर्वांत लहान मुलगा होता. सिकंदर लोदीच्या मृत्यूनंतर इब्राहिमच्या खांद्यावर राज्याची जबाबदारी पडली व तो दिल्लीचा सुलतान बनला. लोकांना वाटले होते की इब्राहिमच्या राजवटीत साम्राज्याचा विस्तार होईल, पण भलतंच घडलं. इब्राहिमला सत्ता मिळाली पण ती कशी हाताळली पाहिजे याचे ज्ञान त्याला नव्हते, परिणामतः त्याचे स्वकीयच त्याच्या विरोधात गेले.

जनतेच्या मनात त्याच्याविषयी रोष पसरला होता. त्याच्या दरबारातील लोकांना तो नकोसा वाटत होता, ते त्याचा बिमोड करण्याच्या संधीची वाटच होते, या परिस्थितीचा फायदा मिळवत त्याच्या शत्रूंनी त्याच्या विरोधात योजना आखायला सुरुवात केली होती.

इब्राहिमने त्याच्या पित्याचे ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर आपला विजयी झेंडा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण केले होते, हे त्याच्या कारकिर्दीत त्याने मिळवलेले एकमेव यश मानले पाहिजे. ग्वाल्हेरचा किल्ला हा फार अभेद्य तर होताच शिवाय शूर सैनिकांच्या वेढ्याने सुरक्षित करण्यात आला होता. दिल्लीच्या सुलतानांना ग्वाल्हेर ताब्यात घेण्याची मनोमन इच्छा होती, त्यापैकी इब्राहिम खान लोदीच्या वडिलांचे हा किल्ला आपल्या छत्राखाली आणण्याचे स्वप्न होते. त्यांच्या हयातीत हे शक्य झाले नाही. अखेरीस इब्राहिम लोदीने आपल्या वडिलांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले होते.



इब्राहिमला ग्वाल्हेर काही सहजासहजी मिळाला नव्हता, त्यासाठी त्याने असंख्य मोहिमा आखल्या व त्या किल्ल्यावर आक्र*मण केले होते, अखेरीस तो यशस्वी ठरला होता. इब्राहिम लोदीच्या वडिलांनी असंख्य वेळा आक्र*मणे करून ग्वाल्हेर जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण ते कायम अपयशी व्हायचे, त्यावेळी त्या अपयशाची कारणे इब्राहिमने शोधून काढली होती, त्याने त्या आधारावर मोहिमेची आखणी केली.

ग्वाल्हेरचा राजा मानसिंह हा मोठा पराक्रमी राजा होता. त्याने आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत केली होती, इब्राहिमच्या पित्याला त्याने रणांगणात असंख्य वेळा धूर चारली होती. इब्राहिमने ग्वाल्हेरवर आक्र*मण केले त्यावेळी त्याला मानसिंहाच्या ताकदीचा पूर्ण अंदाज होता. त्याने त्या अनुरूपच मोहिम आखली होती. अनेक अयशस्वी आक्र*मणांनंतर जेव्हा इब्राहिम लोदी पुन्हा चालून गेला त्यावेळी तो विजयी होईल असे कोणाला वाटत नव्हते, परंतु त्याने सर्वांचे गणित मोडीत काढत ग्वाल्हेरचा पाडाव करण्यात कमालीचे यश मिळवले. ग्वाल्हेरचा राजा मानसिंह या यु*द्धात मृत्युमुखी पडला. इब्राहिमची युद्धनीती इतकी प्रभावी होती की ग्वाल्हेरने त्याच्यासमोर सपशेल शरणागती पत्करली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

इब्राहिम लोदीने जरी हे यु*द्ध जिंकले तरी त्याच्या सैन्यात त्याच्याविषयी मोठा असंतोष होता. याच काळात त्याचे मेवाडचे सत्ताधीश राणा संग्राम सिंह यांच्याशी यु*द्ध झाले.

१५१९ मध्ये राणा संग्राम सिंहाने बेसावध असलेल्या इब्राहिम लोदीच्या छावणीवर ह*ल्ला चढवला. ह*ल्ल्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या इब्राहिम लोदीने त्यासाठी ना तयारी केली होती ना कुठली व्यवस्था उभारली होती.

इब्राहिम लोदीला जेव्हा त्या आक्र*मणाची माहिती मिळाली, तेव्हा त्याने घाईघाईत आपले सैन्य एकत्रित केले व संग्राम सिंहाचा मुकाबला करण्यास सुरुवात केली. परंतु पूर्ण तयारीनिशी आलेल्या संग्राम सिंहाच्या राजपूत यो*द्ध्यांनी इब्राहिमच्या सैन्याची धुळधाण उडवली. राजपुतांच्या तलवारीने असंख्य सुलतानी सैनिक व सरदार चराचर का*पले गेले होते. सुलतानी सैनिकांच्या रक्ताने संपूर्ण भूमी न्हाऊन निघाली होती. अखेरीस इब्राहिमला संग्राम सिंह यांनी पराभूत केले व त्याच्या छावणीला वेढा घातला.

राजपूत सैनिकांनी वेढा घातला आहे  हे समजल्यावर इब्राहिमने सुटण्यासाठी तळमळ सुरू केली, त्याने त्याच्या साथीदारांना हाताशी धरून वेढा टाकून बसलेल्या राजपूत यो*द्ध्यांशी तुंबळ यु*द्ध केले. या यु*द्धात त्याचे उरलेले सरदार देखील धारातीर्थी पडले. परंतु इब्राहिम मात्र चकमकीच्या वेळी पलायन करण्यात यशस्वी ठरला, यादरम्यान त्याने त्याचा एक हात गमावला होता.

संग्राम सिंहाच्या यु*द्धात झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे इब्राहिम लोदीच्या विरोधात जनतेत असंतोष होता. राजपुतांनी सुलतानी शासकांच्या अनेक वीर सरदारांना व असंख्य सैनिकांना यमसदनी धाडले होते. इब्राहिमच्या नाकर्तेपणामुळे हे घडले, असा ठपका लोकांनी ठेवला.

इब्राहिम हा शासक म्हणून नालायक असल्याची धारणा जनतेच्या मनात घट्ट रुजली व त्याचे परिणाम इब्राहिमला बाबरसोबत झालेल्या पानिपताच्या तिसऱ्या ऐतिहासिक यु*द्धात मोजावे लागले होते.

१५२६ साली बाबरसोबत झालेल्या ऐतिहासिक पानिपताच्या लढाईमुळे इब्राहिम लोदी इतिहासात अजरामर झाला. बाबर आणि लोदी यांच्या दरम्यान तीन वेळा यु*द्ध झाले. या प्रत्येक यु*ध्दावेळी इब्राहिमने मोठ्या चलाखीने सैन्याची मोट बांधून बाबरचा सामना केला होता. बाबरचे फक्त १५ हजार सैन्य होते पण इब्राहिमकडे ३० ते ४० हजार सैनिक होते. बाबरने त्या अगोदर असंख्य लोकांशी यु*द्ध केले होते तर इब्राहिमचा अनुभव फारच कमी होता.

बाबरने यशस्वी नियोजन आणि आपल्या भेदक माऱ्याच्या बळावर इब्राहिमच्या सैन्याची दाणादाण उडवली होती. या यु*द्धात इब्राहिमच्या अनेक सैनिकांनी रण मैदान सोडून पळ काढला होता. इब्राहिमचे जे सैनिक लढले ते मारले गेले, स्वतः इब्राहिम या यु*द्धात मारला गेला. बाबरच्या सैन्याच्या विजयाने भारतात मोगलाईचा उदय झाला.

इब्राहिम लोदीच्या पराभवाला त्याची प्रशासनावरची ढिली पकड कारणीभूत होती. त्याला वारसाहक्काने मिळालेले साम्राज्य जतन करण्यात अपयश आले होते. तो जरी सुलतान होता, तरी प्रजेच्या प्रति त्याची वागणूक व सैनिकांशी केलेल्या सापत्न व्यवहारामुळे त्याला लोकांचे समर्थन नव्हते. त्याच्या सैनिकांचीच त्याच्यावर नसलेली निष्ठा त्याला सर्वनाशाच्या दिशेने घेऊन गेली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

प्रजासत्ताक दिनाला २१ तोफांची सलामी देण्यामागे हा किस्सा आहे..!

Next Post

आपण घेतोय ते सोनं किती शुद्ध आहे हे कसं ओळखायचं ..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आपण घेतोय ते सोनं किती शुद्ध आहे हे कसं ओळखायचं ..?

या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.